कविवर्य संदीप मेंगाने लिखित लॉकडाउन कि नॉकडाऊन *LOCKDOWN OR NOCKDOWN*

नमस्कार 🙏
          देवाशिवाय सृष्टी नाही हे  त्रिकालाबाधित सत्य आहे. देवाने सर्वांत सशक्त, बुद्धिसंपन्न, शक्तिमान प्राणी बनवला ज्याला आपण मानव म्हणतो. म्हणजे आपणच. देवाने या मानवाला हवी तशी सुबक मनमोहक सृष्टी बनवली. निसर्गाला मानवामुळे अधिकच शोभा आली.
 हळूहळू मानवाने बुद्धीच्या जोरावर विज्ञान हस्तगत केले. मानवाने निसर्ग, शास्त्र आणि विज्ञान यांची सांगड घालून पृथ्वीवर नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पृथ्वीवरील निसर्गाचे नुकसान होऊ लागले. तरीही स्वार्थी माणसाने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. मानवाच्या या स्वार्थी कृत्यामुळे निसर्गातील अनेक सजीव निर्जीव घटकांची हानी जोराने होऊ लागली. तरीपण देव असो की निसर्ग कधीही मानवावर कोपला नाही. उलट मानवाला प्रगती करण्यास अनुकूल वातावरण निर्मितीचा प्रयत्न करून देवाने आपले देवत्व अबाधित ठेवले. पण मानवाची बुद्धी इतकी वरचढ झाली की त्याने देवाचे देवत्व तर दूरच चक्क देवाचे अस्तित्वच नाकारले. निसर्गाची पाळंमुळं तर आपल्याच हातात आहेत असे मानवाला वाटू लागले. अहंकारी मानवाने पृथ्वीवर स्वतःचे साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केली. आणि स्वतःच पृथ्वीवरचा देव आहे असे समजून वावर चालू केला. इकडे देवानेही आपल्या सहनशीलतेचा अंत झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी पृथ्वीवर तांडव सुरु केले.
 कोरोनासारखा एक छोटासा विषाणू मदतीला घेऊन देवाने पृथ्वीवर आहाकार माजवला. मानवाचा अहंकार क्षणात नाहीसा केला. बघता बघता स्वतःला पृथ्वीवरचा देव समजणारा माणूस आहे त्या ठिकाणी स्वतःला कोंडून घेऊन बसला. कारण त्याला स्वतःचा जीव प्यारा होता. केवळ एक - दोन महिन्यानंतर त्याच कोंडलेल्या घराच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर  संपूर्ण निसर्ग जणू स्वर्गच भासू लागला. निळेशार पाणी, नितळ आकाश, निरभ्र आकाशात विहार करणारे पक्षी, झाडाझुडपापासून दूर शहरांत मुक्त संचार करणारे पशु, शुद्ध हवा देणारे एक एक झाड अगदी देवापेक्षाही महान वाटू लागले.म्हणजेच मानवाने आयुष्यभर केलेल्या चुकांना माफ करून देवाने पुन्हा एकदा सुंदर वातावरण निर्मिती करून दिली. देवाने आपल्याला Lock down काळात जगण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळवून दिली.
Lock down कडे  nock down म्हणून बघा. ही आपल्याला देवाने दिलेली एक संधी आहे. प्रत्यकाने देवाने दिलेली ही संधी न दवडता तिचा योग्य वापर करावा. महाराष्ट्रातील तमाम जनता कोरोनाशी लढत असताना परप्रांतीय मात्र जिवाच्या भीतीने आपापल्या गावी पळून गेले. याच पळून गेलेल्या परप्रांतीयांनी मुंबईतील छोटेमोठे उद्योगधंदे काबीज केले होते.आणि आमचे भूमिपुत्र बढाया मारत बेकार फिरत होते. कमीअधिक शिकलेल्या डिग्र्या आणि सर्टिफिकेट घेऊन नोकरीसाठी वणवण हिंडत होते.आणि मग लागलीच नोकरी तर दहा पंधरा हजारावर आयुष्यभर गुलामी करायला आमचे भूमिपुत्र तयार. आपल्याला कोणीतरी एखादा उद्योगधंदा करायला सांगितलेच तर अहंकार आडवा येतो, शाळेच्या डिग्र्या आडव्या येतात, मुळातच नसलेली लाज -पत -प्रतिष्ठा आडवी येतेय.आणि गुलामी करायला अभिमान वाटतोय. आता वेळ आलीय ती आपले शिक्षण बाजूला सारून पारंपरिक वडिलोपार्जित उद्योगधंदे जपण्याची, आपल्या शिक्षणाचा आणि कलेचा वापर उद्योगधंद्यात करण्याची, आपल्यातल्या उद्योजकाला ओळखण्याची. कोणताही धंदा छोटा किंवा मोठा नसतो. परप्रांतीय लोकांनी हेच छोटे उद्योगधंदे करून अमाप पैसे कमावले. आपल्या नोकऱ्या काबीज केल्या. आपले धंदे बळकावले. भूमिपुत्रांनो आतातरी जागे व्हा.... उठा.... इस्त्री, वडापाव, पाणीपुरी, भाजीपाला, कडधान्य, फळफळावर कोणताही मिळेल तो, तुम्हांला जमेल तो धंदा काबीज करा.. स्वतः मालक व्हा. नोकरी करून गुलामगिरी स्वीकारण्यापेक्षा धंदा करून मालकत्व स्वीकारा. लाज लज्जा शरम सोडून द्या. अहंकार, कमीपणा, न्यूनगंड या शब्दांना मूठमाती द्या आणि निसंकोचपणे धंदा सुरु करा. तुम्ही शिकलेले असो -अशिक्षित असो, पत प्रतिष्ठा विसरा आणि धंद्यात उतरा. आज या lock down लाच संधी बनवून माझ्या बऱ्याच मित्रांनी छोटे मोठे स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. अगदी जवळचे उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या गावाचा माझा मित्र सुनील बोरनाक हा उच्चशिक्षित आहे शिवाय कोटक महिंद्रा मध्ये Deputy manager या पदावर काम करत असूनही मान- अपमान, पत -प्रतिष्ठ, समाज काय म्हणेल याचा विचार न करता भाजीपाला, कडधान्य, फळ फळावर विक्रीचा व्यवसाय त्याने सुरु केला.

