उल्हासनगरमध्ये स्वच्छ हवा संमेलनाचे आयोजन

कल्याण : (दि.25 फेब्रुवारी) येथील सिंधू युथ सर्कल हॉलमध्ये सोमवारी दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी स्वच्छ हवा संमेलनाचे आयोजन वातावरण या सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे. शहरातील पर्यावरण प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने या बैठकीत उपस्थित राहून आपले विचार मांडावेत असे आवाहन उल्हासनगर मधील वातावरण मित्र बाबुराव खेडेकर आणि विनोद सेवलानी यांनी केले आहे. 
        गेली तीन महिन्यापासून उल्हासनगर शहरात वातावरण या एनजीओ मार्फत हवा प्रदूषण या विषयावर अभ्यास सुरू आहे. त्यासाठी शहरातील हवेचे नमुने घेण्यासाठी तीन ठिकाणी मॉनिटर बसवण्यात आले आहेत. या मॉनिटर द्वारे मिळणाऱ्या अचूक परिमानांचे निरीक्षण करन्यासोबत शहरातील लोकप्रतिनिधी,  प्रशासन, समाजसेवक, विचारवंत, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत हवाप्रदूषण याबाबत मतमतांतरे जाणून घेतली आहेत. कोरोनामुळे प्रत्यक्ष भेटीवर व सामूहिक मिटिंगसाठी मर्यादा आल्या होत्या मात्र सध्या थोडे नियम शिथिल झाल्यामुळे हवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी होणार असल्याचे समजते. सदर बैठकीत हवा प्रदूषणाची कारणे त्याचे परिणाम व सामुहिक प्रयत्न म्हणून करायच्या उपाययोजना याबाबत सखोल चर्चा होणार आहे. सदर बैठकीस प्रमुख उपस्थिती वातावरण संस्थेच्या संचालक फराह काझी यांची असणार आहे. शहरातील हवा प्रदूषणाची दशा बघता सदर बैठक वादळी ठरणार आहे. या संमेलनात सहभागी होऊन हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे शिवधनुष्य पेलावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income