बेस्ट चे स्मार्ट कार्ड महाग पडते !



         मोठा गवगवा करत बेस्ट प्रशासनाने सुट्ट्या पैशासाठी स्मार्ट कार्ड चा शोध लावला. सदर कार्ड चा वापर कमी होत असला तरी वाहक स्मार्ट कार्ड बद्धल आग्रही आहेत. कांही वाहकांना या स्मार्ट कार्ड वरून तिकीट देताना सवयीप्रमाणे वेगळा मार्ग अवलंबणे गैरसोयीचे वाटते. मुद्दा हा हि सदर स्मार्ट कार्ड घेताना २५ रुपये भरावे लागतात त्यानंतर १ आठवड्यानंतर हे स्मार्ट कार्ड मिळते. स्मार्ट कार्ड  घेवून तुम्ही ४० रु. चा दैनिक पास काढू शकता शिवाय रिचार्ज केले तर तिकीट हि घेवू शकता मात्र स्मार्ट कार्ड  रिचार्ज वर बेस्ट ५० रुपये स्मार्ट कार्ड मध्ये आगावू ठेवून घेते ते पैसे आपण वापरू शकत नाही. एका व्यक्तीचे ५० असे किती पैसे बेस्ट या मार्गाने जमा करणार ? महागाईमुळे वाढवलेल्या तिकिटांचा भार प्रवाशांच्या खिशाचा भार कमी करत आहे. त्यातच बेस्टने अशी ग्राहकांची लुट करणे योग्य नाही.
       हे असेच सुरु राहिले तर मुंबईकरांचा बेस्टच्या नवीन उपक्रमांना पाठींबा कसा मिळणार ? रेल्वे प्रशासनाने काढलेले स्मार्ट कार्ड ५ % वाढीव रक्कम ग्राहकांना देवून स्मार्ट कार्ड वापरासाठी प्रोत्साहन देते मात्र बेस्ट चा प्रवास उलटा चाललाय !बेस्ट प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा !
BaBuRao Khedekar As a Creative Young Indian !

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income