भारतात पैसा गुंतवला ही चूक ? :- केतन कक्कड


अनिवासी भारतीय केतन कक्कड यांनी अमेरिकन न्यूज पोर्टलला  दिलेल्या मुलाखतीचा गोषवारा 
मुंबई : (बाबुराव खेडेकर)
अमेरिकेत 28 वर्षे व्यवसाय करून बेस्ट इंडियन ज्वेलर्सचा सन्मान मिळविलेले केतन कक्कड सध्या गेली 7 वर्षांपासून मायदेशी परतले आहेत. मात्र त्यांच्या उतारवयात हॅपी इंडिंग न होता  पनवेल मधील वृंदावन फार्म या हॉर्टिकल्चर सोसायटीमध्ये जमीन खरेदीसाठी गुंतवलेली आयुष्यभराची जमापुंजी सलमान खानच्या भाईगिरीमुळे अडचणीत आली आहे; त्यामुळे प्रशासन, न्यायालय आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे ते दाद मागता आहेत मात्र देशातील बाबूशाही आणि भ्रष्टाचार याला कंटाळून त्यांनी उद्विग्न होत भारतात पैसा गुंतवला ही चूक झाली का ? असा प्रश्न अमेरिकन न्यूज पोर्टल वरून कपूर शोमध्ये उपस्थित केला आहे. सदर पोर्टलवर लाखो अनिवासी भारतीय असून हजारो एनआरआयची     प्रत्यक्ष शोमध्ये उपस्थिती होती. सध्या सोशल मीडियावर हा शो व्हायरल होत आहे. सदर मुलाखतीत कक्कड यांनी अनिवासी भारतीयांना एकत्र येन्याचे आवाहन केले आहे. जवळपास 2 करोड अनिवासी भारतीयांचे प्रतिनीधीत्व सत्तेत नसल्याने त्यांना कोणी वाली नाही , केवळ त्यांची गुंतवणूक सरकारला हवी असते मात्र त्यांच्या समस्यांकडे सोयीस्कर रित्या डोळेझाक केली जाते त्यामुळे 6 महिने अनिवासी भारतीयांनी पैसे देने बंद करावेत असे आवाहनही त्यांनी केले. 
         अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को शहरातील वरून कपूर या होस्टचे लाखो फॉलोअर्स आहेत. अभिनेता सलमान खान याला अभिनेता सुशांत सिंग राजपूत, पोलीस रवींद्र पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवत न्यायाची मागणी तसेच नागरिकांना जागरूक करण्याचे काम त्यांची टीम करत आहे. याच पोर्टलवर त्यांनी नुकतीच केतन कक्कड यांची मुलाखत घेतली. कक्कड यांनी अनेक धक्कादायक खुलासे सदर मुलाखती दरम्यान केले आहेत. 
