कल्याणमध्ये नवतेजस्विनी ग्रामोत्सव सप्ताह

नागरिकांना सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन 

ठाणे :- 

आज राज्यातच नव्हे तर देशभरात महिला बचत गटाचा बोलबाला होत आहे. या बचत गटांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबांतील महिला भगिनी सक्षम होत असून स्वतःच्या पायावर उभे राहत आहे. बचत गटाच्या विविध उत्पादनातून आर्थिक घडामोडीला चालना मिळत आहे. राज्यातही महिला बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविमच्या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये दि. 29 मार्च ते 2 एप्रिल 2023 दरम्यान बचत गटांच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीचे नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव साजरा होणार आहे. या ग्रामोत्सवाच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळ व बचत गटांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा....

 

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमहा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहेआंतराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने २४ फेब्रुवारी १९७५ रोजी या महामंडळाची स्थापना कंपनी कायदा १९५६ अंतर्गत झालीमहिलांच्या सर्वांगीण विकासाचे महत्व  महामंडळाची या कामातील तज्ञता ध्यानी घेऊन महाराष्ट्र शासनाने २० जानेवारी २००३ रोजी महामंडळाला महिला विकासाची राज्यस्तरीय शिखर संस्था म्हणून घोषित केले आहे.

 

माविमचे ध्येय चिरंतर विकास प्रक्रियेतून महिलांसाठी सामाजिक, आर्थिक  राजनैतिक न्याय प्रस्थापित करणे हे आहेमहिलांचे संघटन करणेमहिलांच्या क्षमता विकसित करणेमहिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणेउद्योजकीय विकास घडवून आणणेरोजगाराच्या संधी  बाजारपेठ यांची सांगड घालणे, महिलांचा शिक्षणसंपत्ती  सत्तेत सहभाग वाढविणेस्थायी विकासासाठी स्वयंसहाय्य बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे हा माविमचा उद्देश आहे.

 

राज्यात 1.62 लाख बचत गटात सुमारे 20 लाख महिलांचा सहभाग

माविमने सन १९९३ पासून महिला विकासाचे शाश्वत माध्यम म्हणून स्वयंसहाय बचत गट व त्यांच्या फेडरेशनमार्फत संस्थात्मक बांधणी या रणनीतीचा अवलं केला  महिलांना संघटि केले.  परिणामी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात मिळून शहरी  ग्रामीण भागात .६२ लाख स्वयंसहाय्य बचत गटांच्या माध्यमातून जवळ महिलांचे २०.१९ लाख महिलांचे जाळे माविम मार्फत उभे राहिलेले आहेबचत गटांच्या माध्यमातून महिलांनी एकूण रु. २९९५.७८ कोटी इतकी बचत केलेली आहे. त्याचप्रमाणे बँकांच्या माध्यमातून एकू रु. ६६४०.७१ कोटी इतक्या कर्जाचे वितरण करण्यात  आले आहे. बँक परतफेडीचे प्रमाण ९९राखून ठेवण्यात माविमला यश आलेले आहेयापैकी बहुतांश महिला या सामाजिकभौगोलिक  आर्थिकदृष्ट्या तळाच्या समाजातून आहेत.

 

स्वयंसहाय्यता महिला बचत गट व ग्रासरूट इन्स्टिट्यूशन अर्थात लोकसंचलीत साधन केंद्र (महिला बचत गट फेडरेशन) या नावाने संबोधण्यात येते. हे केंद्र स्वतःच्या विकासाबरोबर गावाच्या  वस्तीच्या विकासाचा अजेंडा हाती घेत आहेतहिला चत गट  त्यातील सहभाग महिलांना त्यांच्या विकासाच्या पुढच्या टप्प्यावर आवश्यक असलेल्या सेवा पुरविण्याचे माध्यम म्हणून महाराष्ट्रात ३६१ लोकसंचालीत साधन केंद्र (महिला बचत गट फेडरेशनस्थापन करण्यात आली आहेही केंद्रे नोंदणीकृत संस्था असून आपल्या सभासदांच्या बदलत्या गरजांना अनुसरून विविध उपक्रम राबवि आहेत.

