छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन !

मराठा स्वराज्याचे रुपांतर मराठा साम्राज्यात करणारे अखंड 42वर्षे छत्रपती म्हणुन राज्यकारभाराची धुरा पेलणारे भारतवर्षसम्राट, शंभुपुत्र छत्रपती शाहुमहाराज (सातारा )यांच्या जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा 💐💐

"  🙏 छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏
 
          18मे 1682"रोजी ऊत्तर कोकणात रायगड किल्ल्या जवळ गंगावली मानगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई राणीसाहेब यांच्या पोटी छत्रपती शाहू राजांचा जन्म झाला.शाहूचे जन्म नाव शिवाजी होते." शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आलेले संभाजी राजे यांनी अवघ्या नऊ वर्षाच्या अल्पशा कारकिर्दीत औरंगजेबाशी लढत देऊन त्यांनी हौतात्म्य पत्करले.  स्वराज्य जगवायचे असेल तर मृत्यूला कवेत घ्यावे लागते हे संभाजीराजांनी जगाला दाखवून दिले संभाजी राजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांच्याबरोबर सात वर्षाच्या शाहूराजांना सुद्धा औरंगजेबाची तब्बल बारा वर्षे कैद स्वीकारावी लागली. त्यांची  सुटका झाली तेव्हा शाहू महाराजांनी लयाला जाणाऱ्या मराठी साम्राज्याला वाचवण्यासाठी चैतन्य निर्माण करून साऱ्या हिंदुस्तानभर मराठ्यांचा दरारा निर्माण केला. मोगलांच्या कैदेतून सुटका होणे शाहू महाराजांच्या दृष्टीने एक क्रांतीचे पाऊल ठरले. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी उत्साही कर्तबगार व्यक्तींना प्रोत्साहित करून राज्य वृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. महाराजांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच स्वराज्याचे साम्राज्य घडविण्याची किमया त्यांनी करून दाखवली. स्वतःच्या हिमतीवर व पराक्रमाने छत्रपती पद मिळवून ते स्वराज्याचे महाराज झाले या संधीचा फायदा घेऊन स्वराज्याला त्यांनी समता बंधुत्व यांचा दिव्य आदर्श निर्माण करून दिला. शाहूराजांच्या सौम्य आणि शांत स्वभावाचे प्रत्यंतर त्यांच्या जीवनात सातत्याने येत होते शत्रूला सुद्धा घात करण्याची इच्छा होऊ नये असा हा राजा अजात शत्रू म्हणून प्रसिद्ध होता . वडिलांचे छत्र बालपणीच गेले होते व आईच्या संस्कार करण्याच्या दिवसातच आईचे जीवन कैदेत गेले. वयाच्या सातव्या वर्षापासून शाहूराजे मोगली संस्कृतीत वाढले संभाजीराजांच्या हाल-हाल करून झालेल्या मृत्यूनंतर येसूबाई व शाहू राजे यांना शापित आयुष्य जगून स्वराज्यासाठी स्वतःची आहुती दिली. शाहूराजे दुर्बल नव्हते ते संभाजी राजांचे पुत्र होते एक निर्मोही उदात्त व सर्वांवर उदार अंतकरणाने प्रेम करणारा हा राजा होता. शाहू महाराज म्हणजे सर्वांना छाया देणारे झाड होते म्हणूनच महाराष्ट्राची भगवी पताका स्वराज्यात फडफडत राहिली. शाहू राजे छत्रपती झाले त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे राज्य नव्हते पुरेसे सैन्य नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीत शाहूराजांनी परसोजी भोसले ,धनाजी जाधवराव ,कानोजी आंग्रे ,खंडेराव दाभाडे ,बाजीराव पेशवे ,पिलाजी जाधवराव ,येसाजी गायकवाड ,आनंदराव पवार, राणोजी शिंदे ,मल्हाराव होळकर असे मातब्बर सेनानी हाताशी धरून मराठा स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात केले. दक्षिणेपासून तंजावर पर्यंत तर ओरिसा बंगाल पासून गुजरात पर्यंत मराठा साम्राज्य पसरले .आपल्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या मातोश्री महाराणी येसूबाई राणीसाहेब यांची 29 वर्षा नंतर मोगल कैदेतून सुटका करवली. शाहू छत्रपतींनी आपल्या पूर्ण यशाचे श्रेय छत्रपती शिवरायांना देताना म्हटले "थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद व त्यांचे पायाचा प्रताप त्यांनी इतके रक्षण करून हे दिवस मला दाखवले" 
          आपल्या 42 वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर घडवून आणले .ही छत्रपती शाहू महाराजांची महान कामगिरी होय.कुशल प्रशासक व ऊदात्तता हे शाहू महाराजांचे गुण होते.   
                
अशा या अजातशत्रू पुण्यश्लोक सर्व सेनाधिष प्रतापशाली छत्रपती थोरले शाहू यांना कोटी कोटी प्रणाम  
            लेखन ✒️      
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर,  पुणे
        ( इतिहास अभ्यासक )

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income