आषाढी एकादशीवर तिन कविमित्रांच्या कविता


१)  सर्वज्ञ.....

विठ्ठल म्हणजे जोड
विठ्ठल म्हणजे दौड
विठ्ठल म्हणजे ओढ
पंढरीची....

विठ्ठल म्हणजे भक्ती
विठ्ठल म्हणजे शक्ती
विठ्ठल म्हणजे मुक्ती
अंधाराची....

विठ्ठल म्हणजे सागर
विठ्ठल म्हणजे आगर
विठ्ठल म्हणजे जागर
नामाचा....

विठ्ठल म्हणजे नाती
विठ्ठल म्हणजे ख्याती
विठ्ठल म्हणजे साथी
चुकलेल्यांचा....

विठ्ठल म्हणजे शिकवण
विठ्ठल म्हणजे आठवण
विठ्ठल म्हणजे गोठवण
पापपुण्याची...!

         -अविनाश लोंढे
          9821896825
         ( ३०/०६/२०)

(२)
 उन्हा तान्हात कष्टानं
झिजते बापाचे अंग
श्रध्दा मातीवर त्याची
माझा तोच पांडुरंग....

माय पेरते धान्य
पीक येई तरारूनी
माया शेतावर तिची
माझी तीच रुक्मिणी....

येता दिवस सुगीचे
तुटती काळजीची पिसे
पीक पाहुनी बापाला
पिकांत " विठ्ठल "दिसे...!


          - सुनिल शिवाजी खवरे
            9820992502


(३)
*आम्ही वारकरी... नाममात्र..*

आम्ही वारकरी
नित्यनेम करी
आषाढवारी
गुणदोषांची...

तूच सुख दाता
दुःख निवारिता
करता करविता
भाविकांचा  ...

दुःखाचा डोंगर
अवघ्या जगभर
बा आवर आवर
कोरोनाला...

पंढरी पंढरी
निर्जन नगरीं
आम्ही स्व घरी
पांडुरंगा....

तुझीच लेकरं
तुझीच पाखरं
सोडी रस्त्यावर
जीव तयांचा...

वाढली बेकारी
उदंड लाचारी
आम्हींच खोचारी
परिस्थितीचे ...

माऊली माऊली
जगाची साऊली
शिकार जहाली
कोरोनाची...

नित्यनेम जरी
चुकलिया वारी
चुकलासे घडीभरी
दोष कुणाचा....

चुकलीय स्वारी
तुमची वारी
आम्ही वारकरी
नाममात्र....

तुझाच रोष
तुझाच दोष
नाही जयघोष
तुझ्या नामाचा...

पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा....
       
संदीप मेंगाणे
7021463427

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income