 

माविम ठाणेची कार्यप्रणाली :-

   माविम ठाणे जिल्हा कार्यालयाची स्थापना सन १९९८ साली झालीआजतागायत विशेष घटक योजनाअल्पसंख्याक योजना, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रममहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान  दिनदयाल अंतोदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान योजना राबविण्यात येत आहेत.

   माविम मार्फत जिल्ह्यात विविध योजने अंतर्गत स्थापन करण्यात आलेले १०,७८३  स्वयंसहायता महिला बचत गट व त्यात संघटित झालेले १ लाख १९ हजार २२५ कुटुंब हे चिरकालीन टिकण्याच्या दृष्टीने लोकसंचलित साधन केंद्र  शहरस्तरीय संघ ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या आधारे सद्य:स्थितीमध्ये जिल्ह्यात एकूण १९ ग्रामीण   शहरी केंद्र उभारण्या आले आहेही सर्व केंद्रे शाश्व होण्याच्या दृष्टीने केंद्राची कार्यकारिणी समिती सदस्य केंद्राचे व्यवस्थापक  त्यांच्या अधिनिस्त कार्यरत असलेला इतर कर्मचारी वर्गतालुका स्तरीय  जिल्हा स्तरीय अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील असतात.

 

लोकसंचलीत साधन केंद्राचा उद्दे :-

१.     महाराष्ट्र शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेस हातभार लावणे.

२.     महिला बचत गटांना तसेच गटातील गरीब व गरजू महिलांना उपजीविकेसाठी व्यवसाय उपलब्ध करून देणे.

३.     गटाच्या व गट सदस्यांच्या उत्पनात वाढ.

४.     गटांना व महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे.

५.     महिलांचा आर्थिक विकास व सामाजिक विकास करणे.

 

        महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातू स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून महिलांना त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बचत गटातील सदस्यांना उपजीविकेच्या माध्यमांची संधी निर्माण करणे, तसेच त्यांचे सुरु असलेल्या व्यवसायामध्ये मूल्य वृद्धी करणे, स्थानिक बाजारपेठ व्यतिरिक्त विस्तारित विपणन जाळ्यात सहभागी करून घेणे, त्याचबरोबर उत्पादित माल विक्रीसाठी विविध स्तरावर प्रयत्न करणे असे विविध प्रकारचे साध्य वृद्धिंगत करणे व दारिद्रय निर्मुलन आणि महिला सक्षमीकरणाशी निगडीत उपक्रमांची अमलबजावणी अधिक विस्तारित स्वरुपात करण्यासाठी नवतेजस्विनी- महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

लोकसंचलीत साधन केंद्रामार्फत गा पातळीवर राबविण्यात येणारे उपक्रम

१) कृषी सेवा केंद्र - मागील पाच वर्षापासून ठाणे जिल्ह्यात चार कृषि सेवा केंद्र लोकसंचलित साधन केंद्रामार्फत चालविले जात आहेत. त्यातून महिला शेतकऱ्यांना स्वस्त व रास्त दरात बि-बियाणे व खते ही हरितवाहना (पिक अप) मधून शेताच्या बांधापर्यंत पोहच केली जातात. या सर्व कृषी सेवा केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन महिला स्वतः यशस्वीपणे करतात. यामाध्यमातून वेळेत कृषी निविष्ठा पोहोच करणे सोबतच अल्प दरात निविष्ठा पुरवल्याने उत्पादन खर्चात बचत होते.

२) शेतमाल खरेदी विक्री प्रकल्प – ठाणे जिल्ह्यात एकूण 3 शेतमाल खरेदी विक्री प्रकल्प कार्यरत असून त्यात शेतकऱ्याचा विविध प्रकारचा शेतमाल जसे कितांदूळ, काळा तांदूळ, कडधान्य, ताजी भाजी व फळे खाद्यपदार्थ संकलित करून बाजारपेठेत व शहरी भागातील मोठ्या सोसायटीमध्ये सामुहिक विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातो. एक दिवसा आड किमान १० टन भाजीपाला, शेतमाल संकलित करून खरेदी विक्री संघात व सोसायटीमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो.

