सिराजेमच्या थर्मल मसाज सेंटरची मोफत सेवा

सिराजेम तंत्रज्ञानाचे पनवेलकरांना आकर्षण 
सिराजेमच्या थर्मल मसाज सेंटरची मोफत सेवा 
दिवसाला 300 नागरिक घेतात लाभ 
पनवेल { बाबुराव खेडेकर }
           मणक्याचे आजार हा सार्वधिक वेगाने वाढणारा देशातील आजार आहे. व्यायामाची कमतरता आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मणक्याचे वेगवेगळे आजार पाहायला मिळतात. निरोगी लोकांना सुद्धा पाठदुखी जाणवते;त्यामुळे मसाज करून घेणे हे अपरिहार्य ठरते. याविषयात सर्वांसाठी एक खुशखबर आहे. पनवेल मधील सुरुची हॉटेल समोर गुरुकृपा इंटरनॅशनल ट्रेडर्स या कंपनीने आपले सिराजेम तंत्रज्ञानाचे थर्मल मसाज सेंटर मोफत सेवा देत आहे. मुळात येथे थर्मल मसाजच्या इलेक्ट्रॉनिक मशीनचा  डेमो  दिला जातो. हा डेमो सेवेचा लाभ  दररोज 300 पनवेलमधील नागरिक घेत आहेत. जिल्ह्यातील हे एकमेव केंद्र असून सिराजेमची राज्यात 46सेंटर कार्यरत आहेत. 
            माऊथ पब्लिसिटी वर भरोसा ठेवणाऱ्या कंपन्या बाजारात फार कमी आहेत . आरोग्यसेवेत हा प्रयोग तर विरळाच. पनवेलमध्ये मात्र एका थर्मल मसाज सेंटरने साऱ्यांनाच वेड लावले आहे. अगदी ग्रामीण भागातूनही नागरिक दररोज मसाज घेण्यासाठी पनवेलला येत आहेत. सिराजेम या महेंद्र जांभळे यांच्या सेंटर बद्धल सर्वत्र चर्चा सुरु आहे. 5 तत्वांची अनोखी मशीन त्यांच्या या सेंटरमध्ये आहे. मसाज,एक्युप्रेशर,हिट,कायरोट्रॅक्टीक आणि फार इन्फ्रारे हि ती पाच तत्वे आहेत. यातील प्रत्येक तत्व भारतात आयुर्वेदानुसार  वेगवेगळे वापरले जाते. मात्र यातील कायरोट्रॅक्टीक हि अमेरिकन उपचार पद्धती असून दबलेल्या नस ओपन करण्यासाठी उपयुक्त अशी हि थेरपी आहे. या मशीनमध्ये झेड हा  कोरिया,बर्मा आणि कॅलिफोर्निया येथे आढळणारा विशिष्ट दगड आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने हलकेशे मसाज होतानाच इतर पाच तत्वांची अनुभूती येथे घेता येते. त्यामुळे रुग्णाला तसेच पाठदुखी वाल्या नागरिकांना आराम मिळतो. याठिकाणी व्ही 3 आणि आरएल 1 या दोन प्रकारच्या मशीन आहेत.  एकावेळी 15 नागरिकांना मसाज घेता येईल एवढा मोठा सेटअप त्यांनी निर्माण केला आहे. 
           हे तंत्रज्ञान देणाऱ्या जगात 150 कंपन्या आहेत मात्र भारतात त्यातील केवळ 4 कंपन्या उपलब्ध आहेत. सिराजेम हि भारतातील सर्वप्रथम सेवा देणारी  कंपनी आहे. नागरिकांना या मशीनचा लाइफटाइम फ्री डेमो देण्याचा निर्धार कंपनीचा असून जोपर्यंत या मशीनचा फायदा होऊन विश्वास बसत नाही तोपर्यंत हि मशीन विक्री कंपनी करीत नाही. याशिवाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा हि मशीन विकत घेण्यास विरोध असेल तरीही मशीन विकली जात नाही. या मशीनची किम्मत 2 लाख 35 हजार असून गेली 2 वर्षात पनवेलमध्ये सिराजेमच्या 35 मशिन्स विकल्या गेल्या आहेत. हि नवी मसाज थेरपी एकवेळ सर्वानाच अनुभवायला हरकत नाही. अधिक माहितीसाठी www.ceragem.co.in या वेबसाईटवर किंवा 18001020203 या टोलफ्री नंबरवर संपर्क करू शकता. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income