शिवसह्याद्री प्रतिष्ठाणमार्फत आदिवासी वस्त्यांवर दिवाळी उत्सव साजरा

*एक करंजी... दुर्गम दारी*
21 व्या शतकात देखील अजून बरीच गावं आहेत, बऱ्याच वाड्या आहेत, बरेच आदिवासी पाडे आहेत जिथे अजूनही सोई सुविधा यांचा वनवास आहे. अशीच एक धनगरवाडा नामक वस्ती भुदरगड तालुक्यात देखील आहे. धनगरवाडा येथील लोक आजही दिवाळीचा फराळ गावोगावी फिरून मागून खातात. ऐन दिवाळीच्या दिवसात त्यांच्या मुलांच्या नजरा फक्त मागून आणणाऱ्या फराळाकडे लागलेल्या असतात. अगदी अशाच योग्य वेळी शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रदेश सरचिटणीस संदीप मेंगाणे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीची दिवाळी फराळ भुदरगड तालुक्यातील धनगरवाडा येथे त्यांच्या घरपोच जाऊन दिला. बेडीव गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम भोसले आणि सावतवाडी गावचे ग्रामपंचायत कर्मचारी मारुती गुरव यांच्या मदतीने व शिवाजी राजाराम पन्हाळे (बामणे) , प्रदेश अध्यक्ष सुनील बोरनाक, संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर यांच्या सहकार्याने अतिदुर्गम भागात जाऊन प्रतिष्ठानचे प्रदेश सरचिटणीस संदीप मेंगाणे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष विनायक इंदुलकर, आजरा प्रतिनिधी विनोद येसादे यांनी धनगरवाडा येथील लोकांना त्यांच्या घरी जाऊन दिवाळी फराळ वाटप केला. त्यावेळी धनगरवाडा येथील सर्व ग्रामस्थ व लहान मुले यांनी दिवाळी जल्लोष केला. योग्य वेळी घरपोच दिवाळी फराळ मिळाल्याने तेथील ग्रामस्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
Comments
Post a Comment