Posts
Showing posts from May, 2020
श्री. कपिलभाऊ आडसुळ यांचा सन्मान !
- Get link
- X
- Other Apps

लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या विचारातुन प्रेरणा घेऊन समाजसेवेसाठी झोकून दिलेल्या उल्हासनगर भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष कपिलभाऊ आडसुळ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ! २०११ पासून निपक्षपातीपणे पत्रकारिता करणाऱ्या साप्ताहिक यशप्राप्ती वृत्तपत्रसमुहाच्यावतीने त्यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले आहे. प्रभाग ४ मधील गरजू नागरिकांना अन्नदान तसेच धान्य वाटप त्याचबरोबर वैद्यकीय सेवा देण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेताना पत्रकार आणि पोलिसांनी पाहिले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून आजही ते पायाला भिंगरी लावून उल्हासनगर शहरात समाजसेवा करतच आहेत. त्यांच्या या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !
योगगुरू अविनाश लोंढे लिखित स्वप्नपुर्ती !
- Get link
- X
- Other Apps
*स्वप्नपूर्ती*..... २००७ ची गोष्ट आहे त्यावेळी मी गडहिंग्लज ला कॉलेजला होतो.तेंव्हा मोबाईल येण्याची नुसतीच सुरुवात झाली होती. कॉलेजला जाण्यासाठी एसटी चा प्रवास. कॉलेज मध्ये चुकून एखाद्याकडं नोकिया चा ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल असायचा. त्यावेळी मोबाईलचं भरपूर अप्रूप वाटायचं .त्या ठराविक टोन पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटायच्या. नोकियाचा मोबाईल सुरू केल्यानंतर ते दोन्ही हात एकमेकांजवळ येताना असं वाटायचं दोन मनच एकमेकांजवळ येतात. मलाही नेहमी वाटायचं असा मोबाईल आपणही घ्यावा, आपल्याकडेही असा मोबाईल असावा पण पैसा आणायचा कोठून हा मोठा यक्षप्रश्न होता. त्यावेळी आमच्या गल्लीतल्या विजय बोरणाक ,आनंद जाधव आणि मला शेण खताच्या ट्रॉल्या भरायची आयडिया सुचली. एका ट्रॉली मागे ६० रुपये मिळायचे. सुरवातीला सर्जेराव बोटे, अशोक पन्हाळे सामील झाले. पण थोड्याच दिवसांत ते दोघे बंद झाले. नंतर जोतिबा पाटील, तुकाराम मेंगाणे ही पोरं आमच्यात सामील झाली. माझं कॉलेज पाच ला सुटायचे. घरी येईपर्यंत साडे सहा पावणे सात व्हायचे. सात वाजता म्हशीची धार काढायची. साडे आठ नऊ पर्यंत जेवणं व्हायची. आण...
फावल्या वेळात काय करायचं ?
- Get link
- X
- Other Apps

फावल्या वेळात काय करायचं ? महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अव्दैतवनात राहू लागतात. त्यांची विचारपूस करायला भगवान श्री कृष्ण वनात जातात. त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात तुम्हाला वनवास झाला आहे आता तु काय करणार भीमा. त्यावर भीम म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार, हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात. भगवान झोपडीत जातात तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात ताई, नकुल सहदेव कुठे आहेत? द्रौपदी म्हणते ते पहा झाडाखाली बसलेत. भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर हे दोघे सारीपाट खेळत असतात. भगवान त्यांना पाहून म्हणतात हौस फिटली नाही वाटत तुमची, या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात. भगवान पुढे युधिष्ठिराकडे (धर्मराजा) जातात आणि म्हणतात काय हे धर्मा तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करताय हे बरोबर नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, "हे कृष्णा, काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे." हे...
