कविवर्य संदीप मेंगाने यांच्या गुरूविषयी कविता

*माझे गुरु*

परिस्थिती जाण
विचार महान
साधेच राहणं
गुरु जाण....

रंगानं गव्हाण
मोठालं आव्हान
मास्तर चव्हाण
गुरु माझे....

विचारांची दिशा
ज्ञान दरवेशा
भविष्याची आशा
गुरु माझे....

गौरवर्ण मूर्ती
आदर सन्मार्थी
चौफेरची कीर्ती
गुरु माझे...

जरी मी हुशार
छड्डीचाच मार
चव्हाण मास्तर
गुरु माझे....

सोनियाची खाण
ज्ञानाचा दिवाण
बाबुराव चव्हाण
गुरु माझे....

संदीप मेंगाणे.
7021463427.


: *माझे गुरु....*
सोनियाची खाण
विद्ववतेची जाण
बाबुराव चव्हाण
        गुरु माझे....

जरी मी हुशार
छडीचा मार
चव्हाण मास्तर
        गुरु माझे....

विद्यार्थ्यांची जाण
समाजाचे भान
माझा अभिमान
        गुरु माझे....

शाळेची शान
बुद्धीचे वरदान
चारित्र्य महान
         गुरु माझे....

अमृताचि ऐशा
विचारांची दिशा
भविष्याची आशा
         गुरु माझे....

संयमाची मूर्ती
आदर सन्मार्थी
चौफेर कीर्ती
         गुरु माझे....


       - संदीप मेंगाणे
         7021463427
         ( गुरुपौर्णिमा )


*गुरु माझी....*

दिव्यत्वाची नाव
प्रेमळ स्वभाव
चैतन्याचा गाव
          गुरु माझी....

वृक्षाची छाया
ज्ञानाचा पाया
आईची माया
          गुरु माझी...

जीवना आकार
विना अहंकार
जगाचा उद्धार
          गुरु माझी....

जीवन उजाळी
रंगानं सावळी
ज्ञानाची लव्हाळी
          गुरु माझी...

साऱ्यांचा आदर
मायेचा पदर
सुमन मस्कर
          गुरु माझी....


संदीप मेंगाणे
7021463427.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income