छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित


जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

 

ठाणे :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था/लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने भारत निवडणूक आयोगाव्दारे दि. ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सर्व घटकातील पात्र मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.  

            ठाणे जिल्ह्यात ३ लोकसभा मतदारसंघ व १८ विधानसभा मतदार संघ असून दिनांक ०५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार ठाणे जिल्ह्यात ६२,१४,५१७ इतके एकूण मतदार असून यामध्ये ३३,६७,१२० पुरुष मतदार आणि २८,४६,३१९ महिला मतदार आणि १०७८ तृतीयपंथीय मतदार आहेत.

ठाणे जिल्ह्यात एकूण ६३९१ मतदान केंद्रे असून ५४०२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत.

दिनांक ०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे -

पुनरिक्षण - पूर्व उपक्रम :- 

· मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सुचना तसेच नविनतम IT Application आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी/सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण - दि. ०१ जून २०२३ (गुरुवार) पासून ते दि. २० जुलै, २०२३ (गुरुवार).

· मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याव्दारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी - दि. २१ जुलै, २०२३ (शुक्रवार) ते दि. २१ ऑगस्ट, २०२३ (सोमवार).

· मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण. मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे. तसेच, अस्पष्ट / अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे. विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करुन मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे. कंट्रोल टेबल अद्यावत करणे. - दि. २२ ऑगस्ट, २०२३ (मंगळवार) ते दि. २९ सप्टेंबर २०२३ (शुक्रवार).

· नमुना १-८ तयार करणे. ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रीत प्रारुप यादी तयार करणे - दि. ३० सप्टेंबर, २०२३ (शनिवार) ते दि. १६ ऑक्टोबर, २०२३ (सोमवार).

 पुनरिक्षण उपक्रम :- 

· एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे - दि. १७ ऑक्टोबर, २०२३ (मंगळवार).

· दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - दि. १७ ऑक्टोबर, २०२३ (मंगळवार) ते दि. ३० नोव्हेंबर, २०२३ (गुरुवार).

· विशेष मोहिमांचा कालावधी - दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार.  

· दावे व हरकती निकालात काढणे - दि. २६ डिसेंबर, २०२३ (मंगळवार) पर्यंत.

· अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे. डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई - दि. ०१ जानेवारी, २०२४ (सोमवार) पर्यंत.

· मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे - दि. ०५ जानेवारी, २०२४ (शुक्रवार).

            दिनांक २१ जुलै २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ या एक महिन्याच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या यादीभागातील मतदारांच्या तपशीलाची घरोघरी भेटी देऊन संबंधित कुटुंब प्रमुखांकडून पडताळणी करणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त अ) नोंदणी न केलेले पात्र मतदार (०१ जानेवारी, २०२३ रोजी पात्र), आ) संभाव्य मतदार (०१ जानेवारी, २०२४ रोजी पात्र), इ) संभाव्य मतदार (पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र), ई) एकापेक्षा अधिक नोंदी/मयत मतदार/कायमस्वरुपी मयत मतदार, उ) मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती तपासणी करणार आहे.

            समाजातील कोणत्याही घटकातील पात्र व्यक्ती मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी विविध घटकातील पात्र व्यक्तींना मतदार यादीमध्ये सामावून घेण्यासाठी तृतीयपंथी/देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिला/दिव्यांग/कातकरी/बेघर/भटक्या व विमुक्त जमाती इत्यादी वंचित घटकांतील पात्र व्यक्तीची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विविध शिबीरांचे आयोजन करुन त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे.

 

शाळा / महाविद्यालयातील संभाव्य मतदारांची मतदार नोंदणी होणार असल्याने १७ वर्षावरील युवक/युवतींची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटना, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने मतदार नोंदणीसाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.

            तसेच मतदार / भावी मतदार त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट / मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती / स्थलांतरण/ मयत मतदाराची वगळणी / मतदार यादीत नाव आहे किंवा नाही यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाव्दारे करण्यात आलेल्या voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income