*ईद मुबारक : हे पर्व सर्वांना आरोग्यदायी जावो;
- Get link
- X
- Other Apps

*ईद मुबारक : हे पर्व सर्वांना आरोग्यदायी जावो; पंतप्रधानांच्या शुभेच्छा...* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद उल फित्रच्या निमित्तानं देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद मुबारक, असं म्हणत मोदींनी देशवासियांना उद्देशून एक ट्विट करत त्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा सर्वांपर्यंत पोहोचवल्या. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजाचे उपवास ठेवल्यानंतर, सर्वत्र आज ईदचं पर्व साजरा होत आहे. पण, या पर्वाला कोरोना विषाणूच्या संकटाचं गालबोट लागलं आहे. परिणामी यंदा देशभरात ईद अगदी साधेपणानंच साजरा होत आहे. कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता देशभरातीत अनेक मशीदही बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संकटाच्या याच वेळी मोदींनी अतिशय सकारात्मक अशा शुभेच्छा देत देशवासियांना दिलासा दिला आहे. यंदाच्या वर्षी ईदच्या निमित्तानं करुणा, बांधिलकी आणि एकात्मतेच्या भावनेनं हे पर्व साजरा करुया असं म्हणत मोदींनी सर्वांसाठी आरोग्य आणि भरभराटीची कामना करत या क्षणाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ईदचं अतिशय महत्त्वाचं पर्व पाहता दरवर्षी या दिवशी असणारा उत्साह यंदा ...
मराठेशाहीतील बारा मावळ जाणून घ्या !
- Get link
- X
- Other Apps
⛳बारां मावळ ⛳ बारां मावळ आणि त्या बारां मावळचे देशमुख कोण हे पाहू. शहाजीराजांच्या पुण्याच्या परिसरातील मुकाशांचा व्यवस्थापक म्हणून शिवरायांकडे नेमका किती प्रदेश होता ते पाहू. पुणे, चाकण, इंदापूर , व् शिरवळ हे पाच परगणे आनी बारां मावळे या विभागा मधील बारां मावळ बद्दल माहिती घेवू , सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडे अनेक लहान लहान शाखा फुटल्या आहेत. आशा दोन उपशाखांच्या मधून सामन्यात:एखादी छोटीशी नदी उगम पावते. या नद्यांच्या खोऱ्याना मावळ किंवा खोरी म्हणत. उदाहरणार्थ: नाणे मावळ् पवन मावळ् मोसे खोरे वेळवंड खोरे इत्यादी. (१)👉🏽 *रोहिडखोरे* रोहिड खोरे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसले आहे त्यात ४२ गावे होती. रोहिड़ा किल्ला हे या खोऱ्याचे मुख्य ठिकाण होते. रोहिड खोऱ्याची देशमुखी *जेधे* आणि *खोपडे* या दोन घरान्यात् विभागली गेली होती, त्या मुळे ज्या भागाची देशमुखी होती. त्याला भोर तरफ आणी खोपडे ज्या भागाची देशमुखी होती, ती उत्रोली तरफ आशा रोहिड़े खोऱ्याच्या दोन तरफ झाल्या होत्या . (२)👉🏽 *हिरडस* *मावळ* हिरड्स मावळ् नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसले आहे. ...
सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास महावितरण मोफत बदलून देणार
- Get link
- X
- Other Apps
सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास महावितरण मोफत बदलून देणार मुंबई, दि. १९ मे २०२०: महावितरणकडून राज्यभरात कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपिट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून देण्यात येणार आहे. सध्या राज्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामध्ये सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. नादुरुस्त झालेले सौर कृषिपंप नियमानुसार मोफत दुरुस्त करण्याचे किंवा बदलून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा तसेच शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यातील २५ हजार आणि दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील उ...
क्वारनंटाईन सेंटर रुग्णांसाठी ‘जेल’ :- किरीट सोमैय्या
- Get link
- X
- Other Apps
सध्या भाजपतर्फे राज्यसरकार विरोधात आंदोलन छेडन्यात आले असुन भाजप नेते आपापल्या स्तरावर सरकारवर आसुड ओढत आहेत. याचाच भाग म्हणून क्वारनंटाईन सेंटर रुग्णांसाठी ‘जेल’ असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबद्दल बोलताना त्यानी म्हटले आहे कि, डझन भर विलिगिकरण केंद्राला मी भेट दिली. कोरोना बाधित व संबधित हाय रिस्क रुग्ण/लोक ह्यांना ठाकरे सरकारचे क्वारनंटाईन सेंटर ‘जेल’ वाटत आहे असा आरोप भाजप ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न, मर्यादित पाणी, डर्टी घाणेरडे संडास, टॉयलेट्स असा समस्यांचा पाठा त्यांनी बोलून दाखवला आहे. ठाकरे सरकार प्रति व्यक्ती ₹172 कॉन्ट्रॅक्टर ला देत आहे. लागे बांधे असलेल्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी वरळी, धारावी, पवई, चांदिवली, कांजूर, शिवाजीनगर, ठाणे, भायंदर, मुलुंड, कांदिवली...... अनेक क्वारंनटाईन सेंटरची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. क्वारंनटाईन सेंटरमधली अस्वच्छता, पाण्याची-खाण्याची गैरसोय या सर्व बाबी पुढे आल्याच होत्या पण आता रुग्णांचे जेवणाचेही प्रचंड हाल होत असल्याचे दिसून य...
