भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन


 

            मुंबई, दि. 20 : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने२६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर 2021 या कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताहाचेआयोजन करण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेचभ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४दूरध्वनी क्रमांक 022-24921212वेबसाईट acbmaharashtra.gov.inईमेल - acbwebmail@mahapolice.gov.in/ addlcpacbmumbai@mahapolice.gov.inफेसबुक - www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप - www.acbmaharashtra.netट्वीटर - @ACB_Maharshtra, व्हॉट्सॲप - 9930997700 येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी अशी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली आहे.

०००

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income