कोरोनाच्या संकटात सापडलेल्या मुंबईकरांना मदत करुया ....

मुंबईकरांना मदत करुया ....!
------------------------------------------------
                 घरात अठराविश्व दारिद्र्य, दोनवेळा जेवणाची ब्भ्रांत,  इच्छा असूनही दहावी बारावी च्या पुढे  शिक्षण घेता येत नाही . बहिणीच्या लग्नाची चिंता, भावंडं त्याचे शिक्षण, पडके घर सुधारायचे , शेती गहाण  पडलेली सावकरकडे...!  ती सोडवायची, आईबाबाला सुख द्यायचे. मग शाळा शिकायची की नोकरी.? शेवटी नोकरी करायच्या निर्णय घेऊन गावकरी मुबईचा रस्ता धरतो.
          
           मित्राचा, नातेवाईक, यांचा आधार घेऊन मिळेल ती नोकरी करायची, बैठकींच्या  खोलीत रहायचे,  कुटुंब असेल तर झोपडपट्टीत कोठे तरी खोलीत संसार थाटून काम शोधायचे..!
           
          दहा बाय दहाची बैठकीची खोली एका कोपऱ्यात न्हाणी, त्याला एक कट्टा त्यावर एक पाणी पिण्यासाठी मडके, भिंतीवर जेथे खिळे दिसतील तेथे कपडे अडकवलेली. एका कोपऱ्यात चपला, भिंतीवर फळी त्यावर ट्रंक, सुटकेस, बॅग, पिशवी, खोलीत प्रकाश व हवा येण्यासाठी एकच खिडकी, लटकलेला चाळीस किंवा साठचा बल्ब, हवा कमी पण आवाज जास्त करणारा जुना पंखा, सतत लोकल, ची धडधड. व इतर गाड्यांचा हॉर्न, व्हरांड्यात पोरांचा दंगा.  घामाच्या धारा...! कुबट वास...!रात्रपाळी असेल तर दिवसा झोपायचे....! दिवसभर कामावर जायचे असेल त्यानी खोलीत रात्री झोपी जायचे....!. खानावळीचे जेवण खाऊन.. आणि गावचे पत्र आणि फोनची वाट बघून दिवस कंटायचे....! जजीवाची मुबई करणाऱ्या अशा मुंबईकरावर  आज कोरोनाचे संकट आले आहे.
    
          यात्रेला, गणेश चतुर्थीला, दिवाळी, किंवा उन्हाळी सुट्टीत, नातेवाईक किंवा मित्राच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गावी जाणारा मुंबईकर ...!.
 
                 *गणपती उत्सव, गाव सुधारणा, पाणीपुरवठा किंवा तरूण मंडळांना मदत करणारा मुबईकर...!*
    
              ग्रामपंचायत,  विधानसभा, लोकसभा, अगदी  सोसायटी, निवडणूक साठी मतदान करण्यासाठी धावून येणारा मुबईकर....!
 
          *घरातील कोण आजारी पडले, निधन झाले, किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर मदतीसाठी धावून येणारा मुबईकर...!*
    
           मुबईत आल्यावर गाववाले म्हणून मदत करणारे, गावी  जवेरीयन जीवन मिक्सर ची बाटली, तपकिरीचा डब्बा आठवणीने पाठवणारा नवीन कपडे, चपला, आईला नऊवरी पातळ, आणि बाबांना धोतर पान घेऊन येणारा मुबईकर ..!
    
       आज प्रतीक्षा करतोय गावकरी आणि राजकीय लोकांच्या मदतीची....!

           तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका, तुम्ही आम्हाला धान्य देऊ नका फक्त एवढेच करा.
  *जसे निवडणूक वेळी हक्का ने मतदाना साठी गावी घेऊन जाता...! तशीच आता गरज आहे* ज्यांना गावी जायचे आहे त्यांना  गावी येण्याचे  जे सोपस्कार करावे  लागणार आहे ते पार पाडण्यासाठी मदत करण्याची.
       
         आज अडचणीत सापडलेल्या मुबईकराना मदत करणं हे प्रत्येक गावकरी आणि राजकीय नेत्यांच्या  प्रतिष्ठचे आहे. ज्या परवानग्या घ्यायला पाहिजेत, आरोग्य तपासणीसाठी जेथे जायचे आहे , अलगीकरण,  करायचे आहे ..! त्या सर्व बाबींसाठी पुढाकार घेऊन मदत करणाऱ्यासाठी मुबईकर प्रतीक्षेत आहेत. 
      
        स्वतःची काळजी घेऊन  मुबईकरराना मदत करणं यासाठी पुढाकार कोणी तरी घ्यायला पाहिजे त्यासाठी ग्राम समिती आणि लोकप्रतिनिधीनी विचार करावा एवढीच माफक अपेक्षा आहे मुबईकरांची...!
        
         कोरोनाचे हे संकट असेच राहणार नाही ...! ते जाणार आहे ...!. मात्र आज आपण तटस्थ राहून मुंबईकर किंवा इतर गावात अडकलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडले तर आपल्यासारखे करंटे  फक्त आपणच ठरणार आहे.

          गावकरी मंडळी या संकटात बाहेर गावी अडकलेल्या लोकांना मदत करून आपली खरी ताकद, जिव्हाळा, प्रेम आपुलकी, आणि  क्षमता दाखवण्याची वेळ आली आहे.
       सारे  जहासे अच्छा... हिंदोस्था  हमारा...!
लिखाण :- निनावी 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income