प्रतिक्रिया जपाविशी वाटली म्हणून THANK YOU SIR !
माज्या जेम्स विषयीच्या लेखावारिल आमच्या पत्रकारितेच्या शिक्षकांची ही प्रतिक्रिया जपाविशी वाटली म्हणून
प्रिय बाबू,
'जेम्स लेनच्या आयचा घो!' ही तुझी भावना कळली. जेम्स लेनचा विरोधही समजला. मात्र ते करताना तुझ्या मनातला गोंधळ तू अधिक जाहीर केला आहे. हा मानसिक गोंधळ प्रातिनिधिक आहे म्हणून तुला लिहितोय.
तुझे बरेचसे विचार हे अभिनिवेशातून आलेले आहेत आणि अभिनिवेशाची बरीचशी कारणं अज्ञानात आहेत. मराठा सामाजातली आणि बहुजन समाजातली बरीचशी मुलं या अभिनिवेशामुळेच राजकीय वा प्रचारकी तत्त्वज्ञान राबवणाऱयांच्या हातचं बाहुलं बनत राहतात.
जेम्स लेन आणि त्याला चुकीची व बदनामीकारक माहिती पुरवणाऱ्या विकृत मंडळींच्या विरोधातली बाजू समजू शकते. त्यांना चोप देणाऱ्यांचा रागही यथायोग्य आहे. पण त्या मागोमाग चोरपावलांनी येणारा अभिनिवेश मात्र चुकीचा आहे.
या अभिनिवेशातूनच 'सत्याचा कांगावा' आणि 'लोकभावनेच्या विरोधात बेधडक जाणे' अशा गोष्टी बोलल्या जातात. बाबू, सत्याचा कांगावा कधीच होऊ शकत नाही. सत्य हे बहुपेडी असते. थोडक्यात ते रिलेटिव्ह असते. म्हणजे चार आंधळ्यांना हत्ती जसा वेगवेगळ्या प्रकारे दिसला तसे सत्य वेगवेगळे भासू शकते. फक्त सत्य सांगणारा किंवा ते ठसवणारा माणूस बौद्धिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या काय ताकदीचा आहे यावर ते सत्य ठसण्याची प्रक्रिया ठरत असते. कायदे आणि ठराव करून जसं सत्य ठसवता येत नाही तसं ते हिंसक मार्गानेही ठसवता येत नाही. ते ठसवायला स्मार्टपणा लागतो. दुर्दैवाने तो अभिनिवेश बाळगणाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळेच लोकभावना माहीत असूनही त्या लोकभावनेच्या ओलाव्यात आपला रंग मिसळण्यात तुमच्यासारखी चिथावणीखोर तरुण मंडळी अपयशी ठरतात. संस्कृतीच्या रंगात तुम्ही चिखल केला किंवा रक्तपात केला की लोकभावना त्याच रंगाची होत जाते.
११ कोटी मराठी लोकांच्या भावना पायदळी तुडवण्याइतका जेम्स लेन कधीच मोठा नव्हता, नाही. मात्र कुणाच्या तरी चिथावणीमुळे तो मोठा होतोय हे मात्र नक्की. जनता हुशार आहे. कुणाला उपेक्षेने मारायचं कुणाला डोक्यावर बसवायचं हे तिला चांगलं माहीत आहे. मात्र सध्याचा मीडिया आणि प्रसाराची साधनं यावर आरुढ होऊन अनेक लोक दिशाभूल करतात. तू पत्रकारितेचा विद्यार्थी आहेस. तू या गोष्टींकडे शांत डोक्याने बघायाल शिकलं पाहिजेस आणि तुझ्या पिढीच्या इतरांनाही वाहवत न जाण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजेस.
तो जेम्स लेन जाऊदे. पण तुम्ही आधी पूर्वग्रह सोडून इतिहास तर जाणून घ्या. नाही तर हा देश आर्यांचा की अनार्यांचा हा प्रश्न तुम्हाला पडलाच नसता. दिल्लीच्या गादीवर पृथ्वीराजानंतर सातशे वर्षे मुसलमान शासक होते. दक्षिणेतले हिंदु राजे एकेक करून संपत गेले आणि त्याठिकाणी पातशाह्या आल्या. शिवाजी महाराजांनी या राजवटींविरुद्ध टक्कर देत स्वराज्य स्थापलं आणि राजपुतान्यातला जयसिंग युक्तिने टिकून राहिला. बाकी देश मुस्लीम अंमलाखालीच होता. मुस्लीम शासक हे योद्धे होते, धर्मप्रसारक नव्हते. मात्र त्यांच्यावर प्रभाव गाजवणारे सूफी संत हे खरे विखारी धर्म प्रसारक होते. अजमेरच्या दर्ग्याचा चिश्ती हा चिथावणीखोर होता. त्यांच्या प्रसाराला थोपवलं ते विविध संप्रदायांनी.
आर्य हा वंश नाही. ती चुकीची माहिती आहे. आर्यांमध्ये काळे-गोरे, बुटके-उंच, युरेशियातल्या गवताळ प्रदेशातले सारेच लोक होते. ते वैदिक लोक होते. ऋग्वेद आणि यजुर्वेद हे त्यांच्या युरेशियन भाषेत आहेत. त्यांना लिपी माहीत नव्हती. ते मौखिक परंपरेने आपलं कथित ज्ञान टिकवायचे. संस्कृत ही भाषा खूप उशिरा पाणिनीने विकसित केली. संस्कृत सुरुवातीला अरेमिक (अरबांची आधीची भाषा) ब्राह्मी आदी भाषेतून लिहिलं जायचं. देवनागरी ही लिपी नंतर विकसित झाली. सर्व भारतीय भाषांची जननी ही ब्राह्मी भाषा आहे.
धर्मनिरपेक्षता हा आपल्या भारतीय लोकांमधला संस्कृतीतून वाहत आलेला गुणधर्म आहे. आपण आपल्या देवाला एकेरीत बोलतो आणि प्रसंगी त्याला शिव्याही घालतो. आपण इतर धर्मियांना सहन करतो. आपण सहिष्णू आहोत. फक्त आपण जातीच्या बाबतीत असहिष्णू आहोत.
बाकी तुला अनेक प्रश्न पडत असतील तर त्यासाठी काटेकोरपणे वाचन वाढवायला हवं. आणि अभिनिवेशाला सोडचिठ्ठी द्यावी लागेल. आणि हो, शिवाजी राजा हा आग्र्याहून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका आणि अफजल खानाचा वध, दादोजी कोंडदेवाचा शिष्य यापुरताच मार्यादित नाही. एक नीतीज्ञ, एक प्रशासक, एक जाणता दीर्घदृष्टीचा राजा म्हणून त्याचं मोठेपण त्याचा वारसा सांगणाऱ्यांनी समजून घ्यायला हवंय.
-- पराग पाटील
मी प्रयत्न करतो सर
ON MY JEMLE'S ARTICLE MY JORNALISM TEACHER GIVE ME THIS REPLY I JUST PUT HERE FOR YOURSELF ALSO, I WANT TO SAY THANK'S TO MY DEAR SIR !

Comments
Post a Comment