       ३) कृषी अवजार बँक - शहापूर तालुक्यातील चार लोकसंचलित साधन केंद्राना कृषि अवजारे बँक प्राप्त झाली आहेत. अनुसूचित जमातीतील आदिवासी समाजाच्या महिला शेतकऱ्यांना स्वस्त व रास्त दरात कृषि औजारे गाव पातळीवर उपलब्ध करून दिले जात आहेतत्यामुळे महिलांचे शेतीतील कष्ट कमी होवून शेती उत्पनात वाढ होत आहेमहिलांच्या शेतामध्ये विविध प्रकारचे डेमो उभारणीसाठी प्रयत्न केले जाते.

        ४दाल प्रक्रिया प्रकल्प - ठाणे जिल्ह्यात एकूण 1 दाल प्रक्रिया प्रकल्प कार्यरत असून त्यात शेतकऱ्यांच्या डाळवर्गीय कडधान्य पिकांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे प्रस्तावित आहे. यामध्ये तूर, मुग चना आणि उडीद यांच्या डाली करून विकणे प्रस्तावित आहे.

        ५) गारमेंट युनिट - ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका हा गारमेंट लूम सेक्टर म्हणून ओळखला जातो. बचत गटातील महिला या अधिक प्रमाणात शिवणकाम करतात. हा धागा पकडून महिलांना गावातच स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून 2 गारमेंट युनिट उभारण्यात आले असून 48 हायटेक शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातून सद्यस्थितीत प्रती महिलेला रोजगार मिळतो आहे.

        ६रुरल मार्ट, ठाणे - महिलांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ जिल्हा स्तरावर उपलब्ध करून द्यावा यासाठी ०१ रुरल मार्ट स्थापित करणे प्रस्तावित आहे त्यातून ग्रामीण भागात उत्पादित होणाऱ्या उत्पादनास बाजारपेठेत ओळख निर्माण होऊन योग्य बाजारपेठ व दर मिळण्यास मदत होईल.

या सर्व सामुहिक उद्योगांसोबत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून लाभार्थी अन्न प्रक्रिया उद्योगातील सक्रिय महिला उद्योजकांनी स्वतः उत्पादित केलेला माल तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत उद्योग उभारलेल्या महिला उद्योजकांचे उत्पादने लोकांपर्यंत पोचविण्यासाठी माविम प्रयत्नशील आहे.

        ७)  मदर युनिट - जिल्ह्यात एकूण २००० पक्ष्यांचे 10 पोल्ट्री मदर युनिट असून प्रत्येक युनिट मधून महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच या मदर युनिट मार्फत परसबागेतील कुकुट पालन व्यवसायास ब्लॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजेससाठी सहाय्य केले जाते.

कल्याणमधील प्रदर्शनात विविध वस्तूंचे विक्री तसेच प्रदर्शन

ठाणे महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, तसेच ग्राहकांना थेट त्यांच्यापर्यंत दर्जेदार माल पोहचावा, यासाठी दिनांक २९ मार्च ते २ एप्रिल २०२३ रोजी स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असलेल्या कल्याण शहरातील गजबजलेल्या वायले नगर येथे पाच दिवशीय नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या प्रदर्शनीमध्ये सर्व बचत गटांमधील मधील ग्रामोत्पादने प्रदर्शन तसेच विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन हे स्थानिक लोक प्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचे हस्ते करण्यात येणार असून या ग्रामोत्सवात 3 दिवसात विविध माहितीपर कार्यशाळा तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण महिलांमार्फत उत्पादित माल शहरातील नागरिकांपर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. कल्याणमधील नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून बचत गटांच्या या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन माविमच्या वतीने करण्यात आले आहे.

- जिल्हा माहिती अधिकारी ठाणे 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income