Posts

सृजनांची चळवळ...

       अहिंसा, सत्य, अस्तेय अशी मुल्ये आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी पुस्तकी तत्वे यांचा प्रत्यक्ष समाजजीवणाशी सबंध विसंगत वाटु लागतो तेंव्हा परिस्थितीच्या अंधारातुन सर्वशक्तीनीशी प्रकाशाकडे जाण्याचा प्रवाह तयार करावा लागतो. हाच मनुष्याचा स्वभावधर्म आहे. प्रजासत्ताक गणराज्य हि अशीच सर्वसमावेशक आदर्श संकल्पना आहे.  शिवाय ती लवचिकही आहे. हा यज्ञ असाच अखंडपणे सतर्क राहुन तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. पत्रकारिता हे निमित्त मात्र माध्यम असले तरी यासाठी प्रभावीपणे वापरत आहोत. आज पत्रकारिता आणि संघटणा हि सत्तास्थाने बनली आहेत मात्र आम्ही शाळेची पायरी चढताना राजकारण करणार नाही! आजी माजी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपिठ मिळावे या उद्देशाने  साने गुरूजींच्या विचार विश्‍वात पुन्हा शाळेकडे परत येण्याचा आमचा माणस आहे कारण परिवर्तणाचा मार्ग शाळेतुनच जातो!        दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देवुन कांही गुणी विद्यार्थी कमावण्याचा आमचा मानस आहे             उगाच पाय न ओढता प्रोत्साहण देणा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षगरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी आशेचा किरण

मुंबई : आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य उपचार मिळविणे कठीण होते. याच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष (Chief Minister Medical Assistance Cell) सुरू केला आहे. हा कक्ष खऱ्या अर्थाने अनेकांसाठी 'जीवनदायी' ठरत आहे, आणि यामागे एक सुव्यवस्थित यंत्रणा कार्यरत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा मुख्य उद्देश हा राज्यातील गरजू नागरिकांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या निधीतून केवळ वैद्यकीय मदतच नाही, तर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांनाही आर्थिक सहाय्य पुरविले जाते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. मुख्यमंत्री सचिवालयाच्या दि. 13 ऑगस्ट 2015 च्या परिपत्रक क्र. मुमंसनि-...

स्वतः वृद्धाश्रमात राहूनही कमाईचा मोठा भाग समाजाला दान

Image
सिंधुदुर्ग सुपूत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान   मुंबई,  :- डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले... आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर सिंधुदुर्ग सुपुत्राचे नाव. श्री. करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील आहे. आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना श्री. करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले. तसेच श्री. करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले. सदानंद करंदीकर हे खाजगी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही नेर...

छावा निमित्ताने आपण काय स्मरण करूया...

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा     या गीतात आपल्या देशाचे वर्णन करताना गीतकाराने "कुछ तो बात है की हस्ती मिटती नहीं हमारी" असे केले आहे. ती कोणती विशेष गोष्ट आपल्या देशाच्या डीएनए मध्ये आहे ? सोन्याचा धूर निघणारा किंवा सोने पिकवणारा आपला देश असे इतिहासात म्हटले आहे म्हणजे इथे सुबत्ता होती असे मानले तर आज हा देश विकसनशील का आहे ? धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मरण करताना असे प्रश्न आपल्याला का पडत आहेत ?      आपण नेहमी म्हणतो  व्यर्थ न हो बलिदान..     त्यावेळी आपली जबाबदारी वाढते मित्रानो ! लहान मुले निरागस असतात त्यांना आपण आकार देत जातो तेंव्हा त्यांना आपण देव देश आणि धर्माची शिकवण देतो. त्यात ओघाने मातृभूमी भारतमाता म्हणून समोर येते. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडील देवाचे रूप मानले जाते. भारत माता म्हटले की आपल्याला जमेल तशी तिची सेवा करणे, तिच्या साधनसंपत्तीचे सन्मानाचे संरक्षण करणे संवर्धन करणे हे आपले कर्तव्यच बनते. कर्तव्यानेच मनुष्य जन्माला अर्थ प्राप्त होतों. मात्र आपण करत असलेले कर्तव्य योग्य की अयोग्य यासाठी पुन्हा धर्माची आठ...

मराठीची अर्थव्यवस्था मजबूत करूयात !

