क्वारनंटाईन सेंटर रुग्णांसाठी ‘जेल’ :- किरीट सोमैय्या


सध्या भाजपतर्फे राज्यसरकार विरोधात आंदोलन छेडन्यात आले असुन भाजप नेते आपापल्या स्तरावर सरकारवर आसुड ओढत आहेत. याचाच भाग म्हणून क्वारनंटाईन सेंटर रुग्णांसाठी ‘जेल’ असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबद्दल बोलताना त्यानी म्हटले आहे कि, डझन भर विलिगिकरण केंद्राला मी भेट दिली. कोरोना बाधित व संबधित हाय रिस्क रुग्ण/लोक ह्यांना ठाकरे सरकारचे क्वारनंटाईन सेंटर ‘जेल’ वाटत आहे असा आरोप भाजप ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

निकृष्ट दर्जाचे अन्न, मर्यादित पाणी, डर्टी घाणेरडे संडास, टॉयलेट्स असा समस्यांचा पाठा त्यांनी बोलून दाखवला आहे.

ठाकरे सरकार प्रति व्यक्ती ₹172 कॉन्ट्रॅक्टर ला देत आहे. लागे बांधे असलेल्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात असाही आरोप त्यांनी केला आहे.

त्यांनी वरळी, धारावी, पवई, चांदिवली, कांजूर, शिवाजीनगर, ठाणे, भायंदर, मुलुंड, कांदिवली...... अनेक क्वारंनटाईन सेंटरची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. क्वारंनटाईन सेंटरमधली अस्वच्छता, पाण्याची-खाण्याची गैरसोय या सर्व बाबी पुढे आल्याच होत्या पण आता रुग्णांचे जेवणाचेही प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले आहे. पवईत हिरानंदानी येथील १६५० नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली. कारण कॉन्ट्रॅक्टर नी सकाळ चे जेवण संध्याकाळी ५ वाजता आणले हे उदाहरण त्यांनी दिले आहे.
      एकंदरीत ठाकरे सरकार विरोधात आता भाजपने दंड थोपटले असुन गैरसोयींविरोधात भाजप नेत्यांचे बोलने हे केवळ राजकारण आहे असे अगतीक आणि भावनीक आवाहन करून सरकार याकडे काणाडोळा करणार कि सुधारणा करणार हे येणारा काळच ठरवेल. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income