Posts

स्वामी गर्जनेची काल आठवण झाली !

Image
चक्र आता फिरून येत आहे. भारतातून पुन्हा एकदा शक्तीचा प्रवाह वाहत आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास त्याला वेळ लागणार नाही. विश्वास ठेवा, प्रभूचे फर्मान निघाले आहे कि भारताची उन्नती होईलच होईल ! सर्वसामान्य जनता आणि गरीब लोक सुखी होतीलच होतील ! भारत पुन्हा उजळेल यात संदेहच नाही. पण जडाच्या शक्तीने न्हवे तर चैतन्याच्या शक्तीने; विनाशाचा झेंडा नाचवून न्हवे तर शांती आणि प्रेमाची विजयी पताका फडकवून. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली हि भारतमाता हळूहळू नेत्र उघडत आहे. ती कांही काळ   निद्रिस्त झाली होती इतकेच… म्हणून भारताचे उज्वल भविष्य करण्याचे रहस्य संघटना,शक्तीसंचय आणि इच्छाशक्तीच्या परस्पर सहकार्य यातच साठलेले आहे.आपल्या सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागणार आहे. खूपखूप झटावे लागेल. उठा ! लांबच लांब रात्र संपून अरुणोदयाचा समय आला आहे. आता एक विशाल लाट उठली आहे तिचा वेग कोणीही रोखू शकणार नाही ! या गोंधळातून आणि झगड्यातून  वैभवसंपन्न,अजिंक्य,परिपूर्ण असा उद्याचा भारत मला माझ्या मनचक्षुपुढे दिसतो आहे ! स्वामी विवेकानंद ! वन्दे मातरम ...

SUPORT TO SURAJ !

Image
सुरज जाधव आगे बढो ! आमचे परममित्र झुलपेवाडीचे सुपुत्र सुरज जाधव यांनी कोल्हापूरच्या लढाऊ बाण्याचे उदाहरण दाखवून दिले असुन चिकोत्रेचे पाणी मुंबई भायखळा येथील शाबु सिद्धिकी महाविद्यालयाच्या प्रशासनाला दाखवून दिले आहे. ईंटेरिअर डिझायनर ला प्रवेश घेतलेल्या ६० विध्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रथम दिवशी शासन निर्णय दाखवून सदर कोर्स बंद झाल्याने आपली प्रवेश फी घेवून जा असे सांगण्यात येत होते. अश्यावेळी उशीर झाल्याने आपल्याला इतर ठिकाणी प्रवेश मिळणार नाही त्यामुळे वर्ष वाया जाणार  म्हणून विध्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण सुरज जाधव एकटाच या विरोधात उभा असून इतर विध्यार्थाची जमवाजमव करत आहे. लोकशाहीमध्ये शिक्षण म्हणजे व्यापार नसून संस्कार आहे याचा विसर शिक्षणसम्राटांना व व्यवस्थापनाला पडला असेल तर विध्यार्थी कर्तव्याने त्याची जाणीव करून देण्याच्यासुरजच्या लढ्याला प्रतिसाद म्हणून मी स्थानिक सर्वपक्षीय युवा आणि विध्यार्थी संघटनेची मदत मागितली पण विधानसभेच्या समोर कांही प्रतिसाद मिळत नसल्याने शाबु सिद्धिकी चे ट्रस्टी असलेल्या मुश्ताक अंतुले (माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे च...

मराठा आरक्षण !

Image
Image

मी केलेल्या दोन महत्वाच्या बातम्या !

Image
ABOUT MUMBAI METRO NEWS ABOUT PANVEL IMP NEWS

शेकापचा विकासाचा अपयशी प्रयत्न !

Image

आधुनिक म्हणी!

आधुनिक म्हणी! १. साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा २. ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी ३. एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण ४. लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी ५. चोर्‍या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला ६. आपले पक्षांतर, दुसर्‍याचा फुटीरपणा ७. प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे ८. अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा ९. जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण १०. एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो ११. सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना १२. वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला १३. वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले १४. घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे १५. साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता १६. गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता १७. स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार १८. मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका १९. न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला २०. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा २१. पुढार्‍याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये २२. नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही २३. नाव गंगूबाई, आंघोळीला...