Image
  मराठी भाषेचा आणि अर्थव्यवस्थेचा संबंध काय? खरंतर जीवनातील अनेक गोष्टींचा आणि अर्थकारणाचा, अर्थव्यवस्थेचा थेट संबंध आहे. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी मागणी आणि पुरवठा या विषयावर महत्त्वाचे काम केले आहे. त्यांनी असे म्हटले की, पुरवठा आणि मागणीमुळे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढीस लागते. बाजारपेठेत एखाद्या वस्तूला, सेवेला मागणी मिळण्याआधी ती बाजारपेठेत उपलब्ध देखील असायला हवी. किंवा मागणी आल्यावर त्वरित उपलब्ध व्हायला हवी. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्याचा थेट संबंध असून ह्यावरच सर्व अर्थचक्र अवलंबून आहे. मराठीभाषेला अभिजात दर्जा मिळाला, ह्या मुळे भाषेच्या संवर्धनाकरिता काही कोटी रुपयांचं अनुदान केंद्र सरकारकडून मिळेल. येणाऱ्या 10 मार्चला महाराष्ट्राच्या बजेट मध्ये मराठी विभागाकरिता घसघशीत निधीची घोषणा देखील होईल. पण ह्याच बरोबरच माय मराठी भाषेचे सुपुत्र म्हणून आपली देखील जवाबदारी असून ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवा. आपल्या मराठीला चिरंतन ठेवायचं असेल तर तिची मागणी व पुरवठा हा कायम अखंडितच हवा. मराठी भाषेची मागणी आणि पुरवठा असल्यास ...

एकात्म मानवतावाद : सुशासनासाठी भारताचा मौलिक दृष्टिकोन

  आज स्वातंत्र्यप्राप्त भारत अमृत काळाच्या उंबरठ्यावर उभा असला तरी संपूर्ण जग अनिश्चिततेच्या वळणावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर, नेहमीच सर्वसमावेशक आणि निसर्ग केंद्रित प्रगती साध्य करण्याचा दृष्टिकोन स्वीकारणारा भारत, आज संपूर्ण जगासाठी शाश्वत विकासाचा आदर्श ठरत आहे. निसर्गाकडे केवळ एक संसाधन म्हणून पाहणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीला आज उत्तरं सापडत नाही. समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही यांसारख्या मतप्रणालींमध्ये अडकलेले व्यवस्थापन कोसळत आहेत किंवा अंतर्गत व बाह्य संघर्षात गुरफटले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, देश देखील अशाच एका द्विधा स्थितीत होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांना साजेसा विकासाचा मार्ग ठरवता आला नाही आणि ते या तिन्ही विचारसरणींमध्ये हेलकावत राहिले. अशा परिस्थितीत, एका दूरदर्शी विचारवंताने एकात्म मानवतावाद या चिरंतन तत्त्वज्ञानाचा प्रस्ताव मांडला. हा विचार मांडणारे होते पंडित दीनदयाळ उपाध्याय, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य होते. परंतु त्यांनी वारंवार स्पष्ट क...

महाराष्ट्राच्या नेत्यांचा परिचय

Image
*श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस* जन्म : २२ जुलै, १९७० जन्म ठिकाण : नागपूर शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी येथून उत्तीर्ण ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमृता. अपत्ये : एकूण १ (एक मुलगी). व्यवसाय : सामाजिक कार्य. पक्ष : भारतीय जनता पक्ष. मतदार संघ : ५२ - नागपूर (दक्षिण-पश्चिम), जिल्हा - नागपूर.   इतर माहिती : कार्यकारी सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (युनायटेड नेशन्सद्वारा मान्यता प्राप्त संस्था): उपाध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक (भोसला मिलिटरी स्कूल), उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था, अध्यक्ष, स्व. आबाजी थत्ते अनुसंधान संस्थानचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर; अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केट बॉल संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध उपक्रमात सहभाग. १९८९ वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, धरमपेठ वॉर्ड, नागपूर; १९९० प्रसिद्धी प्रमुख, भाजप, ना...

देवाभाऊंच्या वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा वाढता आलेख

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा वाढता आलेख             मुंबई, दि. 7 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना त्यांच्या अडचणीच्या काळात मोठी मदत केली आहे. आरोग्य सेवेचा वसा घेवून गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मदत करण्याचे काम हा वैद्यकीय कक्ष करीत आहे. अशा रूग्णांना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. वैद्यकीय कक्षाचा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आलेख उंचाविला असून अवघ्या 9 महिन्यात एकूण 13 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.           जानेवारी, 2024 पासून ते सप्टेंबर 2024 पर्यंत कक्षाच्या माध्यमातून 418 रुग्णांना मदत झाली आहे. ह्रदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफ्फुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुनर्स्थापना शस्त्रक्रीया (Replacement Surgeries)...