लाईटहाऊस तर्फे कल्याण डोंबिवलीतील सामाजिक संस्थांचा मेळावा संपन्न


डोंबिवली:- कल्याण डोंबिवली महानगरपालिका व लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आयोजित "सामाजिक संस्थांचा मेळावा" दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी डोंबिवली लाईटहाऊस या ठिकाणी पार पडला. 
 
या मेळाव्यामध्ये कल्याण डोंबिवली प्रभागातील ३७ सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शवला असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. चंद्रकांत जगताप, सहाय्यक आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका (फ वॉर्ड) व डॉ.अरुण पाटील एम. एस. संजीवनी हॉस्पिटल, मा. जयश्री कर्वे, डोंबिवली महिला महासंघ हे होते. 

सर्व सामाजिक संस्थांनी "युवक व युवकांच्या बदलत्या करिअर विषयी अपेक्षा" यावर चर्चा करण्यात केली. या सर्व सामाजिक संस्था विविध विषयावर जसे रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, बाल संरक्षण अशा विविध विषयांवर कल्याण डोंबिवली विभागात काम करत आहेत. 

सर्व सामाजिक संस्थांनी आपापल्या कामाबद्दल इतर सामाजिक संस्थांना माहिती दिली जेणेकरून ह्या सर्व संस्था एकत्रितपणे समाज विकासाचे काम करू शकतात. 

कार्यक्रमादरम्यान झोपडपट्ट्यांमधील युवकांसाठी सामाजिक संस्थेने कसे एकत्र येऊन काम करावे याबद्दल मार्गदर्शन मा. श्री. चंद्रकांत जगताप, सहाय्यक आयुक्त, फ वार्ड, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी केले. 

डॉ. अरुण पाटील यांनी आदिवासी विषयी अधिक कामे कशी करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. 

मा. जयश्री कर्वे यांनी महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शनाबरोबर महिला सक्षमीकरणाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमासाठी ३७ सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, डोंबिवली लाईटहाऊस चे प्रभारी केंद्रप्रमुख वैभव कोल्हे व इतर सहकारी उपस्थित होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income