शिवसेना नेते आझाद मैदानात संभाजीराजेंच्या भेटीला



आरक्षणाच्या निर्णायक लढाईसाठी मराठा तरुण आक्रमक

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायाल्यात प्रलंबीत असल्याने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. शनिवारपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणावरून हटणार नाही, असा पवित्रा संभाजी राजेंनी घेतला आहे. त्यामुळे आज त्यांना भेट देण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते आले होते. यावेळी मराठा तरुणांच्या रोषाला सर्वांना सामोरे जावे लागले.

उपोषणासाठी बसलेल्या खासदार संभाजी राजेंची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे नेते आझाद मैदानात आले होते. सुरपातीस खासदार राहूल शेवाळे यांनी येवून संभाजीराजेंची चौकशी केली. तर त्यानंतर शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत हे आझाद मैदानावर आले. यावेळी आझाद मैदानात बसलेल्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर संभाजी राजेंनी स्वतः उभं राहून कार्यकर्त्यांना शांत केलं. ''माझ्यासमोर असा उद्रेक होणे बरोबर नाही. तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर हे योग्य नाही. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही माझे मित्र आहेत. आपला मराठा समाजाचा लढा दीर्घकाळाचा आहे. त्यामुळे तुम्ही सर्व शांततेच्या मार्गाने लढा द्या'', असं आवाहन संभाजी राजेंनी तरुणांना केलं. त्यानंतर महापौरी किशोरी पेडणेकर आणि सेनेच्या खासदारांसोबत चर्चा केली.

यावेळी आम्ही राजेंच्या सोबत असुन मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्वरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून मार्ग काढू, राजेंना जास्त यातना होवू नयेत हीच आमची भुमीका असल्यान मुख्यमंत्र्यांशी बोलून विषय मार्गी लावू असं आश्वासन सेनेच्या नेत्यांनी दिलं.
 दरम्यान आज दिवसभरात माजी खासदार हरिभाऊ राठोड, समरजीतसिह घाटगे यांच्यासह अनेकांची संभाजीराजेंना पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर रिघ लागली होती. राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच अनेक संघटनांनी देखील राजेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.   यावेळी मराठा संघटनाचे राजेंद्र कोंढरे, संजीव भोर, आप्पासाहेब कुडेकर, करण गायकर, फत्तेसिंह सावंत, गंगाधर काळकुटे, धनंजय जाधव, विरेंद्र पवार, रघूनाथ चित्रेपाटील, महादेव देवसरकर, विनोद साबळे, अंकुश कदम, गणेश कदम आदीसह महाराष्ट्रातील समन्वयक उपस्थित होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income