कार्यसम्राट आ. प्रशांत ठाकूर यांची शैली

कार्यसम्राट आ. प्रशांत ठाकूर यांची शैली : कॉफी विथ सकाळ मध्ये रंगला संवाद 

पनवेल :- बाबुराव खेडेकर 
             रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे रायगड जिल्हयातील ''युथ आयकॉन'' आहेत. त्यांची कार्यशैली राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शक अशीच आहे. त्यांच्या कार्यशैलीचे विविध पैलू  ''कॉफी विथ सकाळ'' या दैनिक सकाळच्या विशेष उपक्रमामध्ये पहायला मिळाले. शेकापमधून काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजप असा त्यांचा प्रवास नेमका कसा झाला ? त्यामागील अपरिहार्यता काय होती ? आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठीचे त्यांचे स्वप्न साकारताना कसा संघर्ष करावा लागला याचे सविस्तर विवेचन या मुलाखतीमध्ये त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षाबद्धल द्वेषभावनेचा लवलेश या मुलाखतीमध्ये दिसला नाही.हीच त्यांची खास शैली जनतेला आपलेसे करणारी आहे. 
          पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी सकाळने ''कॉफी पे चर्चा'' असा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.सोमवारी (दिनांक १ मे ) रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सकाळच्या टीमशी संवाद साधला.त्याठिकाणी उपस्थित राहून कार्यसम्राट आमदारांची मानसिकता कशी असते याबाबतची जाणीव झाली. राजकीय कार्यकर्त्यांनी जनसेवा कशी करावी, आपल्या मतदारसंघातील लोकांचा उद्धार करताना स्वतःचे राजकीय तत्वज्ञान कसे विकसित होत जाते याबाबतही नवी दृष्टी यानिमीत्ताने पहायला मिळाली.
       काँग्रेसचे कोकणातील एकमेव आमदार तसेच युवा अभ्यासू आमदार अशी ख्याती असलेल्या आमदारांनी अचानक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विचारसरणीचा गोंधळ उडाला नाही का या प्रश्नाचे उत्तर देताना आ. प्रशांत ठाकूर यांनी सांगितलेले उत्तर बरेच कांही सांगून जाणारे होते. गटबाजीला ऊत आल्याने लॉबिंगचा धोका समोर दिसू लागला होता.काँग्रेसमध्ये असेच काम करीत राहिलो असतो तर अर्धी ऊर्जा संपली  असती असे त्यांचे प्रतिपादन खूपच बोलके होते. त्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लिहिलेले एक वाक्य यावेळी सांगितले कि, सत्तेचा स्वभावच लोकांना केंद्रित करणे असा असतो;सत्तेचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे असते. काँग्रेसने नेमके तेच केले नसल्यामुळे काँग्रेसची आजची परिस्थिती आली आहे असेही ते पुढे म्हणाले.
          नगरपालिकेच्या मर्यादा आणि सिडकोची कामाची शैली यामुळे पनवेल या ४० टक्के नागरी तर ५० टक्के ग्रामीण अशा परिसराचे प्रतिनिधित्व करताना सरकारी यंत्रणेविरोधात न बोलता काम होणारच न्हवते.विकासाचे  विषय चर्चेत असणे आणि प्रत्यक्षात कामाला सुरवात होणे यामध्ये फरक असतो.२०१४ पूर्वी राजकारण हे  ताज्या समजले जाणारे क्षेत्र होते. मात्र याच राजकारणातून व्यवस्था परिवर्तनाची अपेक्षा लोकशाही मध्ये नागरिक करीत असतो. तरुणाईला विकासाची भाषा समजते. एखाद्या पक्षात तडजोड करून संपून जायचे किंवा आपल्या सहकाऱ्यांची आणि नागरिकांची दिशाभूल करीत राहायचे कि लोकांसाठी खरे काम करायचे या प्रश्नावर विचार करून शेकापला सोडचिट्टी दिली होती असे स्पष्टीकरण आ. प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिले. प्रकल्पग्रस्तांचा १२. ५ टक्केचा आणि गरजेपोटी बांधलेल्या घरांचा मोठा प्रश्न अनेक वर्षे भिजत होता असेही ते यावेळी म्हणाले. पुढे टोलच्या मुद्यावर काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला याबाबत उत्तर देताना ते म्हणाले कि, तत्कालीन काँग्रेसचा विरोधक असलेल्या शेकापने टोलच्या मुद्यावर निषेध व्यक्त करणारी बॅनरबाजी केली होती. स्थानिकांना टोलसूट नको तर टोलपासून सुटका हवी अशी आमची भूमिका होती. शिवाय त्तकालीन काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना हे तत्त्वता मान्य होते तसे त्यांनी मीडियासमोर जाहीरसुद्धा केले होते . मात्र काँग्रेसने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळॆ आमदारकीचा राजीनामा दिला;सहकाऱ्यांनाही पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला होता. शांत राहायचे ठरवले होते मात्र सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा सक्रिय होत टोलमुक्तीचा अजेंडा असलेल्या भाजपमध्ये प्रवेश केला असे त्यांनी यावेळी सांगितले. 
