मुंबईतील चाकरमान्यांसाठी गावाकडे आगावू व्यवस्था करा :- गाव विकास समिती
जिल्हा प्रशासनाने उपलब्ध साधनां मध्ये जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामाचे आम्हीही कौतुक करत आहोत,मात्र 10 x 10 च्या खोलीत या संकटकाळी अडकलेला आपला *चाकरमानी आधारासाठी गावी येऊ शकतो याचे नियोजन* आधी व्हायला हवे होते.
जर परदेशातील नागरिक मायदेशी परतू शकतात, परराज्यातील मजूर गावी जाऊ शकतात तर मुंबईत असुरक्षित वाटणारा चाकरमानी योग्य ती खबरदारी घेऊन गावी येत असेल तर त्याला विरोध होण्याचे कारण असता कामा नये!
आज ग्रामीण कोकणची अनेक मुलं रोजगारासाठी मुंबईत आहेत,त्यांच्या घरात चिंतेचे वातावरण असणार आहे,ग्रामीण अर्थव्यवस्था चाकरमान्यांवर अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही!
मुंबईकर, पुणेकर चाकरमानी आपल्या गावी येणार असे गृहीत धरून लॉक डाऊन काळात आरोग्य विषयक सुविधांचे नियोजन व्हायला हवे होते...कोणत्याही चाकरमानी ला आपले गाव कोरोना बाधित व्हावे असे वाटणार नाही,पण आज त्यालाही सुरक्षित जागा हवी आहे...
आजच्या घडीला दोष ना सामन्य चाकरमान्यांचा आहे ना कोकणातील लोकांचा!झोपडपट्टी राहणारा सामान्य माणूस कोरोना आणण्यासाठी परदेशात गेला नव्हता...कोरोना हे जागतिक संकट आहे!
त्यामुळे आपल्याच माणसांमध्ये संशयाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांना घ्यायची आहे...कोरोना विरोधात लढायचं आहे माणसांविरोधात नाही!
चाकरमानी कोकणात आले तर काय उपाययोजना करायच्या ?ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने ही त्या दृष्टीने सूचना जिल्हा प्रशासनाला द्यायला हव्या होत्या...
सुरवातीच्या 40 दिवसांच्या लॉक डाऊनचा उपयोग मोठ्या प्रमाणात तयारी करण्यासाठी करायला हवा होता...किंबहुना लॉक डाऊन त्यासाठीच होता,इथे सुरवातीला केसेस नव्हत्या,एकंदरीत अंदाज घेऊन धोरण ठरवायला हवे होते...
मुंबई आणि कोकणचे असणारे नाते लक्षात घेऊन कोकणासाठी स्वतंत्र कोरोना तपासणी लॅब सुरू करा अशी मागणी गाव विकास समितीने 24 मार्च रोजीच केली होती...लॉक डाऊन हा कोरोना रोखण्याचा एकमेव उपाय असू शकत नाही तर लॉक डाऊन काळात केलेल्या आरोग्य विषयक उपाययोजना कोरोना नियंत्रण मध्ये आणण्यास उपयुक्त ठरतात.
प्रशासनाने हतबलता व्यक्त करणे हे नागरिकांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यासारखे होईल!
कोरोना मुक्ती साठी संपूर्ण जिल्हा सरकार आणि प्रशासन सोबत आहे,लोकं नाउमेद होतील अशी वक्तव्य टाळायला हवीत!
*-सुहास खंडागळे*
गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा
Comments
Post a Comment