लेखक विकास चव्हाण लिखित आत्मनिर्भर
- Get link
- X
- Other Apps
गेली चार दिवस झाले सोशल मीडियावर आत्मनिर्भर या शब्दांवर विविध गोष्टी वाचायला येत आहेत. हा काही नवीन शब्द नाही. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला किंवा स्वावलंबी व्हा यातलाच हा एक प्रकार. वास्तविक भारतीय व्यक्तीच्या सरासरी 75 वर्षाच्या जीवनात कमीत कमी 15 वेळा सरकार बदल होतो. त्यामुळे सरकार साठी नाही तर स्वतः साठी आत्मनिर्भर व्हावं हे योग्य राहील. मध्यंतरी एक टीव्हीवर पाहिलेली बातमी होती. ती म्हणजे एका मंदिराच्या आसपास राहत असलेली माकडे उपाशी राहत होती. त्यांना खूप दिवस खायला काही न मिळाल्याने हाल होत होते. कुणीतरी एका व्यक्तीने सगळी केळी विकत घेऊन त्या माकडांना खायला घातली. अशी प्राण्यांची स्थिती खूप ठिकाणी होत असणार. तसाच काहीसा प्रकार म्हणजे आम्ही गोव्याला जाताना आंबोली घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला माकडे बसून असायची. कार दिसली की जवळ यायची. कुणीतरी केळी द्यायचे. पण बिस्कीट देण्यारे जास्त. काहींना खरोखर देऊ वाटत होतं म्हणून. काही लोकांना बिस्कीट देताना फोटो काढून घ्यायचा असतो म्हणून. हाच प्रकार सगळीकडे होत असतो. प्राण्यांना पण सवय लागते. बिस्कीट, कुरकुरे हा त्यांचा आहार नसून...
RSS संघ कुछ नहीं करता मगर स्वयंसेवक सबकुछ करते है !
- Get link
- X
- Other Apps
नमस्कार ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के बारे मे अधिक जानकारी न लेते हुवे बहुत से लोग संघ के बारे मे प्रश्न उपस्थित करते है की संघ केवल हिंदुओंका संघठन है और कट्टरपंथी है ! मगर एसा नहीं है ! संघ की हिंदुत्वकी परिभाए कुछ अलग है.. हिंदुस्तानको भारतमाता के रुप मे देखनेवाला हर भारतीय हिंदू है और उसके लिये सभी संघ स्वयंसेवक कार्य करेंगे ! यही संदेश देनेवाला यह व्हिडिओ पूजनीय सरसंघचालक श्रेणी. मोहनजी भागवत इनका है ! धन्यवाद. भारतमाता कि जय !
छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन !
- Get link
- X
- Other Apps

मराठा स्वराज्याचे रुपांतर मराठा साम्राज्यात करणारे अखंड 42वर्षे छत्रपती म्हणुन राज्यकारभाराची धुरा पेलणारे भारतवर्षसम्राट, शंभुपुत्र छत्रपती शाहुमहाराज (सातारा )यांच्या जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा 💐💐 " 🙏 छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏 18मे 1682"रोजी ऊत्तर कोकणात रायगड किल्ल्या जवळ गंगावली मानगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई राणीसाहेब यांच्या पोटी छत्रपती शाहू राजांचा जन्म झाला.शाहूचे जन्म नाव शिवाजी होते." शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आलेले संभाजी राजे यांनी अवघ्या नऊ वर्षाच्या अल्पशा कारकिर्दीत औरंगजेबाशी लढत देऊन त्यांनी हौतात्म्य पत्करले. स्वराज्य जगवायचे असेल तर मृत्यूला कवेत घ्यावे लागते हे संभाजीराजांनी जगाला दाखवून दिले संभाजी राजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांच्याबरोबर सात वर्षाच्या शाहूराजांना सुद्धा औरंगजेबाची तब्बल बारा वर्षे कैद स्वीकारावी लागली. त्यांची सुटका झाली तेव्हा शाहू महाराजांनी लयाला जाणाऱ्या मराठी साम्राज्याल...