      केतन कक्कड यांनी 1995 मध्ये अमेरिकेतील भारतीय वृत्तपत्रातील पनवेलच्या वाजेपुर गावातील माऊंटनवरील वृंदावन फार्मची जाहिरात बघून ला लाईफस्टाईल या कंपनीकडून अडीज एकरचे 3 प्लॉट विकत घेतले होते. येथेच सलीम खान यांनीही जागा घेतली होती. सलमान सलीम याना दुसरा बॉलिवूड स्टार तेथे नको म्हणून त्यांनी कक्कड यांना सहकार्य केले.मात्र 2006 मध्ये जेंव्हा कक्कड कुटुंबीय फार्महाऊस विकसित करण्यासाठी आले तेंव्हा त्यांना धक्कादायक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. त्यांची जागा  प्रायव्हेट फॉरेस्ट मध्ये गेल्याचे त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले; परिणामी त्यांना वीज पुरवठा दोन वेळा मंजूर होवून सुद्धा मिळू शकला नाही. यामध्ये वरवर पाहता ही फसवणूक ला लाइफस्टाइल कंपनीमार्फत झाल्याचे वाटेल मात्र यामागे सलमान खान आणि त्यांचे कुटुंबीय असल्याचा खुलासा कक्कड करतात. त्यांच्यामते सलमान कुटुंबियांच्या 5000 कंपन्या त्यांच्या 500 फ्रंटमार्फत चालविल्या जातात. त्यापैकीच ही एक कंपनी असून कक्कड यांनी आपली जमीन मिळविण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे पाठपुरावा केला असता सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात पाठवण्यात आले; जिल्हाधिकारी सलमान खान च्या फॅन असल्यामुळे याप्रकरणी न्यायादानात दिरंगाई होत असल्याचा कक्कड यांनी आरोप केला आहे . दरम्यान सलमान खानने कक्कड कुटुंबियांचा त्यांच्या जागेवर जाण्याचा रस्ता अडवत मोठा मजबूत गेट बनवला; याप्रकरणाच्या पोलीस चौकशीत कक्कड यांचे घर व मंदिर सुरक्षित असल्याचे अहवाल नोंदी असून रस्त्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचे  सुचविलेले दिसते. वनाविभागामार्फत झालेल्या चौकशीत वनाधिकारी यांनीही न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. सदर वनाधिकारी यांची 10 दिवसात बदली करण्यात आली असून वाढीव वेतन रोखन्यात आलेच शिवाय 8 महिन्यांचा पगारही थकवण्यात आला आहे त्यामुळे तेही न्यायालयात गेले आहेत. 
       सलमान खानच्या विरोधातील या लढाईत कक्कड यांच्या हाती एक प्रलंबित न्यायालयीन केस  लागली; 1999 मध्ये सलमान खानच्या अर्पिता फार्म हाऊस वर ब्लॅकबक, चितळ आणि मोर आढळले होते ती केस. यामध्ये ब्लॅकबकच्या मृत्यूस सलीम खान यांना जबाबदार धरण्याची मागणी आहे. सदर प्रकरणात सलीम खान सोबत इतर सर्व कुटुंबियांची नावे समाविष्ठ करा अशी मागणी कक्कड यांनी पनवेलच्या सेशन कोर्टात केली आहे.  याही प्रकरणात तारीख पे तारीख मिळत आहे. 
        कक्कड कुटुंबीय सध्या त्यांच्या गणपती मंदिराला गणेशोत्सवापूर्वी वीज मिळावी यासाठी प्रयत्न करत असून फॉरेस्ट मधून पोल न टाकता झाडावरून वायर खेचून वीज द्या अशी त्यांची वाजवी मागणी आहे. यामध्ये सध्या साध्वी सरस्वती यांनी ही त्यांना समर्थन दिले असून येत्या काळात याप्रकरणी काय शेवट होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
       सदर मुलाखतीत कक्कड यांनी केंद्र सरकारला अमेरिकेच्या इतर गोष्टींची जशी नक्कल करता तसेच कायदा व सुव्यवस्था हे ही शिका असा सल्ला दिला आहे. सॅटेलाईट सोडणारा भारत पनवेलच्या फॉरेस्टमध्ये होत असलेल्या अवैध कामांवर नियंत्रण ठेवू शकत नाही ? असा थेट सवाल करत कक्कड यांनी अनिवासी भारतीयांना सफेद आतंकवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. इमेज करेक्शन साठी बिइंग ह्युमन सारख्या संस्था काढून सामाजिक काम करण्याचे ढोंग सुरू असल्याचे वरून कपूर यांनी शेवटी सांगितले त्याला प्रतिसाद देताना कक्कड यांनी हा देश गरीब नसून काही लोकांनी भारतीयांना गरीब ठेवले आहे असा मार्मिक टोला लगावला आहे.  एकंदरितच कक्कड यांच्या या उद्विग्न प्रतिक्रियेनंतर शासन प्रशासनाने व मुख्य प्रवाहातील प्रसिद्धी माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income