        एखाद्या प्रश्नाचे उत्तर सामान्य नागरिकाला एका वाक्यात हवे असते. राजकीय कार्यकर्त्याला मात्र सारासार विचार  करून एखाद्या घटनेचा परस्पर संबंध पाहून संबंधित प्रश्नाकडे पाहावे लागते. त्यामुळेच पनवेलचा पाणीप्रश्न कशारितीने तांत्रिक अडचणींमध्ये अडकला,झोपडपट्टी पुनर्वसन,पार्किंग,टोलचा प्रश्न , महापालिकेची मागणी, यासर्व गोष्टींची  सविस्तर माहिती आ. प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली.
        भाजपमध्ये आल्याने   व्यक्तिशः मानसिक समाधानी असल्याची भावना आ. प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. त्याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले कि, भाजपची निर्णयक्षमता आणि वचनबद्धता त्याचबरोबर कार्यकर्त्यांना घडविण्यासाठी सततची प्रशिक्षणाची व्यवस्था यामुळे भाजप ''पार्टी विथ डिफरंस'' अशी आहे. पनवेलकर माझ्यासाठी सर्वस्व आहेत. शिवाय विविध निवडणुकांमध्ये ठाकूर परिवार पनवेलसाठी खूप कांही करू इच्छितो  याचे प्रमाणपत्र  मिळाले आहे. शेडुंगचा टोल कधीच बंद झाला आहे असे ठामपणे सांगत वडाळे तलावाच्या बाबतीत जे आरोप विरोधक करतात त्यांनी सिद्ध करावेत असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. शिवसेना भाजप युती या चर्चेतील विषयावर बोलताना त्यांनी सांगितले कि,शिवसेना आणोनि भाजप हे एकाच विचारसरणीचे असून एकमेकांचे हाडवैरी नाहीत. त्यामुळे वस्तुस्थिती स्वीकारून योग्य प्रस्तावानिशी सेना सोबत आली तर विचार करू अशी भूमिका त्यांनी मांडली. आयुक्तांच्या बदलीसंदर्भातील आरोपाचेही खंडन करीत आयुक्तांच्या बदलीसंदर्भात विरोधकांनीच प्रयत्न केले असा प्रतिआरोप त्यांनी यावेळी केला  आहे. हि बदली निवडणुकीपुरती आहे असा माझाही ग्रह आहे असेही ते यावेळी म्हणाले. अनधिकृत फेरीवाल्यांना बढावा देत दादा बनलेल्यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी जाहीर वक्तव्ये केली आहेत यापुढेही नगरसेवकांच्या मदतीने अशी दादागिरी मोडून काढू असेही त्यांनी जाहीर केले आहे. 