कोरोनावर अर्सेनिक ठरत आहे वरदान !
- Get link
- X
- Other Apps
पुण्यातील पाच सहाशे संघ स्वयंसेवक वीस दिवसांपेक्षा जास्त काळ विद्यार्थी आणि गरजू लोकांना खाणे वाटत आहेत. अगदी सुरवातीलाच या सर्व मंडळींना होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० चे तीन डोस देण्यात आले आहेत. अजून पर्यंत एकालाही बाधा झालेली नाही. महाराष्ट्रातील ६० टक्के रुग्ण मुंबईत आहेत. पण आमच्या भागात एकही रुग्ण नाही. त्यामुळे आम्ही सर्व भाजीवाले, किराणा आणि मेडिकल दुकानातील लोकांना आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या सप्लायर्सना हे औषध पुरवण्याच्या प्रयत्नात आहोत. म्हणजे आमच्या येथे प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होईल. प्लास्टिकच्या छोट्या बाटल्यात हे औषध वाटण्यात येते. हाफ ड्राम मध्ये तीन जणांना पुरेल एव्हढे औषध असते. एक ड्राम मध्ये सहा आणि २ मध्ये बारा जणांना पुरेल. आपल्या भागातील होमिओपॅथी डॉक्टर किंवा फार्मसी हे आपणास तयार करून देऊ शकतील किंवा आपल्याला शिकवूही शकतील. अर्सेनिक अल्बम ३०, ३० नंबरच्या तीन गोळ्या. सकाळी चूळ टाकून झाकणात घेऊन जिभेवर सोडायच्या. हात लावायचा नाही. अर्धा तास ब्रशही नाही करायचा. मग चहा वगैरे. असे फक्त तीन दिवस. त्या काळात कॉफी, अत्तरे, यासारखे उग्र गंध असलेले पदार्थ ट...
कविवर्य संदीप मेंगाने लिखित लॉकडाउन कि नॉकडाऊन *LOCKDOWN OR NOCKDOWN*
- Get link
- X
- Other Apps

नमस्कार 🙏 देवाशिवाय सृष्टी नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. देवाने सर्वांत सशक्त, बुद्धिसंपन्न, शक्तिमान प्राणी बनवला ज्याला आपण मानव म्हणतो. म्हणजे आपणच. देवाने या मानवाला हवी तशी सुबक मनमोहक सृष्टी बनवली. निसर्गाला मानवामुळे अधिकच शोभा आली. हळूहळू मानवाने बुद्धीच्या जोरावर विज्ञान हस्तगत केले. मानवाने निसर्ग, शास्त्र आणि विज्ञान यांची सांगड घालून पृथ्वीवर नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पृथ्वीवरील निसर्गाचे नुकसान होऊ लागले. तरीही स्वार्थी माणसाने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. मानवाच्या या स्वार्थी कृत्यामुळे निसर्गातील अनेक सजीव निर्जीव घटकांची हानी जोराने होऊ लागली. तरीपण देव असो की निसर्ग कधीही मानवावर कोपला नाही. उलट मानवाला प्रगती करण्यास अनुकूल वातावरण निर्मितीचा प्रयत्न करून देवाने आपले देवत्व अबाधित ठेवले. पण मानवाची बुद्धी इतकी वरचढ झाली की त्याने देवाचे देवत्व तर दूरच चक्क देवाचे अस्तित्वच नाकारले. निसर्गाची पाळंमुळं तर आपल्याच हातात आहेत असे मानवाला वाटू लागले. अहंकारी मानवाने पृथ्वीवर स्वतःचे साम्राज्य निर्...
