फरार सागर कारिवडेकरची ठाण्यात पोलखोल


प्रिती राणेंकडून सागर कारिवडेकरला पोलीसांसमोर येण्याचे आव्हान
महाराष्ट्रातील अनेक गुंतवणूकदारांकडून करोडो रूपये काखोटीला मारून फरार झालेल्या आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाण्यातील राणे दांपत्यावर उलट आरोप करीत गुंतवणुकदारांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या सागर कारिवडेकरचा प्रिती राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला.
गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन पोबारा करणाऱ्या सागर कारिवडेकरच्या ऑनलाईन व्हिडिओची खिल्ली प्रिती राणे यांनी उडवली आणि तारीखवार नसलेले संदिग्ध व्हिडिओ दामदुप्पट परतावा खाल्लेल्या गुंतवणूकदारांमार्फत ऑनलाईन पाठविण्याऐवजी सागरने सर्व कागदपत्रे घेऊन राणे दांपत्याकडे गुंतवणुकदारांचा पैसा असल्याचे पोलीसांसमोर सिद्ध करावे असे प्रिती राणे म्हणाल्या.

माध्यमांसमोर बोलताना प्रिती राणे यांनी त्यांच्या ठाण्यातील सर्व साधनसामग्रीचा व लोकसंपर्काचा वापर सागर कारिवडेकरने गुजराती लाॅबीच्या लाँगटर्म मास्टरमाईंड गेमप्लॅननुसार केल्याचा आरोप केला.

सावंतवाडीतील भावकीचा आधार घेऊन लुटारू भामटा सागर कारिवडेकर याने आपली आणि गुंतवणुकदारांची जी फसवणूक केली ती माध्यमांसमोर सांगताना आणि राणे दांपत्याची अनेक वर्ष मेहनत करून कमावलेली प्रतिष्ठा ज्या पद्धतीने धोक्यात आणली गेली त्याबद्दल बोलताना प्रिती राणे यांना अश्रू अनावर झाले.

प्रिती राणे यांनी माध्यमांसमोर सागर कारिवडेकरसह त्याच्या पत्नीच्या मालमत्तेचा आणि गुजराती संबंधांचा पाढा वाचून दाखवला आणि उपस्थित माध्यम प्रतिनिधीदेखील आश्चर्यचकित झाले. सर्व पैसा राणेंकडेच असल्याचे घूमजाव विधान करणाऱ्या सागर कारिवडेकरच्या करोडोंच्या मालमत्तेची माहिती प्रिती राणे यांनी दिल्यानंतर या प्रकरणात पोलीस तपासालाही एक वेगळी दिशा मिळणार आणि गुंतवणुकदारांचाही गैरसमज दूर होणार असे चिन्ह दिसत आहे. सागरच्या करोडो रूपयांच्या महागड्या गाड्या आणि कोट्यावधींची जमीन मालमत्ता व कोणतेही कर्ज न घेता बांधलेला करोडो रूपये किमतीचा बंगला कुठून आला आणि शेअरबाजारातील बड्या गुजराती लाॅबीसोबत सागरने केलेली गुंतवणूक कुठून आली आहे असा प्रश्नदेखील प्रिती राणे यांनी विचारला.

सागर कारिवडेकरने अलिकडेच काही गुंतवणुकदारांची दिशाभूल करण्यासाठी जो व्हिडिओ पाठविला त्यावर प्रिती राणे यांनी रोखठोक भूमिका घेत हा व्हिडिओ ज्या माध्यमातून प्रसिद्ध झाला त्यांचा तपास पोलीसांनी करून फरार सागरचा शोध घेण्याची मागणी आपण करणार असल्याचे जाहीर केले आहे.
ठाणे आर्थिक गुन्हे शाखेत करोडो रूपयांच्या फसवणुकीबाबत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊनही राणे दांपत्याला लक्ष्य करण्यासाठी जुने व्हिडिओ, तथ्यहीन कागदी चिटोरे दाखवीत आणि खोटे आरोप करीत बोटे दाखवीत लपून बसलेल्या सागर कारिवडेकरचा पोलीस कसून शोध घेत आहेत आणि सागर लवकरच गजाआड दिसेल यासाठी आपणही पाठपुरावा करणार असल्याचे प्रिती राणे यांनी माध्यमांसमोर सांगितले.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income