ना नक्षलवाद ना मार्क्सवाद फक्त राष्ट्रवाद !


'लेफ्ट राईट लेफ्ट'चा नाट्यप्रयोग पनवेलमध्ये यशस्वी.... 
उरी हल्ल्यातील शहिदांना अनोखी श्रद्धांजली 
पनवेल:-बाबुराव खेडेकर 
            बहुप्रतीक्षित 'लेफ्ट राईट लेफ्ट' नाटकाचा प्रयोग पनवेलमध्ये निर्विघ्नपणे पार पडला. चर्चेची दारे सदैव उघड्या ठेवणाऱ्या रा स्व संघाच्या विचारधारेने प्रेरित झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पनवेल शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात डावी,उजवी विचारसरणी उलघडण्यात आली.या दोन्ही विचारसरणी भारताच्या असून आपल्या नागरिकांचा कशाप्रकारे बुद्धिभेद  करतात व देशविघातक कृत्ये घडवून आणतात याचे आत्मपरीक्षण करायला लावणारा हा धाडसी नाट्यप्रयोग आहे.या आशयघन नाटकातुन तथाकथित बुद्धिवाद्यांवरही मार्मिक टिका करण्यात आली आहे. हुकूमशाहीपेक्षा लोकशाही कधीही उजवी असा आशावाद नाटकातून व्यक्त केला आहे.मतभेद असतील तर ते व्यक्त करण्यासाठी बंदुका नकोत कर लोकशाही मार्गानेच विरोध व्हायला हवा असा मार्ग नाटकातून दर्शविण्यावर नाट्यनिर्मात्यांना यश आलेले आहे. 
        विद्यार्थ्यांच्या हातातील पुस्तक काढून घेऊन त्याच्या मनावर आपले विचार लादून आपल्या कळपात शामिल करण्यात येत आहे येथून नाटकाची सुरवात होते. संपूर्ण नाटक शोषणमुक्त समाजाचे स्वप्न साकारण्यासाठी साम्यवाद,माओवाद,नक्षलवाद,तत्सम लालक्रांतीच्या आहारी जाऊन  उभ्या ठाकलेल्या तरुणाईचे मतपरिवर्तन हा नाटकाचा मूळ धागा आहे.वैचारिक दहशतवादावर 'लेफ्ट राईट लेफ्ट नाटक हा जबर हल्ला आहे.  बदल हा बंदुकीच्या जोरावरच होतो सामर्थ्याशिवाय जगात सदिच्छेला कोण विचारतो ? असा युक्तिवाद करीत लाल किल्यावर लाल निशाण फडकवायला जाऊ पाहणाऱ्या देशविघातक शक्तींना यासर्वांचा शेवट काय?असा नाटकातील नायक विचारतो. त्यावर कॉम्रेड प्रतिनायक त्याला साम्यवाद हा उपाय सुचवतो. चीन,व्हियेतनाम,कंबोडियाचे उदाहरणे देत नाटकाचा नायक रशियन राज्यक्रांतीनंतर काय साध्य केले असा खडा सवाल करतो. आर्थिक भिंती नष्ट करण्यासाठी हा लढा असून रक्तरंजित संघर्ष हाच अजेंडा फुटीरतावाद्यांच्या मनात कसा दडलेला असतो याचे यथार्थ चित्रण नाटकात केले आहे.  
             योगेश टिळे यांनी साकारलेले पुरोगामी लोकशाहीवादी तरुणाचे पात्र अगदी मनात ठसणारे आहे.कॉम्रेड तेजश्री तेजश्री मुळे हिचे नाटकातील स्वगत स्त्रीशोषणावर भाष्य करते आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडते. बुद्धिभेद झालेला तरुण ते स्वतःची आत्महत्या असा प्रवास आपल्या अभिनयातून जिवंत करणारा हर्षद शेटे याचाही अभिनय मनाला साद घालतो.आडनावावरून जात आणि जातीवरून पुन्हा पूर्वग्रहदूषितपणे विचारांची कवाडे बंद करणे असे होते म्हणून जाणीवपूर्वक नेपथ्य चेतन आणि जयदीप; तसेच संगीत गुरु,यश आणि तेजस असा पात्रपरिचय केला जातोय.या वैचारिक नाटकाचा निर्माता अहमद शेख आहे तर लेखन प्रसाद थोरवे आणि दिग्दर्शन सुमेध म्हात्रे यांनी केले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income