सेवाव्रती विनोबा भावे यांचे मला भावलेले विचार

 ज्या कार्यकर्त्याला लोकसंग्रह करावा असं वाटतं त्यानं अंगी वेधकता,कोधकता,शोधकता,उत्कटता आणि निरंतर तन्मयता हे गुण अंगी बाणवायला हवेत. 

आपलं स्वतःचं घर सांभाळणे म्हणजे स्वराज्य आणि आपलंच घर उत्तम प्रकारे सांभाळणे म्हणजे सुराज्य !

''मुखी नाम आणि हाती काम'' हे सूत्र टकळीच्या साहाय्यानं राष्ट्राच्या अंगवळणी सहजपणानं पडण्यासारखं आहे. 

शिक्षणाची माझी छोटी व्याख्या आहे सत्संगती आणि मोठी व्याख्या आहे आत्मज्ञान 

ज्वारी जोरदार उगवली तर तिला कणसं धरत नाहीत. त्याचप्रमाणे बळवंतांना स्ववंशवृद्धीची लालसा नसते. अशी लालसा कमजोरांना असते. 

मनुष्य काय करू शकला हे देव पाहत नाही. तो पाहतो कि, मनुष्याला काय करायची इच्छा होती आणि तो काय करू शकला नाही !

आहाराचं धोरण असं असावं कि,देहावर जुलूमही करायचा नाही आणि देहाची आसक्तीही ठेवायची नाही. 

हिंदुस्थानातल्या गुलामगिरीला कांही अंतच नाही. काळे गोऱ्यांचे गुलाम आहेत, स्त्रिया पुरुषांच्या गुलाम आहेत, अस्पृश्य स्पृश्यांचे गुलाम आहेत,खेडी शहरांची गुलाम आहेत,जनावरं माणसांची गुलाम आहेत.... हि यादी हवी तितकी वाढवता येईल. 

ज्या माणसाला त्याचे दोष लक्षात आणून द्यायचे असतील,त्याला एकांतात,नम्रपणे सांगावेत. पाठीमागे फक्त गुणचर्चाच करावी. 

 चार पैसे जोडणे आणि खाऊन-पिऊन सुखी असणे, याला कांही माणसाची उन्नती म्हणता येणार नाही. यात मानवाचं अंत:समाधान सामावलेलं नाही. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income