मराठा मोर्चा पाहून पोटशूळ उठलेल्या गल्लीबोळातल्या तमाम विचारवंतांना .....

मराठा क्रांती मूकमोर्चानें सामाजिक वातावरण ढवळून निघाले ! अनेक आरोपांचा समाचार घेणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली ती अशी !

आपल्या अकलेचे तारे तोडून मराठा मोर्चावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष टीका करण्यापूर्वी काही गोष्टी समजून घ्या!विषयाची जाण नसताना देखील श्वानाला लाजवेल असे भुंकने प्रथम बंद करा!मराठा समाजाने आजपर्यंत जे कमावले ते स्वतःच्या हिमतीवर अन कर्तृत्वावर!तुमच्या सल्ल्याची गरज आम्हाला भूतकाळात पण नव्हती अन भविष्यकाळातही ती असणार नाही!त्यामुळे सोशियल मीडियावरून फुकटचे सल्ले देऊन आपला अन आमचा,दोघांचा वेळ कृपया वाया घालवू नका! त्यामुळे फेसबुक,व्हाट्सअप अन तत्सम मीडियावर पोस्ट अथवा कोंमेंट टाकून आपली उर्जा,आपला बहुमूल्य वेळ खर्च करण्यापेक्षा तोच वेळ अन तीच ऊर्जा आपल्या समाजाच्या अथवा कुटुंबाच्या उत्कर्षासाठी अथवा उन्नतीसाठी खर्च केली तर फार बरे होईल!

1) शिक्षणाअभावी मराठा समाज मागे पडला आहे असा जावईशोध काही बुद्धिवंतांनी लावला आहे!ह्या महापुरुषांनी MPSC, UPSC अन तत्सम परिक्षांमधील मराठा उमेदवारांचा टक्का पहावा अन मगच अकलेचे तारे तोडावेत ही नम्र विनंती!दुसरे असे जर यदाकदाचित आमचा समाज मागे जरी पडला असेल तर तो पुढे कसा आणायचा ते आमचे आम्ही पाहून घेऊ!इतरांना त्याची पोकळ चिंता नसावी!

2) मराठा समजाचाचे मोर्चे हे कोणत्याही ही विशिष्ट जाती अथवा धर्मा विरुद्ध नसून तो त्यांचा स्वतःच्या हक्कांसाठी उभा केलेला एक व्यापक लढा आहे!त्यामुळे उगाचच तुमच्या जातीय पोस्ट अथवा कोंमेंट करताना "मराठा समाज" असा उल्लेख करून आम्हाला हकनाक डीवचू नाका!

3) काही विध्वांनांच्या बुडाखाली मोर्चात सहभागी होण्यासाठी वापरलेली वाहने जसे की Fortuner, Xuv, Scorpio, Innova, Safari पाहून आग होत आहे!अश्या विध्वांनांना माझे एवढेच सांगणे आहे की १२ कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात ३२ टक्के म्हणजेच ३.८४ कोटी मराठा बांधव आहेत,ह्या सगळ्याकडे SUV आहेत का,तेवढा अभ्यास करावा अन मगच आपली अक्कल पाजळावी!अन हो,जे कोण ह्या गाड्या घेऊन आले ते काही चोर दरोडेखोर नव्हते!कष्ट करून,घाम गाळून कमावलेल्या पैशाच्या गाड्या आहेत त्या!

4) आम्हाला आरक्षण हवे आहे कारण भूमिपुत्र असणारा माझा मराठा बांधव हा निसर्गाच्या अवकृपेमुळे अन वाढत्या महागाईमुळे पिचत चालला आहे!आम्हालाही आमच्या मुलामुलींचे उज्वल भविष्य घडवायचे आहे!दिवसेंदिवस महागडे होत चाललेले शिक्षण हे माझ्या अनेक बांधवांच्या आवाक्याबाहेर चालले आहे!

5) आजपर्यंत मराठा नेत्यांना अन राजकारण्यांनी मराठा समाजाला अंधारात ठेवले असे काही आतिशाहण्या विचारवंतांचे म्हणणे आहे!त्यांना एवढेच सांगू इच्छितो,कृपया आमच्या अंधाराची आपल्याला चिंता नसावी!आम्हाला आपल्या प्रकाशाची कधीच गरज नव्हती अन असणार ही नाही!आपली जी काही अक्कल आहे ती आपण आपल्या समाजाच्या उनत्तीसाठी खर्ची केली तर किमान आपल्या समाजाचाच तरी उत्कर्ष होईल!

6) "ज्याच्या अंगी गुणवत्ता तोच वर जाईल त्यामुळे आरक्षणची कुबडी मागणे कितपत योग्य आहे"असे ही काही थोर बुद्धिवंतांचे म्हणणे आहे!मला अश्या लोकांना एवढेच सांगावे वाटते वर्षानुवर्षे शाळा,कॉलेज,नोकरी,मंदिरे ह्यामध्ये आपण ज्या आरक्षणाच्या कुबड्या वापरून आपल्या अनेक पिढ्यांचे भले केले आहे त्यामुळे आपण ह्या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावून बसला आहात!

