हे कसले गुप्त मतदान ?

बिनविरोध निवडणूक म्हणजे लोकशाहीचा खून !
निवडणूक आयोग बक्षिसाचे गाजर दाखवून बिनविरोध निवडणुकीचा पर्याय ठेवते हा लोकशाहीचा अपमान आहे. मतदारांना गृहीत धरण्याचे आणि नेहमीच्याच गावपुढाऱ्यांना  विनाखर्च सत्ता देण्याचा हा डाव आहे. प्रत्येक गावात जातीयवादी/भावकी,गावकी असे विविध गट कार्यरत असतात. त्यागटातील प्रभावी नेत्यांची हुकूमशाहीच लोकशाहीच्या पदरा आडून सुरु असते. पाच वर्षातून एकदा आलेली निवडणूक तथाकथित लोकप्रतिनिधींना आत्मपरीक्षण करायला लावणारी असते. मतदानाचा हक्क बजावून नागरिक आपला कल देतात. मात्र बिनविरोध निवडणुकीचे फॅड आणून हा हक्कच हिरावून घेतला जातो. सर्वच मतदारांनी निवडणुकीत उभे राहण्याची गरज नाही !निवडणुका भावाभावात भांडणे लावते हा सुद्धा बिनबुडाचा आरोप असून सुसंस्कृत समाजाला मूर्ख ठरवणारा हा समज आहे. मतदार दबाव गट तयार करून सत्तेची स्वप्ने बघत नाही तर तो उमेदवार पाहून मत देऊ शकतो नई हेच लोकशाहीप्रधान यंत्रणेत अभिप्रेत आहे. निवडणूक खर्च म्हणून बॅनरबाजी,जाहिरातबाजी,मतदारांना विविध आमिषे देऊन खर्च होतोय असा गोंगाट घालणे चुकीचे आहे. डिपॉसिट अत्यल्पच असते आणि निवडणूक आयोग निवडणुकीचा खर्च करीत असते. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीचे खूळ बाजूला सारून उमेदवार आणि मतदारांनी  निवडणुकीचा आग्रह धरला पाहिजे. 

हे कसले गुप्त मतदान ?
           निवडणुकीत जोपर्यंत आपली विभागवार मते राजकीय पक्षांना यादीस्वरुपात देण्याचे निवडणूक आयोग थांबवत नाही तोपर्यंत हे गुप्त मतदान होवूच शकत नाही. निवडणुकीत मतदाराला वाटते आपण राजा आम्ही पैसे घेवून उमेदवारांनाही फसवु शकतो; मात्र निकालानंतर आयोग किती मते कुणाला कुठे मिळाली याचा खुलासा सर्वच पक्षांना देत असतो त्यावेळी मतदारांच्या भ्रमाचा भोपळा फुटतो ! राजकीय पक्षांना कोणत्या इमारतीत किती मते मिळाली त्यातील आपले कार्यकर्ते किती तसेच कोणत्या गावात किती मते मिळाली हे समजते आणि मग सुरु होते उगाच पक्षपाती वागणूक ! निवडून जाणारा उमेदवार असेल तर तो सर्वांचा एकदम होणे अशक्य तसे न निवडून जाणाराही नखरे करू लागतो. नकाराधिकार वापरला तरी हि पक्षपाती वागणुकीची भीती राहतेच.यावर एकच करण्यासारखा उपाय म्हणजे , मते एकत्र झाल्यावर एकत्रित यादी द्यायची पण त्यात विभागवार मतांची ओळख पटेल असे चित्र दिसता कामा नये. मात्र यागोष्टीला सर्वच राजकीय पक्षांचा विरोध होणार नक्की त्यामुळे येणाऱ्या काळात या विषयावर सुद्धा आंदोलन होण्याची शक्यता आहे !
--बाबुराव खेडेकर
सरचिटणीस/प्रवक्ता-गाव विकास समिती,महाराष्ट्र राज्य 
संपर्क-9702442024

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income