भाजपचा एकात्म मानवतावाद


          हिंदुस्थानातल्या गुलामगिरीला कांही अंतच नाही. काळे गोऱ्यांचे गुलाम आहेत, स्त्रिया पुरुषांच्या गुलाम आहेत, अस्पृश्य स्पृश्यांचे गुलाम आहेत,खेडी शहरांची गुलाम आहेत,जनावरं माणसांची गुलाम आहेत.... हि यादी हवी तितकी वाढवता येईल असे सेवाव्रती विनोबा भावे यांनी म्हटले आहे.या परिस्थितीचा परामर्श घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतात जिथे धर्माला समृद्धी,कल्याण आणि मोक्ष मानले जाते तोच धर्म म्हणजे व्यक्ती,समाज,सृष्टी आणि परमेश्वर यांच्या एकात्मतेचा विचार मांडला. भारतीय जनता पार्टीने एकात्म मानवतावाद हा एतद्देशीय विचार पक्षाचे तत्वज्ञान म्हणून स्वीकारले आहे. 
            एकात्मता संपूर्णतेत समाविष्ट असते. संपूर्णतेच्या अभावात मनुष्य अपूर्ण दृष्टीच्या प्रभावाखाली जातो. जशी ब्रह्मांडात संपूर्णता असते तशीच ती व्यक्तीतही असते. व्यक्ती म्हणजे केवळ शरीर न्हवे तर त्याच्याजवळ मन ,बुद्धी आणि आत्माही आहे याचा विचार आहे. या चारपैकी एकाकडे जरी दुर्लक्ष केले तरी मनुष्य विकलांग होईल अशी धारणा एकात्म मानवतावादाची आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतींचा विकास व्हावा आणि एक असा मानवधर्म निर्माण व्हावा,ज्याच्यात सर्व धर्मांचा समावेश असावा,ज्याच्यात व्यक्तीला समान संधी आणि स्वातंत्र प्राप्त व्हावं, जे एक सदृढ,समृद्ध आणि जागरूक राष्ट्र मानलं जावं असे उद्धिष्ट त्यामागे ठेवले आहे. त्यासाठी अर्थाचा अभावच नाही तर अती प्रभावही धर्माचा नाश करतो हा भारताचा स्वतःचा विशेष दृष्टिकोन आहे याचीही जाणीव त्यामागे आहे. 
       श्री. दत्तोपंत ठेंगडीनी याबाबत म्हटले आहे कि, पंडितजी भारतीयत्वाचे समर्थक केवळ एवढ्यासाठी न्हवते कि ती त्यांची राष्ट्रीय पैतृक संपत्ती होती. त्यांना माहित होतं कि मानवतेतील दोष,विशेषतः जगातील दोष भारतीय संस्कृतीच्या आधारानेच दूर केले जाऊ शकतात. त्यांना पूर्ण विश्वास होता कि जर समाजवाद कधी आपलं जाहीर केलेलं लक्ष प्राप्त करू शकला तर ते ह्याच भारतीय संस्कृतीच्या आधारावर होऊ शकेल. ते आपल्या समन्वयवादाच्या आधारावर एका अशा विश्वराज्याची कल्पना करू शकले ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांच्या संस्कृतीचा विकास व्हावा आणि एका असा मानवधर्म निर्माण व्हावा ज्यात सर्व धर्मचाच न्हवे तर भौतिकवादाचाही समावेश असावा. 
          कुठल्या संप्रदायाच्या किंवा वर्गाच्या सेवेचे व्रत न घेता संपूर्ण राष्ट्रातील देशबांधवांच्या सेवेचं व्रत हे ध्येय ठेवून भारतमातेला सुजलाम, सुफलाम  करण्याचे स्वप्न यामध्ये विशद केलेले आहे. हिंदी महासागर आणि हिमालयाने वेढलेल्या भारतात जोपर्यंत एकरूपता,कार्यकुशलता,समृद्धता,ज्ञान, सुख आणि शांतीच्या सप्तजाणिवांचा पुण्यप्रवाह आणू शकत नाही तोपर्यंत भगीरथ तपस्येचा निश्चय एकात्ममानवतावादाचा आहे. 
वंदे मातरम !
---  बाबुराव खेडेकर 
सहसंयोजक :- भाजप पनवेल तालुका प्रज्ञा प्रकोष्ठ सेल 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income