गणपती बाप्पांची पनवेल वाजापूरच्या डोंगरावर प्रतिष्ठापना व्हावी :- साध्वी सरस्वतीजी

 गणपती बाप्पांची पनवेल वाजापूरच्या डोंगरावर प्रतिष्ठापना व्हावी :- साध्वी सरस्वतीजी 

मुंबई: (बाबुराव खेडेकर) 

इतिहासात पहिल्यांदाच हिंदू शेरणी साध्वी सरस्वतीजी यांनी पनवेल मधील एका खाजगी जागेच्या अनुषंघाने सुरू असलेल्या वादात उडी घेत जाहीर आवाहन केले आहे. 

साध्वी सारस्वतीजी मुंबईच्या प्रवासावर आहेत. त्यांच्या 51000 श्री यंत्र अनुष्ठान संकल्पाला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी नुकत्याच शुभेच्छा दिल्या. मुंबईत त्यांनी अनिवासी भारतीय केतन कक्कड यांची भेट घेतली. कक्कड हे गेली अनेक वर्षांपासून अभिनेता सलमान खान च्या अर्पिता फार्महाऊसच्या वरील बाजूस असलेल्या त्यांच्या अडीज एकर जागेबाबत लढा देत आहेत. हा लढा न्यायालयीन आहेच शिवाय येथे सलमान खान द्वारा अनधिकृत गेट बनवून त्यांच्या जागेवर जाण्याचा रस्ता अडवण्यात आला आहे तसेच प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणून सदर जागेवर वीज पुरवठा देण्यासाठी मज्जाव कऱण्यात येत आहे . 

सदर जागेवर गणपती बाप्पांचे म्युझिअम बांधणार असल्याचा संकल्प कक्कड यांनी सोडल्यामुळे साध्वी सरस्वतीजी यांनी सलमान खान यांना तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदि आणि भारत वासीयांना आवाहन करत गणेशोत्सवपूर्वी हा विषय संपवण्यासाठी पुढे येण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बॉलिवूड नमः आणि न्यू हिंदुस्थान कामगार सेनेने पाठिंबा देत याप्रकरणी सलमान खान यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

https://youtu.be/J2jwdNBbC1E

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income