स्मशानातलं सोनं
- Get link
- X
- Other Apps

देवाला सोनं दान करायची पद्धत फक्त हिंदूत आहे, इतर धर्मात नाही. ते मंदीरातील सोनं - सरकारजमा करून कोव्हीड साठी निधी उभारायची कल्पना - काँग्रेसी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे . हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अशा काही योजना जुन्या सरकारच्या होत्या, त्या जुन्या योजना ऐच्छिक (Voluntary) होत्या . पृथ्वी बाबांची योजना सक्तीची आहे असे त्यांच्या भाषणावरून दिसते . महाराष्ट्रात महाआघाडीचे पुरोगामी सरकार आहे . उद्धवजींची परवानगी घेऊन महाराष्ट्रापासून सुरवात करायला हरकत नाही . सिद्धिविनायक मंदिरावर सगळ्या पुरोगामी राजकारण्यांची अतोनात श्रद्धा आहे . तरी काँग्रेसी पृथ्वी बाबानी सादर स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रातून सुरु करावा. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरापासून सुरवात करावी . त्यानंतर शिर्डी, शेगाव, पंढरपूर या देवस्थानाकडे क्रमाने जावे . . केंद्र सरकारवर आपोआप दडपण येईल. खरी गोची पुढे आहे, धर्मादाय कायद्यप्रमाणे ज्या त्या सांप्रदायिक ट्रस्ट चे उत्पन्न त्या त्या संप्रदायासाठीच वापरायचे असते . कारण एका धर्मविशेष श्रद्धेपोटी ते दान दिलेले असते. हिंदू मंदिराचा पैस...
कविवर्य संदीप मेंगाने यांनी जोपासला चित्रकलेचा छंद ! Pantings by Sandip Mengane
- Get link
- X
- Other Apps

लॉकडाऊनमध्ये सर्वजण आपापल्या घरान्मध्ये बंद आहेत. या काळात मिळालेला वेळ कुठे खर्च करावा असा प्रश्न अनेकांना पडला असेल काहीजन केवळ आराम करण्यात गुंग असतील. मात्र मुंबईस्थित कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील बामने गावचे कविवर्य संदीप मेंगाने जे सध्या शॉर्ट फिल्म साठी लेखन करतात त्यांनी आपला चित्रकलेचा छंद जोपासत लॉकडाउनचा काळ घालवला आहे. त्यानी रेखाटन केलेली काहि निवडक चित्रे येथे देत आहोत. आपल्याला हि चित्रे कशी वाटली हे खाली कमेंटमधे पब्लिश करा.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती
- Get link
- X
- Other Apps
*मी उद्योजक होणार* ----------------------------------------- *1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना* महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी लागू) 💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐 💐💐🌹🌹💐💐 योजनेचे नाव ::::-- *मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}* 💐💐🌹🌹💐💐 *योजने विषयी थोडेसे* योजनेचे संकेतस्थळ :- *http://maha-cmegp.gov.in* योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र योजनेचे निकष :- 1) वयोमर्यादा 18 ते 45 (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष ) 2) शैक्षणिक पात्रता (i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास (ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास 3) उत्पादन उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख 4) सेवा उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर अधारीत असणे आवश्यक आहे (i) ...
*महावितरणच्या ‘मिस्ड कॉल’ सुविधेला राज्यातील 53 हजार वीजग्राहकांचा प्रतिसाद*
- Get link
- X
- Other Apps
*महावितरणच्या ‘मिस्ड कॉल’ सुविधेला राज्यातील 53 हजार वीजग्राहकांचा प्रतिसाद* मुंबई,:- दि. 14 मे 2020 वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. यामध्ये गेल्या 23 दिवसांत राज्यातील 53160 वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’ तर 1583 वीजग्राहकांनी ‘एसएमएस’ सुविधेचा वापर करीत वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे. आधुनिक जीवनाशी सुसंगत व अत्यंत सुलभ सेवा देण्यासाठी महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गेल्या एप्रिलमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 'लॉकडाऊन' सुरु असल्याने ही सेवा वीजग्राहकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळे गेल्या 23...