7) जातीयवादात रंगलेली काही गांडुळं केवळ ब्राम्हण मुख्यमंत्री असल्याकारणाने मराठा समाज मोर्चे काढत आहे असाही युक्तिवाद करत आहेत!त्यांना एवढेच सांगणे आहे,पूर्वी असणाऱ्या सरकारने कसले का असेना,घाईगडबडीत का होईना आरक्षण दिले!त्यामुळे मोर्चे काढायची वेळ आली नाही!अन आताच्या सरकारने ते आरक्षण प्रकरण जेव्हा कोर्टात गेले,तेव्हा मराठा समाजाची बाजू मांडण्यात जाणीवपूर्वक ढिलाई केली,त्याचा बद्दल असणारा राग ह्या मोर्च्यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे!

8) काही घरी खायला अन्न नसणारे फुटकळ विचारवंत मराठा समाज्याच्या लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आरक्षण मागण्याला भीक मागणे म्हणत आहेत!त्यांना एवढेच सांगणे आहे हा अवघा महाराष्ट्र हा माझ्या "शिवबाने" मराठी जनतेला आंदण म्हणून दिला आहे त्यामुळे भिकारी कोण अन दाता कोण हे ज्यानेत्याने ठरवावे!

9) काही थोर गणिततज्ञ म्हणतात मराठ्यांच्या मुलांना ४५% गुण मिळतात म्हणून त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत,मराठ्यांचे नोकरीतील प्रमाण हे ५० टक्क्यापेक्षा जास्त आहे,मराठ्यांनी ६० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले इ. असे अनेक विधाने करून आपली बौद्धिक दिवळखोरीचे प्रदर्शन करतात!त्यांना माझे एवढेच सांगणे आहे की स्पर्धा परीक्षेत मराठा उमेदवाराला मिळणारे मार्क्स अन प्रत्येक्षात नोकरी किती मार्क्स पडणाऱ्याला भेटते हे ही पडताळून पाहावे!अन राहिला विषय १८ पैकी १२ मराठा मुख्यमंत्री असण्याचा अथवा ६० वर्ष राज्य करण्याचा तर ते लोकशाही पद्धतीने केले आहे कुणाच्या नारड्यावर तलवार ठेवून नाही!

10) मागे एकदा काश्मीरमध्ये गेलो असताना तेथील एका मुस्लिम हॉटेल चालकाने मला मराठा म्हणजेच मरहठ्ठा (मरेगा लेकिन हटेगा नाही) असा अर्थ सांगून माझ्या ज्ञानात भर घातली होती!असा हा ३.८४ कोटी मराठा समाज हा प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणूच शांत आहे!त्यामुळे कृपया आमच्या संयमाचा अंत पाहू नका!

11)काही अक्षम्य पांचट लोक मराठा समाजाला काही काम नाही का असे म्हणून महाराष्ट्रात निघालेल्या ५७ मोर्च्यांची अन मुंबईत काल निघालेल्या महामोर्चाची टर उडवायचा विफल प्रयत्न करत आहेत!त्यांना एवढेच सांगणे आहे ज्यांची १००-१५० लोक एकत्र संगठीत करायची लायकी नसते त्यांनी असे बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करण्यासारखे झाले!शेवटी थोबाड तुमचेच रंगणार आहे,सूर्याला घंटा काहीही फरक पडणार नाही!

12)विचार करा आजपर्यंत कधी न थांबलेली मुंबई केवळ मराठा बंधवांच्या मूक मोर्च्यापुढे झुकली!जर भविष्यात ह्या मूक मोर्च्याला वाचा फुटली तर काय होईल ह्याचे परिणाम विचारकरण्यापालिकडचे आहेत!

13)सगळयात महत्वाचे मराठा मोर्च्यांचा मागे संघ आहे अथवा मोदींचा हाथ आहे अथवा शरद पवारांची फूस आहे असले गावातील चवडीवरचे अथवा शहरातील चौकातील युक्तिवाद बंद करा अन मोर्च्यांचे संगठन,मोर्च्यांची शिस्त,मोर्च्यांतील सहभाग,अन मोर्च्यांतील स्वच्छता पाहून आपल्या समजाच्या उत्कर्षासाठी काही पॉजिटिव्ह घेता येईल का ते पहा!

14)जेव्हा १०-१५ घरे असणारा समाज एकत्र येऊन आपल्या समाजातील लोकांना मदत करतो,समाजमंदिर बांधतो,आपल्या समजातील महापुरुषांचे पुतळे उभारतो तेव्हा ते समजाचे काम असते ह्याविरुद्ध वर्षानुवर्षे विस्कळीत असणारा मराठा समाज कधीनव्हे ते एकत्र येऊन जेव्हा कुणालाही कसलाही त्रास न देता जेव्हा स्वतःच्या हक्काची लढाई लढतो तेव्हा तो जातीयवाद कसा होतो हे माझ्यासारख्या पामराला न उलगडणारे कोडे आहे!

15)शेवटी एवढेच म्हणेन आम्ही कधीही जातीयवाद केला नाही अन करणार ही नाही कारण तसे असते तर १२ कोटी पैकी ३.८४ कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात भाजप कधीही सत्तेत आले नसते!कुणीही कितीही थयथयाट करो पण महाराष्ट्रच्या सत्ताकारणाची चावी ही केवळ मराठ्यांच्या हातात आहे हे त्रिकालबाधित सत्य आहे!

You Can Avoid Us!
You Can Ignore Us!
But You Can't Simply Write-off Us!👊👊👊👊👊


आपलाच,
एक मराठा लाख मराठा

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income