स्वामी गर्जनेची काल आठवण झाली !

चक्र आता फिरून येत आहे. भारतातून पुन्हा एकदा शक्तीचा प्रवाह वाहत आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास त्याला वेळ लागणार नाही. विश्वास ठेवा, प्रभूचे फर्मान निघाले आहे कि भारताची उन्नती होईलच होईल ! सर्वसामान्य जनता आणि गरीब लोक सुखी होतीलच होतील ! भारत पुन्हा उजळेल यात संदेहच नाही. पण जडाच्या शक्तीने न्हवे तर चैतन्याच्या शक्तीने; विनाशाचा झेंडा नाचवून न्हवे तर शांती आणि प्रेमाची विजयी पताका फडकवून. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली हि भारतमाता हळूहळू नेत्र उघडत आहे. ती कांही काळ   निद्रिस्त झाली होती इतकेच… म्हणून भारताचे उज्वल भविष्य करण्याचे रहस्य संघटना,शक्तीसंचय आणि इच्छाशक्तीच्या परस्पर सहकार्य यातच साठलेले आहे.आपल्या सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागणार आहे. खूपखूप झटावे लागेल. उठा ! लांबच लांब रात्र संपून अरुणोदयाचा समय आला आहे. आता एक विशाल लाट उठली आहे तिचा वेग कोणीही रोखू शकणार नाही ! या गोंधळातून आणि झगड्यातून  वैभवसंपन्न,अजिंक्य,परिपूर्ण असा उद्याचा भारत मला माझ्या मनचक्षुपुढे दिसतो आहे !

स्वामी विवेकानंद ! वन्दे मातरम

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income