तलाठी पदभरतीसाठी मदत कक्ष


ठाणे, : ठाणे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मदतकक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कळविली आहे.

            महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासन स्तरावर जाहिरात प्रसिद्धीस देण्यात येणार आहे. तसेच तलाठी पदभरती अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभाग व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  त्या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या मदतीसाठी मदतकक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे. या मदतकक्षात तहसीलदार रेवण लेंभे (भ्रमणध्वनी क्रमांक 9766599651) व अव्वल कारकून महेंद्र खोडके (भ्रमणध्वनी क्रमांक 9422895305) यांची नियुक्ती करण्यात आल आहे. तसेच कार्यालयाच्या 022-25345130 या क्रमांकावरही संपर्क करता येणार आहेअसे श्री. परदेशी यांनी कळविले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income