श्री. कपिलभाऊ आडसुळ यांचा सन्मान !
लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या विचारातुन प्रेरणा घेऊन समाजसेवेसाठी झोकून दिलेल्या उल्हासनगर भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष कपिलभाऊ आडसुळ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
२०११ पासून निपक्षपातीपणे पत्रकारिता करणाऱ्या साप्ताहिक यशप्राप्ती वृत्तपत्रसमुहाच्यावतीने त्यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले आहे. प्रभाग ४ मधील गरजू नागरिकांना अन्नदान तसेच धान्य वाटप त्याचबरोबर वैद्यकीय सेवा देण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेताना पत्रकार आणि पोलिसांनी पाहिले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून आजही ते पायाला भिंगरी लावून उल्हासनगर शहरात समाजसेवा करतच आहेत. त्यांच्या या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !
Comments
Post a Comment