आत्मनिर्भर भारत होण्यासाठी शासनाची तरतुद
- Get link
- X
- Other Apps
●सूक्ष्म, लघु, मध्यम (MSME) उद्योगांसाठी 100 कोटिपर्यंतचे कर्ज चार वर्षासाठी कोणत्याही गॅरंटी शिवाय मिळेल! यासाठी 3 लाख कोटीची तरतूद! ●तोट्यातील MSME उद्योगांसाठी 20 हजार कोटींचे प्रोत्साहन पॅकेज! ● MSME उद्योगांना आपल्या वाढीसाठी 50 हजार कोटींची योजना! ●MSME उद्योगासाठीची गुंतवणूक मर्यादा वाढवली जाणार ●MSME उद्योगांसाठी ची टर्नओव्हर मर्यादा वाढवली ●सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग MSME असे दोन प्रकार काढुन टाकले जातील! उद्योग गुंतवणूक मर्यादा नवी मर्यादा सूक्ष्म 10 लाख 1कोटी लघु 2 कोटी 10 कोटी मध्यम 10 कोटी 20 कोटी ●उद्योग टर्नओव्हर मर्यादा नवी मर्यादा सुक्ष्म 1कोटी 10 कोटी लघु 2 कोटी 50 कोटी मध्यम 5 कोटी 100 कोटी ●Msme ला जन लाभ मिळण्यासाठी यापुढे 200 कोटी पेक्षा कमी किमतीची टेंडर्स ही ग...
मुंबईतील चाकरमान्यांसाठी गावाकडे आगावू व्यवस्था करा :- गाव विकास समिती
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा प्रशासनाने उपलब्ध साधनां मध्ये जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामाचे आम्हीही कौतुक करत आहोत,मात्र 10 x 10 च्या खोलीत या संकटकाळी अडकलेला आपला *चाकरमानी आधारासाठी गावी येऊ शकतो याचे नियोजन* आधी व्हायला हवे होते. जर परदेशातील नागरिक मायदेशी परतू शकतात, परराज्यातील मजूर गावी जाऊ शकतात तर मुंबईत असुरक्षित वाटणारा चाकरमानी योग्य ती खबरदारी घेऊन गावी येत असेल तर त्याला विरोध होण्याचे कारण असता कामा नये! आज ग्रामीण कोकणची अनेक मुलं रोजगारासाठी मुंबईत आहेत,त्यांच्या घरात चिंतेचे वातावरण असणार आहे,ग्रामीण अर्थव्यवस्था चाकरमान्यांवर अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही! मुंबईकर, पुणेकर चाकरमानी आपल्या गावी येणार असे गृहीत धरून लॉक डाऊन काळात आरोग्य विषयक सुविधांचे नियोजन व्हायला हवे होते...कोणत्याही चाकरमानी ला आपले गाव कोरोना बाधित व्हावे असे वाटणार नाही,पण आज त्यालाही सुरक्षित जागा हवी आहे... आजच्या घडीला दोष ना सामन्य चाकरमान्यांचा आहे ना कोकणातील लोकांचा!झोपडपट्टी राहणारा सामान्य माणूस कोरोना आणण्यासाठी परदेशात गेला नव्हता...कोरोना हे जागतिक संकट आहे! त्यामुळे आपल्याच माणसांमध्ये ...
दुर्गदर्शन : पद्मदुर्ग Durgadarshan : Padmadurg
- Get link
- X
- Other Apps
पद्मदुर्गाची त्रिमितीय सफर नमस्कार, मी प्रवीण भोसले.9422619791 दुर्ग अभ्यासक व मराठा वीरांच्या समाधीस्थळांचा अभ्यासक-संशोधक . यासाठी गेल्या तीस वर्षात तीनशे किल्ले, हजारो समाधीस्थळे आणि इतर ऐतिहासिक वास्तू स्वतः पाहून त्यांंचा अभ्यास करीत आहे. व्यवसायाने मी सिव्हिल इंजीनियर आहे.या नात्याने ऐतिहासिक वास्तूंचा स्थापत्यशास्त्रीय अंगाने अभ्यास घडतच आहे. शिवरायांचे किल्ले शिवकाळात पूर्ण नीट अवस्थेत कसे दिसत असतील ह्याची आपणा सर्वांना उत्सुकता असते.ही जिज्ञासा शमविण्याचे काम किल्ल्यांच्या संगणकीय त्रिमिती प्रतिकृती (Digital 3D Model) करू शकते. जंजिरा किल्ल्याजवळ शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याचे मी बनविलेले प्रमाणासह असलेले 3D मॉडेल मी येथे सादर करीत आहे. महाराष्ट्रातील किल्ल्याचे सप्रमाण व पूर्ण किल्ला दर्शविण्यासाठी बनविले गेलेले हे पहिलेच 3D मॉडेल असावे.यापूर्वी असा प्रयत्न केल्याचे माझ्यातरी माहितीत नाही. किल्ल्याचा संक्षिप्त इतिहासदेखील यामधे सांगितला आहे. शिवभक्तांना आणि दुर्गयात्रिकांना सप्रेम सादर *पद्मदुर्गाची त्रिमितीय सफर*
killing corona: Reality of fasttest growing economical country !
