लघु-उद्धोगासाठी लागणारा सय्यमिपना आणि मराठी मानसिकता ...business & marathi people...

लघु-उद्धोगासाठी लागणारा सय्यमिपना आणि मराठी मानसिकता ...business & marathi people..

नवशक्तिया या कौटुम्बिक आणि दखलपात्र वृत्तपत्रासाठी वितरण प्रतिनिधि म्हणून काम करत असताना वृत्तपत्रविक्रेते,ऐजंट यांच्यासोबत कांही अनुभव आले ते न रहवल्याने लिहित आहे ....

बहुतेक मराठी वृत्तपत्रविक्रेते असताना परप्रान्तियानी या व्यवसायातही चांगला जम बसवलाय .पैशा-पैशा चा हा खेळ जमविता जमविता आजही हा दन्यानदाता उपेक्षितच आहे.त्याना हक्काचे स्टोल नाहीत.सरकारचे या संदर्भात निश्छित धोरण नाही.आता बरेच वृत्तपत्रविक्रेते आगळ-पगळ स्टोल राजकारणी,प्रशासकीय यंत्रणा यांच्या कृपाआशिर्वादाने लावतात तो भाग वेगला ! असो,वृत्तपत्रविक्रेते ज्या वृतपत्रासाठी काम करतात त्यांची ताकत एवढी आहे की ते क्रांति घडवू शकतात मात्र तसे का होत नाही? कारण वृत्तपत्रविक्रेता संघाना राजकीय बाज चढ़ल्याने सर्वत्र एकसंधता दिसत नाही ! वृत्तवाहिन्यांचा प्रसार आनी प्रसिद्दी पाहता कांही दिवसानी वृत्तपत्रविक्रेत्याला कोणी विचारणार नाही असा नाराजिचा सुर वृत्तपत्रविक्रेतत्यांचा दिसतोय ! तशी परिस्थिति खरच ठरेल जेंव्हा आपल्या न्यायालयात वृत्तवाहिन्यांचे फुटेज ग्राह्य धरले जाइल.
असो, आपला विषय लघु-उद्धोगासाठी लागणारा सय्यमिपना ! परवाच्या पावसात डेडलाइनमुले ५ वाजता चर्चगेट डेपोवर पोहचलो!पावसामुले कुणाला कांहीच न बोलता वळचनिचा आधार घेवुन पेपर वाचत होतो.थोड्यावेळाने आमची ठरलेली चहा ठरलेला चहावाला घेवुन आला. तो पुरता भिजला होता.पाण्याने सुरकुत्या पडलेल्या हातातील किटलितुन गरम चहाच्या वाफा येत होत्या. त्याचा गरीब चेहरा,वाढलेली दाढ़ी आणि चेहरयावरील बुद्धासारखा कुल भाव पाहून वयाने मोठ्या असनारया त्या माणसाची माझ्यासारख्या भावनिक माणसाला दया एने साहजिकच!(शेवटी मी मराठी तो भय्या ! असे बरयाच जनाबाबत होते )त्याची कटिंग चहा थोड़ी न आवडनारी शिवाय लहान कपामुले प्रतिस्पर्धी चाहावाला मला आकर्षित करत होता पण त्याचा आजचा अवतार पाहून एका मराठी चहाविक्रेत्याची आठवण झाली तो प्रसंग सांगन्यासठी हा उहापोह !

मागील वर्षीचा हा अनुभव आहे .त्यावेळी मी ताडदेव डेपोवर काम करत होतो.असेच एकदिवस असे दिसले की डेपोवर आज चहा घेवुन कोणीतरी मराठी बाजाचा मानुस केविलवाना चेहरा करून फिरतोय ! एक गोष्ट निश्चित केलि की या वाघावर कोणतेतरी संकट आल्याने तो चहा विकतोय पण त्याची मानसिक्त त्याला ज़ुकायला विरोध करत होती.घडले असे , ठरलेला चहावाला(तो ही भय्याच.) असल्याने कोणी याच्या कड़े चहा घेयिना. हा आपला चहा-चहा करत मराठी व्रुत्तापत्रविक्रेत्यांकडे आशेने पाहत पण हा कोण नविन ? अशा अविर्भावात सर्व विक्रेते त्याच्याकडे पाहत.

"याच्याकड़े चहा घ्या! उद्यापासून लवकर येत जा हो!",.परशुराम म्हणाला

परशुराम माजान आवडता एजंट ( तो नवशक्ति चांगला सेल करतो म्हणून न्हवे तर तो माझ्यासारखा साने गुरुजींच्या विचारांचा वाटतो शिवाय त्यांच्याच गावाकडील आहे तो ! खो घालनारया विक्रेत्र्या पेक्ष्या नविन कांहीतरी म्हणून का असेना प्रोत्साहन देणारा परशुराम मला भावला.चहाचे हे सर्व राजकारण चालले होते ३ रुपयांवर (आता तो ५ रु,झालाय )
तात्पर्य हेच की छोट्या माणसांची छोटी स्वप्ने,छोटी भूक आणि त्यांच्यावर आधिकार गाजविनारी, करोडोंचा घोटाला करणारी शिवाय देशोद्धाराची स्वप्ने दाखवणारी मानसे ही तफावत माझ्या देशात कधी संपणार ?
बाबुराव खेडेकर -=९९६९६६८३६६
http://yuvamaharashtra.blogspot.com/

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income