कोपरखैरणेतील 150 घरे जबरदस्तीने बेदखल

नवी मुंबई :( ३ फेब्रुवारी २०२२) येथील डॉ. आंबेडकर नगर, बालाजी नगर कोपरखैरणे स्टेशनजवळ. गेल्या 20 वर्षांपासून येथे लोक राहतात. त्यापैकी बहुतांश पारधी समाजातील (भटक्या जमाती) आहेत. हजाराहून अधिक पोलीस, अधिकारी, सिडको कर्मचारी, एनएमएमसी कर्मचाऱ्यांनी ही अमानुष कारवाई केली आहे. 16 मे 2018 रोजी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा ठराव मंजूर होऊनही ही कारवाई करण्यात आली आहे. 150 कुटुंबांना कोणतीही सूचना न देता बेदखल करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडे SRA योजनेनुसार 2000 पूर्वीची आणि 2011 पूर्वीची कागदपत्रे आहेत, त्यांच्या उच्च न्यायालयात खटला सुरू आहे.
डॉ.आंबेडकर नगर, कोपरखैरणे स्टेशन जवळ, बालाजी नगर येथे गेले 20 वर्षा पासुन पारधी समाजातील लोक या ठिकाणी राहतात त्यांच्यापैकी काही लोकांच्या कडे पात्र झोपडीधारक म्हणुन पुरावे असतानाही व माननीय उच्च न्यायालयामध्ये केस चालू असताना सुद्धा कोणाचीही न ऐकता ही तोडक कार्यवाही हजारो पोलीस, नगर पालिका कर्मचारी, अधिकारी, CIDCO कर्मचारी यांनी ही अमानुषपणे कार्यवाही केली आहे व शासनाचे कायदे आणि न्यायालयाला न जुमानता ही कार्यवाही झाली आहे. याचा तीव्रतेने निषेध विविध संस्था संघटना यांनी केला असून, घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हिरामण पगार, संतोष नरवाडे, कुंडलिक कांबळे, खाजामीया पटेल नवी मुंबई  जिल्हाअध्यक्ष, रिपब्लिकन सेना ह्या सर्वानी लोकांचे सांत्वन करून निषेध व्यक्त केला.
Forced eviction of 150 homes in Khoparkhairane*
*Date*: 3 February 2022
*Location*: Dr. Ambedkar Nagar, Balaji Nagar near Koparkhairane Station.

People have been living here for the last 20 years. Most of them belonging from Pardhi  community (nomadic tribe). 

More than thousand policeman, officers, CIDCO staff, NMMC staff have taken this inhumane action. This action has been taken despite the Slum Rehabilitation Scheme  resolutions passed on 16th May 2018. 150 households have been evicted without any notice and they have documents before 2000 and before 2011 as per SRA scheme, also they have an ongoing case in high court.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income