- Get link
- X
- Other Apps
killing corona: Reality of fasttest growing economical country ! भारत विश्वगुरू बननेवाला है बोलाअ जाता है मगर अभिभी देशमे मजदुरोंकी परिस्थिती बहुत बिकट है... मिनिमम वेजेस कि बात कि जाती है मगर वो उन्हे नहीं मिलती है ! मजदुरोंको पगार बिना काटे दो और किराया ना मांगो बोला जाता है मगर कौन सुनता है ? इसी बिज लॉकडाउन मे फसा कर्मचारीववर्ग अपने गाव जाना चाहता हे लेकिन उसे अनगिनत समस्याओंका सामाना करना पड रहा है ! महाराष्ट्र सरकार उन्हे बोली मेडिकल प्रमान पत्र नहीं लगेगा बाद मे बोले ओ लगेगा तो उसके लिये प्रायोजक डॉक्टर उनसे प्रतिव्यक्ती १०० रुपये ले रहे है ! जिल्हाधिकारी का प्रमाणपत्र चाहिए मगर जिल्हाधिकारी कि वेबसाईटपर ऑनलाईन अर्ज दाखील करने कि लिंक नहीं है .. महाराष्ट्र परिवहन महामंडळ एव्म् महाराष्ट्र सरकारकी वेबसाईट पर भी इसकी पुरी जानकारी या लिंक नहीं मिलती... उपर से एक गाडि मे केवल २ व्यक्ती जा सकते है ! क्या केवल एक परिवार मे केवल पती और पत्नी ही होते है बच्चे या भाई बहेन कोइ नहीं रहता या उन्हें किसी दुसरे के भरोसे छोडक...
मराठेशाहीतील तांब्याचे चलन
- Get link
- X
- Other Apps

छत्रपतींचे तांब्याचे चलन #शिवराई एक बाजू :- छत्र पति. तरी छत्र पति च्या चंद्रकोर आणि मध्ये एक टिपका जसे आपण कपाळावर चंद्रकोर लावतो अगदी त्याच पद्धतीने. दुसरी बाजू :- श्री राजा शिव. तरी संपूर्ण अक्षरांची छापण्याची पद्धत च खूप वेगळी आहे.आपल्याला नाण्याकडे पाहून कळेलच. हेच सर्व विशेष आहे या शिवराई मध्ये. धातू :- तांबे. वजन :- ९.१ग्रॅम. जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे🚩
माधवबाग प्रानायाम सेशन ! Madhavbaug Pranayam session
- Get link
- X
- Other Apps
कोरोना लॉकडाऊन दरम्यान माधवबाग हेल्थ केअर कंपनीने त्यांच्या पेशंटसाठी झुम ॲपवर लाईव्ह योगा सेशंस घेतले. या दरम्यान १३ मे २०२० रोजी मि प्रानायामचे ४ प्रकार करून दाखवले तो हा व्हिडिओ आपण पाहुन स्वतः पाहतापाहता करु शकता. डॉ.आश्लेषा यांनी सुद्धा याबाबत खुप छान माहिती दिली आहे. चला तर मग योगा करुया आणि तंदुरुस्त राहुया ! During lockdown madhavbaug healthcare organised yoga sessions for their clients. Today i got opoortunity to show 4 pranayam positions during this session... Dr Ashlesha mam also given very important information about this.now you can do the same by seeing this video.. Come to do yoga and stay healthy ! Thanks...
योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income
- Get link
- X
- Other Apps

*"पहिली कमाई"*First Income ! इयत्ता सहावीला होतो. नुकत्याच मे च्या सुट्ट्या चालू झाल्या होत्या. त्या वेळी आम्ही खालच्या गल्लीला राहत होतो. तिथेच शेजारी एक चुलत भाऊ रहायचा. सुनिल लोंढे त्याच नाव. तो त्या वेळी पिंपळगाव हायस्कूल ला शिकायला होता. आमची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी नदीला जायला, सायकल मारायला, शेताकडं जायला आम्ही एकत्रच जात होतो. एके दिवशी दुपारी तो मला खाली रस्त्याला घेऊन गेला. बरोबर एक तंदुस ची पिशवी पण घेतली होती. आम्ही चालत चालत, इकडच्या तिकडच्या गप्पा मारत जात होतो. रस्त्यावर एका करंजीच्या झाडाजवळ आम्ही पोहचलो. पूर्ण झाड करंजीच्या बियाणे व्यापून गेलेलं होतं. काही करंज्या तर वाऱ्याने आधीच खाली पडल्या होत्या. तो म्हणाला मी झाडावर चढतो आणि वरून फांद्या हलवतो.तो अश्या कामात फारच चपळ होता. खाली पडलेल्या करंज्या गोळा करायचं काम माझं. बघता बघता तंदुस ची पिशवी भरत आली. मी त्याला खालूनच हाक मारली. मग तो उतरला. ओल्या करंज्यामुळे पिशवी फारच जड वाटत होती. कशीबशी दोघांनी ती घराकडं ...
मराठेशाही Live'n'Joy ब्लॉग असा सब्स्क्राइब करा !
- Get link
- X
- Other Apps

नमस्कार 🙏 आपण गेली अनेक वर्षांपासून अनेक कारणांमुळे संपर्कात आहोत. एकमेका साहाय्य करु अवघे धरू सुपंथ अशी मराठी शिकवण आहे. सोशल मीडियावर आपण सर्वच जण व्यक्त होत असतो. जे लोक जास्त लोकप्रिय असतात त्यांच्या पोस्ट आपल्याला नेहमी पहायला मिळाव्यात म्हणून आपण त्यांना फॉलो करत असतो. सोशल मीडियावरील आपल्या पोस्ट कालौघात आणि नव्या पोस्टमुळे नजरंदाज होत असतात. त्यामुळेच वेबसाईट पेसबुक आणि यूट्यूब पेज असे पर्याय आपण शोधतो. या सर्वात अजुन एक प्रभावी माध्यम गूगलने दिले आहे ते म्हणजे आपला स्वतःचा ब्लॉग ! बरेचजण अनेक विषयांवर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत असतात किंवा व्यक्त होत असतात. अशांसाठी हे व्यासपीठ प्रभावी आहे. २००९ पासून आपले प्रजासत्ताक मासिक सुरु असल्यापासून मि मराठेशाही हा ब्लॉग लिहितोय. येथे मि माझे ललितलेखन सुद्धा प्रसिध्द केले आहे. मध्यंतरी लिखान कमी केले मात्र कोरोना लॉकडावुनमध्ये पुन्हा याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला. नमनाला घडाभर तेल असे झाले. आता मुख्य विषय-- हा आपला ब्लॉग येथे नावाखाली सब्स्क्राइब असे बटन आहे येथे आपण ...
कविवर्य सुनिल शिवाजी खवरे यांचे कोरोना लॉकडावुन दरम्यानचे प्रवासवर्णन !
- Get link
- X
- Other Apps

कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूंमुळे संपूर्ण जग हतबल झालं होतं आणि लॉकडाऊन मुळे माझ्यासारखे कित्येक जण नोकरी निमित्त बाहेर गावी अडकले होते. पोटा पाण्याच्या प्रश्नांची उकल होत न्हवती. आता होते न्हवते पैसे सुद्धा संपत आले होते. आणि अजून लॉकडाऊन किती दिवस आणि किती महिने वाढवला जाईल याची कल्पना न्हवती. म्हणून मी व माझ्या बायकोने गावी जाण्याचा निर्णय घेतला.गावी जाण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरला मेडिकल टेस्ट करुन घेतल्या पण गावी जायचं कसं हा मोठा प्रश्न होता. कारण लॉकडाऊन मुळे राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या बंद होत्या शिवाय प्रायव्हेट गाड्यांना सुध्दा बंदी होती आणि बाईक वर फक्त एकाच व्यक्तीला वाहतुकीस मुभा होती. अशा परिस्थितीत गावी जायचं कसं हा यक्षप्रश्न आमच्यासमोर उभा राहिला होता. ठीक ठिकाणी पोलिसांनी चेक पोस्ट बनवले होते व कांही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. बायको व दोन मुलांनसहित आता गावी कसं जाता येईल या विवंचनेत मी होतो.पण शेवटी थांबण्याचा संयम संपला आणि जे होईल ते होईल म्हणून रविवारी पहाटे चार वाजता उठू...