बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो॥ हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥ वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥ हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥ करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥ या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥ ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥ पांडुरंग सदाशिव साने *साने गुरूजी* *डिसेंबर २४, इ.स. १८९९* जून ११, इ.स. १९५०
Comments
Post a Comment