आर.टी.ई प्रवेश नोंदणीसाठी १० मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ


ठाणे दि.४ (जि.प):  शासनाने दिलेल्या सुचनेनुसार १० मार्च २०२२ पर्यंत आर.टी.ई  प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज विहित मुदतीत भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.  

जिल्हात आर.टी.ई प्रवेशास उत्तम प्रतिसाद मिळत असून आजअखेर एकूण २७४५५ बालकांचे प्रवेशासाठी अर्ज आले आहेत. त्यापैकी २०२५६ अर्जांची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून ७१९९ अर्जांची नोंदणी विविध कारणानी अद्याप अपूर्ण आहे.

आर.टी.ई प्रवेशाची वयोमर्यादा निश्चित

तसेच सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता आर.टी.ई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी शासनाने वयोमर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये प्ले ग्रुपसाठी ४ वर्ष ५ महिने ३० दिवस, ज्युनियर केजीसाठी ५ वर्ष ५ महिने ३० दिवस, सिनियर केजीसाठी 6 वर्ष ५ महिने ३० दिवस आणि पहिलीसाठी ७ वर्ष ५ महिने ३० दिवस अशी कमाल वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे.

सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण 648 शाळा पात्र असून इयत्ता १ ली साठी  11469    पूर्व प्राथमिकसाठी 798 जागा उपलब्ध आहेत . पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या शासनाच्या संकेतस्थळावर बालकांचे प्रवेश अर्ज नोंदणी करायची आहे.

या प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पंचायत समिती  व महानगर पालिका स्तरावर मदतकेंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers) , ऑन लाईनप्रक्रियेत  अर्ज नोंदणीबाबत  मार्गदर्शक पुस्तिका (User Manual) , आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income