स्मशानातलं सोनं

देवाला सोनं दान करायची पद्धत फक्त हिंदूत आहे, इतर धर्मात नाही. ते मंदीरातील सोनं - सरकारजमा करून कोव्हीड साठी निधी उभारायची कल्पना - काँग्रेसी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे . हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.

अशा काही योजना जुन्या सरकारच्या होत्या, त्या जुन्या योजना ऐच्छिक (Voluntary) होत्या . पृथ्वी  बाबांची योजना सक्तीची आहे असे त्यांच्या भाषणावरून दिसते . 

महाराष्ट्रात महाआघाडीचे पुरोगामी सरकार आहे . उद्धवजींची परवानगी घेऊन महाराष्ट्रापासून सुरवात करायला हरकत नाही . 

सिद्धिविनायक मंदिरावर सगळ्या पुरोगामी राजकारण्यांची अतोनात श्रद्धा आहे . तरी काँग्रेसी पृथ्वी बाबानी सादर स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रातून सुरु करावा. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरापासून सुरवात करावी . त्यानंतर शिर्डी, शेगाव,  पंढरपूर या देवस्थानाकडे क्रमाने जावे . . केंद्र सरकारवर आपोआप दडपण येईल. 

खरी गोची पुढे आहे, धर्मादाय कायद्यप्रमाणे ज्या त्या सांप्रदायिक ट्रस्ट चे उत्पन्न त्या त्या संप्रदायासाठीच वापरायचे असते . कारण एका धर्मविशेष श्रद्धेपोटी ते दान दिलेले असते. हिंदू मंदिराचा पैसा हिंदूसाठीच वापरावा असा तर्क कायद्यातून निघू शकतो. 

फक्त हिंदू साठी निधी उभारणे ही देशाची परंपरा नाही आणि पृथ्वी बाबांच्या सेक्युलर मनाला यामुळे फार फार यातना होतील हे लक्षात घ्या . 

हिंदू सोडून इतर धर्मात देवाला सोने वहायची पद्धत फारशी रूढ नाही . आता यावर उपाय काय ? तर इस्लामी धर्माचा पैसा मुख्यतः वक्फ बोर्डाच्या जमिनीत आहे आणि चर्च चा पैसा रियल इस्टेट मध्ये आहे . 

कोव्हीड निधीला सेक्युलर बनवायचे असेल तर , 

इस्लामी वक्फ बोर्डाच्या जमिनी सरकारने जप्त कराव्यात, चर्च ची रियल इस्टेट गहाण टाकावी आणि कोव्हीड साठी अधिक पैसे उभे करावेत. 

पृथ्वी बाबांच्या भाषणात फक्त हिंदूच्या  सोन्याचा उल्लेख आहे , ते सेक्युलर आणि पुरोगामी असल्याने तसे झाले आहे . पण धर्मादाय कायद्याच्या अटीमुळे तो हिंदू कोव्हीड निधी ठरतो आहे . त्यात जमीन आणि रियल इस्टेट असे दोन शब्द जोडले तर बाबांची आयडिया कायदेशीर कक्षेत बसेल . कधी सुरवात करायची ? 

आमच्या शाळेच्या पुस्तकात एक स्मशानातलं सोनं नावाचा धडा होता , त्यात प्रेतांच्या अंगावरचे दागिने चोरणार्याची गोष्ट होती. लेखातला भीमा - मूळचा लोखंडाच्या खाणीतील कामगार असतो. पुढे खाण बंद पडते. मग नोकरी नसलेला बेकार भीमा सोन्यासाठी प्रेतं धुंडाळत असतो. एके दिवशी भीमा एका  प्रेताच्या तोंडात हात घालून ; सोन्याचा दात ओढून काढत असतो. त्याच वेळी नेमके तेथे अन्नाच्या शोधात लांडगे येतात. भीमा  लांडग्यांच्या हल्ल्यात लढत असतो तेव्हढ्यात त्या प्रेताची दातखीळ बसते आणि ...... खाड्कन भीमाची दोन बोटं तुटतात. पण बोटांमुळे नाही तर  पुढे त्याला जी बातमी कळते त्यामुळे भीमा हमसून हुमसून रडू लागतो. बातमी खाण पुन्हा सूरू झाल्याची असते. हा बाबा हमसून हुमसून रडतो कारण  त्याने  लोखंडाच्या खाणीत पहार उचलायचं काम करणारी - आपली दोन बोटं गमावलेली असतात.  कशासाठी ? स्मशानातल्या  सोन्यासाठी....

पृथ्वी बाबांची सोनेरी आयडिया फक्त मंदिरापर्यंत सीमित का ठेवायची ? शहारूख पासून ऋतिक पर्यंत सगळ्या बॉलिवूड देवांच्या घरी बरेच सोने आहे . त्याचा सदुपयोग कधी होणार ? भक्तांनी त्यांचे टुक्कार सिनेमे हिट करण्यासाठी चिक्कार पैसे ओतले आहेत . त्यावर देशाचा हक्क नाही काय ? 

बॉलिवूड नट ही सुरवात आहे , राजकीय नेते , उद्योगपती यांच्या घरातले सोने जमा करायला काय हरकत आहे ? बाबांची आयडिया थोडी वाढवायला काय हरकत आहे ? 

बाकी सोडा - फक्त मंदिरातले सोने विकायला बाजारात आले तर सोन्याचे दर किती पडतील ? त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ?  याचा हिशोब हुश्शार पृथ्वी बाबांनी केला असेलच....

आता जळत्या मढ्यातून आणि पुरलेल्या प्रेतातून सोने काढायची आयडिया कोणता पुरोगामी मांडतो ? यावर आमचे लक्ष लागून राहिले आहे. 

- अभिराम

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income