इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..
आनंदवृत्ती संतुलनाचा भावनेसमान आहे.
जेंव्हा जीवनाला आपल्या हृदयाचं गाणं गाणारा गायक मिळत नाही तेंव्हाच ते अशा एखाद्या दार्शनिकाला जन्म देते, जो त्याच्या मनातलं गुज सांगू शकेल.
प्रत्येक बीज एका इच्छेसमान आहे.
सत्याचा शोध घेण्याकरिता दोन माणसं हवीत,एक ते सांगणारा आणि दुसरा ते समजून घेणारा.
एक स्त्री आपल्या चेहऱ्यावरील भावनांना एका हलक्याशा स्मितहास्याच्या पडद्यानं झाकू शकते.
जो मनुष्य तुमची सेवा करतो, त्याच ऋण सुवर्णांपेक्षा मौल्यवान वस्तूने फेडणंही कठीण आहे. म्हणून एक तर त्याला आपलं हृदय द्या नाहीतर त्याची सेवा करा.
प्रत्येक साप एका पिल्लाला जन्म देतो,जो मोठा होऊन त्यालाच खाऊन टाकतो.
पृथ्वी ज्याला आकाशाच्या पानांवर लिहिते अशा कविता म्हणजे वृक्ष; पण आम्ही त्यांना तोडून त्यापासून कागद बनवतो, ज्यावर आम्ही आमचे पोकळ विचार लिहू शकू.
मृत्यूच यथार्थतेला कायम प्रकट करतो.
महात्मासुद्धा शारीरिक गरजांपासून सुटका मिळवू शकत नाही.
आईच्या हृदयातल्या शांततेत निद्रिस्त झालेलं गीत तिच्या बाळाच्या ओठांवर खेळतं.
बऱ्याचशा स्त्रिया पुरुषांचं मन मोहून घेतात; पण अगदी विरळच स्त्रिया त्यांना आपल्या ताब्यात ठेवू शकतात.
जे पुरुष स्त्रियांच्या छोट्या छोट्या अपराधांना क्षमा करीत नाहीत, ते तिच्या महान गुणांचं सुख भोगू शकत नाहीत.
प्रेम आणि संशय एका हृदयात राहू शकत नाहीत.
मैत्री म्हणजे एक गोड जबाबदारी,स्वार्थपूर्तीची संधी न्हवे.
पापाचार कधी कधी सफल होऊन जातो; पण त्याचं फळ घातकच असतं.
तो माणूस किती अंध आहे, जो आपल्या खिशातल्या पैशानं तुझं हृदय विकत घेऊ पाहतोय.
वास्तवात तोच मनुष्य स्वतंत्र आहे, जो पराधीन व्यक्तीचे ओझे आनंदाने स्वतः उचलून घेतो.
या जगातला संघर्ष एका अशा अव्यवस्थेचं नाव आहे, ज्यामध्ये व्यवस्था स्थापित करण्याची इच्छा आहे.
ख्याती म्हणजे लालसेची ती सावली जी प्रकाशात उभी आहे.
बुद्धीमत्ता जेंव्हा एवढी घमेंडखोर होईल कि ती रडू शकणार नाही.इतकी गंभीर होईल कि हसू शकणार नाही आणि इतकी आत्मकेंद्री होईल कि आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाची चिंताच करणार नाही, तर ती बुद्धिमत्ता बुद्धिमता राहत नाही.
आम्ही केलेल्या कायद्यांसमोर आमची बुद्धी झुकू शकते,आत्मा नाही.
दानशूरता यात आहे कि,आपल्या सामर्थ्यापेक्षा जास्त द्या आणि स्वाभिमान यात आहे कि,आपल्या आवश्यकतेपेक्षा कमी स्वीकारा.
जास्त इच्छा असणारा दीर्घायुषी असतो.
प्राचीन काळात गुणी लोक राजाची सेवा करण्यात धन्यता आणि गौरव अनुभवत असत,पण आज ते निर्धनांची सेवा करण्यात सन्मानाचा दावा करतात.
केवळ तेच लोक आमच्या हृदयांच्या रहस्यांना समजू शकतात,ज्यांची हृदये रहस्यांनी परिपूर्ण असतात .
श्रद्धा हृदयाच्या वाळवंटातले असे हिरवे क्षेत्र आहे जेथे विचारांचा काफिला पोहोचू शकत नाही.
Comments
Post a Comment