       मंत्रिपदाबाबत पत्रकार आ. प्रशांत ठाकूर यांना हमखास प्रश्न विचारतात यावेळीही या विषयावर बोलताना आ. प्रशांत ठाकूर म्हणाले कि, भाजपच्या बैठकांमध्ये आपण कधी आलात तर आपल्याला मंत्रिमंडळ व्यासपीठावर बसलेले दिसणार नाही. भाजपमध्ये संघटनेला महत्व जास्त असून संघटनेने मला जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे.जनहिताच्या योग्य आणि न्याय मागण्यांची पूर्तता होते. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आनंद घेऊ द्या असेही ते यावेळी म्हणाले. साम टीव्हीचे पत्रकार मिलिंद तांबे यांच्याबाबत महाड येथे घडलेल्या प्रकारची आठवण करून देत सकाळच्या पत्रकारांनी पालकमंत्री रायगडाला वेळ देत नाहीत असा सूर लावला तेंव्हा आ. प्रशांत ठाकूर म्हणाले कि, पालकमंत्री ना प्रकाश मेहता रायगड भाजप जिल्हाध्यक्ष  म्हणून मला चांगले सहकार्य करतात. जिल्ह्याची प्रशासकीय कामे अडलेली नाहीत त्यामुळे पालकमंत्री रायगडाला न्याय देत आहेत असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी केले .   
             पनवेलमधील संघर्षयात्रेच्या समारोपावर '' हा शेकापच्या अस्तित्वाच्या संघर्षाचा समारोप'' अशी टिप्पणी यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी केली. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत विरोधकांनी पोलखोल करण्याचे मनसुबे आखले आहेत त्यावर आपली काय तयारी आहे ? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि,भाजपला बचाव करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार नाही असे सांगत त्यांनी याआधीही असे विरोधकांचे प्रयोग फसलेत अशी आठवण करून दिली. 
            भविष्यातील पनवेल कसे असेल याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, आशिया खंडातील सर्वात मोठे ट्रेन टर्मिनल्स,जेएनपीटी,आंतरराष्ट्रीय विमानतळ,सेझ, रिलायन्सच्या प्रकल्प यामुळे मोठा बदल या परिसरात होणार आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा आणि वाढत्या लोकसंख्येला नागरी सुविधा याकडे  सरकार लक्ष देत आहे . ना. नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टिकोनातून रस्त्यांचा विकास होत आहे . कोस्टल रोड,मेट्रो अशा सेवासुविधा निर्माण होत आहेत. पनवेलची महानगरपालिका या प्रक्रीयेमध्ये महत्वाचे काम करणार असून पनवेल स्मार्ट शहर होण्यासाठी महापालिका हद्दीतील नागरिकांना समानस्तरावर आणले पाहिजे;त्यानंतर स्तर वाढवले पाहिजेत. नयनाच्या माध्यमातूनही भूखंडांचा योग्य उपयोग केला तर मुंबई,नवी मुंबईच्या तोडीचे शहर पनवेल बनेल असे त्यांनी स्पष्ट केले. 
           निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या बंडखोरीबाबत बोलताना ते म्हणाले कि,राजकीय कार्यकर्ते क्षणिक विचार करून वेगळा मार्ग निवडत असतात मात्र भाजपमध्ये तसे होऊ देणार नाही. भाजप हा संवादावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे, त्यामुळे अडचण भासल्यास  पक्षश्रेष्टींशी  चर्चा करेन असेही त्यांनी सांगितले. महिलांना ५० टक्के संधी हे समीकरण व्यवस्थेने स्वीकारले असल्यामुळे महिलानी पुढे यायला हवे त्याचबरोबर युवकांनीही पुढे येण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे असेही ते यावेळी म्हणाले. गतिमान विकास ,पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशकता या प्रमुख मुद्यांवर हि निवडणूक लढविली जाणार असे त्यांनी यावेळी जाहीर केले. भाजपचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सबका साथ सबका विकास हे ब्रीद असल्यामुळे या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या चर्चेमध्ये आ. प्रशांत ठाकूर यांनी  अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया  दिली आहे  कि, सर्वगुणसंपन्न लोकप्रतिनिधी नसतो, समन्वय साधतो तो पुढे जातो;त्यांचीच लोक निवड करतात ! 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income