पनवेलमधील शासकीय वसाहती रामभरोसे

सा.बां. विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष ! पनवेल :- { बाबुराव खेडेकर } शहरातील जुना ठाणा नाका रोडवरील शासकीय वसाहतीच्या इमारती धोकादायक स्थितीत असून दररोज घरांमध्ये स्लॅब कोसळल्याच्या घटना घडत आहेत. येथे स्ट्रीटलाईटची व्यवस्था नाहीच जिन्यावर सुद्धा विजेची व्यवस्था नाही. परिसरातील अस्वच्छता वाढलेले गवत त्यातून डुकरांचा खुलेआम वावर; त्यामुळे नागरिकांमध्ये स्वाईन फ्लू सारख्या आजाराची भीती,धोकादायक इमारती आणि पाण्याच्या टाक्या,संरक्षण भिंतीचा थांगपत्ता नाही,ड्रेनेजची व्यवस्था नीट नाही ,पाणी व्यवस्थापनातही गोंधळ या नरकयातना रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शासकीय कर्मचाऱ्यांची ५२ कुटुंबे रोज भोगत आहेत. कळंबोलीतील सेक्टर ४ ई येथील शासकीय वसाहतीची अवस्थाही अशीच असल्याने पनवेलमधील शासकीय वसाहती रामभरोसे असून येथील रहिवाश्यांची अवस्था ”तोंड दाबून बुक्यांचा मार ” अशीच होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वसाहतीकडे अक्...