रायगड भाजपचे आचार्यकुल !
चैतन्याचे कर्मनिष्ठ साधक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी संपूर्ण सृष्टी ही चैतन्याची आनंदमय अभिव्यक्ती आहे हे आपल्या चिद्विलासवाद मध्ये मांडले. विश्वात्मक देवाच्या भक्तीतून मुक्तीचा मार्ग दाखवताना त्यांनी नामामृताचे सुगम साधन सांगताना त्यांच्या हरिपाठात ''सर्वांघटीं राम देहांदेही एक, सूर्यप्रकाशच सहत्ररश्मी'' हे स्पष्ट केले. देव रोकडा सज्जनीं म्हणणाऱ्या या संतांच्या महाराष्ट्र भूमीत मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानणारी जीवनचरित्रे पाहायला मिळतात त्यातीलच एक म्हणजे आमचे सदगुरू रायगड जिल्ह्यातील सतीशजी धारप हे होय. श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वेदमहर्षी नारायण धारप यांनी त्यांची जागा बल्लाळेश्वराच्या भक्तनिवासाला दान देऊन दातृत्वाचे आणि समाजसेवेचा आदर्श धारप कुटुंबियांना घालून दिला. याच वाटेवर हे धारप कुटुंबीय अव्याहत चालत आहेत. रायगड जिल्ह्यातील राजकारण आणी पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे प्रामुख्याने छंद म्हणुन व्यापून टाकलेल्या धारप साहेबांनी त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी ठेकेदारी व्यवसाय मोठ्या नेटाने क...