त्याने रोज किमान 2900 ते 3500 रुपये निव्वळ नफा मिळवून उद्योजक कधीच मरत नाही हे पटवून दिले आहे. सुतारकाम, प्लम्बिंग काम, वाहन दुरुस्ती, इस्त्री काम असे अनेक उद्योग आपल्या मराठी बांधवांची वाट पाहत आहेत. नोकरी (गुलामी )करून महिन्यातून एकदा मिळवण्यापेक्षा मालक बनून रोज कमाई करा. एका हाताने विक्री करा आणि दुसऱ्या हाताने पैसे घ्या. उठा भूमिपुत्रांनो ... जागे व्हा... लागा कामाला. कारण आपल्याला देवाने दिलेली ही कदाचित शेवटची संधी असेल... नाहीतर उद्या lock down संपल्यानंतर आहेतच परप्रांतीय आपल्या बोकांडी बसायला....... शेवटी सर्वस्वी विचार आपलाच.... *LOCKDOWN की NOCKDOWN*

*संदीप दत्तात्रय मेंगाणे.*
*( शादपुत्र उमाकांत. )*
    *7021463427*

Comments

  1. बरोबर आहे मेंगाने साहेब ! आता जे गावी जातील त्यांना पुन्हा लवकर मुंबईत येणे थोडे अडचणीचे असेल आणि चार महिन्यांनी आले तर अजुन अडचणीचे असणार.. मुंबईच्या वाहत्या झऱ्यात आपले हात धुवून घेण्याची हि नामी संधी महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी फलदायी करून घेतल्यास नोकरी मागनारे न्हवे तर नोकरी देनारे मराठी असे नवीन समीकरण तयार होइल.

    ReplyDelete
  2. लॉकडाउन कि नॉकडाउन.उद्योगधंद्यात उभा राहायची नामी संधी आली धावून.

    ReplyDelete
  3. अप्रतिम मेंगाने साहेब ..👌👌
    Lockdown ला एक संधी म्हणून बघूया आणि स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण करूया ..!

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर 👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income