कोकणात सुद्धा रोजगार आहे !
40000 परप्रांतीयांनी फक्त रत्नागिरीतून आपल्या गावी परत जाण्यासाठी अर्ज केले आहेत.
याचा अर्थ कोकणात रोजगार आहे
40000 परप्रांतीय आत्ता कोकणात आहेत.
याशिवाय हजारो नेपाळी आंबा बागायतच्या कामांसाठी कोकणात येऊन राहतात.
कोकणातले रस्ते वडार आणि बेलदार बांधतात. सर्व कॉन्ट्रॅक्टर वडार आणि बेलदार मदत स्थानिक नेते करतात. कोकणातला संपूर्ण बेकरी व्यवसाय केरळ मधील लोक चालवतात. कोकणातील बांधकाम साहित्य व्यवसाय गुजराती आणि मारवाडी. कोकणातल्या संपूर्ण मत्स्यव्यवसाय उत्तर भारतीय, कोकणातील संपूर्ण आंबा व्यवसाय कोकणा बाहेरील दलाल. कोकणातील सर्व काजूवर प्रक्रिया चंदगड आणि आजरा आणि कोकणा बाहेर.
कोकणातील सर्व शिक्षक तलाठी ग्रामसेवक तहसीलदार प्रांत सरकारी अधिकारी हे कोकणातील नाहीत कोकणा बाहेरून येतात.
आणि कोकणवासीय तरुण मात्र असल्फा विलेज वागळे इस्टेट कुरार व्हिलेज नालासोपारा दहा-पंधरा हजार रुपयाच्या नोकऱ्या आणि कीडा मुंगी सारखा रेल्वेचा प्रवास.
आपण सर्वजण फक्त निवडणुकीला आणि शिमगा आणि गणपतीला येतो.
आपण सर्वजण एकत्र येऊन ही परिस्थिती बदलू शकतो
थोडं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आता प्रत्यक्ष काम सुरू करूया. एकमेकांना मदत करून परस्पर सहकार्याने समृद्ध आणि शाश्वत कोकणचा संकल्प करूया
- अमृत सुतार
Comments
Post a Comment