छावा निमित्ताने आपण काय स्मरण करूया...


सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा 
   या गीतात आपल्या देशाचे वर्णन करताना गीतकाराने "कुछ तो बात है की हस्ती मिटती नहीं हमारी" असे केले आहे. ती कोणती विशेष गोष्ट आपल्या देशाच्या डीएनए मध्ये आहे ? सोन्याचा धूर निघणारा किंवा सोने पिकवणारा आपला देश असे इतिहासात म्हटले आहे म्हणजे इथे सुबत्ता होती असे मानले तर आज हा देश विकसनशील का आहे ? धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मरण करताना असे प्रश्न आपल्याला का पडत आहेत ? 
    आपण नेहमी म्हणतो 
व्यर्थ न हो बलिदान.. 
   त्यावेळी आपली जबाबदारी वाढते मित्रानो ! लहान मुले निरागस असतात त्यांना आपण आकार देत जातो तेंव्हा त्यांना आपण देव देश आणि धर्माची शिकवण देतो. त्यात ओघाने मातृभूमी भारतमाता म्हणून समोर येते. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडील देवाचे रूप मानले जाते. भारत माता म्हटले की आपल्याला जमेल तशी तिची सेवा करणे, तिच्या साधनसंपत्तीचे सन्मानाचे संरक्षण करणे संवर्धन करणे हे आपले कर्तव्यच बनते. कर्तव्यानेच मनुष्य जन्माला अर्थ प्राप्त होतों. मात्र आपण करत असलेले कर्तव्य योग्य की अयोग्य यासाठी पुन्हा धर्माची आठवण करावी लागते. त्यासाठी जो विवेक हवा तो धर्मात शिकवला जातो. 
       आपल्याला आतापर्यंत समजले असेलच की मराठेशाहीचा राजा छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल राजा औरंगजेब याने पकडून हाल हाल करून मारले. आपल्याला एक गोष्ट निदर्शनात आणून देतो की राजा जर शरण आला तर दुसरा राजा त्याला सन्मानाने आश्रय देऊन छोटे राज्य देऊन त्याची काळजी शुद्ध घेत असतो. युद्धशास्त्रात आपल्याला अशी उदाहरणे भेटतील. आपल्या देशातील अनेक हिंदू राजे मुस्लिम राजाकडे तसे आश्रित होते. काही इंग्रजांकडेही आश्रित होते. मात्र संभाजी राजांनी तशी तडजोड का केली नाही ? याचे स्मरण म्हणजेच हिंदू धर्माचे आणि महाराष्ट्र धर्माचे स्मरण आहे...
     या भूमीत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाकडे विश्व कल्याणाचे पसायदान मागितले बाराव्या शतकात; त्यानंतर शक हून मुघल अशी एकामागून एक आक्रमणे होतच राहिली. त्यातही इथला धर्म टिकून राहिला. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान वीरांनी येथे स्वातंत्र्य, समता बंधुता प्रस्थापित होण्यासाठी बलिदान दिले. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर वारकरी संप्रदायाची वैचारिक पेरणी आणि स्वराज्य संकल्पक छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत आधारे दिलेली शिकवण यातून महाराजांनी स्वराज्य उभे केले. ते टिकवणे वाढवणे याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवर आली. त्या कसोटीत त्यांना आग्रा भेटीत ओलीस रहावे लागले. महाराज दक्षिणेत मोहिमेत असताना दिलेर खानाकडे जाऊन त्याला गुंतवून ठेवावे लागले. एकामागून एक लढाई जिंकत त्यांनी कर्नाटक गोवा इकडेही आपल्या साम्राज्याच्या सीमा वाढवत तेथील हिंदूंचे हित रक्षण केले. 
    आपल्याला एक गोष्ट ठामपणे समजली पाहिजे की हा देश हिंदूंचा असून येथे इतर धर्माचे लोक एकतर आक्रमणकारी म्हणून आले किंवा आश्रित म्हणुन आले. सर्वांना सामावून घेत सर्वांच्या उत्कर्षाचा विचार करणारा हा सहिष्णू देश आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांना दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले ते म्हणजे माझ्या सैन्यातील कोण कोण तुम्हाला फितूर आहे ? आणि स्वराज्याचा खजिना कुठे आहे ? 
शत्रूला तुमच्याकडून काय अपेक्षा असते याची कल्पना येईल. तुमच्या शत्रूला त्याचे हित शत्रू ओळखायाचे असतात आणि तुम्हाला लुटायचे असते. चाणाक्ष महाराजांनी हा डाव ओळखून व्यापक जनहितासाठी अनंत यातना सहन केल्या पण या प्रश्न आपले तोंड उघडले नाही. परिणामी अनन्वित अत्याचार करून त्यांना मारण्यात आले. मात्र ते मृत्युंजयी ठरले त्यांनी चेतवलेल्या स्वराज्याच्या विचाराने प्रेरित महाराष्ट्र औरंगजेबाला जिंकता आला नाहीच तो मराठ्यांशी लढता लढता याच भूमीत मरण पावला. त्याच्या मृत्यू नंतर मराठे दिल्लीपर्यंतच काय अटकेपार पोहोचले. या साम्राज्य वादात मराठेशाहीचे एक वैशिष्ट येथे विषद करावेसे वाटते. इतर राजे दुसऱ्या पराजित राजाला यमसदनी पाठवत आणि राज्य आपल्या अंकित ठेवत मात्र मराठे पराजित राजाला अभय देऊन चौथाई लावून त्यांचे राज्य त्यांनाच परत करत. त्या चौथाइच्या बदल्यात मराठे त्यांच्या साम्राज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्याकडे घेत. कारण कुणाकडूनही मोफत किंवा दयेवर किंवा हिसकावून काही घेण्याची शिकवण आपल्या संस्कृतीत नाही. त्यामुळेच दिल्ली जिंकूनही दिल्लीचे तख्त राखण्यात महाराष्ट्राने समाधान मानले.  
त्याच दिल्लीच्या तख्तावर डोळा ठेवलेल्या शासकांनी अब्दालीला या देशावर आक्रमण करायला बोलावले तेंव्हा दिल्लीच्या संरक्षणासाठी मराठेच पानिपत मध्ये लढले आणि शहीद झाले. ही बलिदानाची प्रेरणाच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून तत्कालीन मावळ्यांनी घेतली जी आपणही घेत आहोत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उच्च ध्येयासाठी प्रसंगी प्राणांचे बलिदान देण्याची तयारी स्वातंत्य संग्रामात ही दिलेल अनेक महाराष्ट्रातील वीर आपल्या नजरेसमोर येतील. त्यांचेही यानिमित्ताने स्मरण करूया. महाराष्ट्राने देशाची वैचारिक मशागत केली त्या संत परंपरेची स्मरण करूया. . 
जाता जाता एकच संदेश देतो
"देश धर्म पर मिटने वाला
शेर शिवाका छावा था
परमप्रतापी महा पराक्रमी 
एकही शंभू राजा था.."
जय हिंद ! 
जय महाराष्ट्र!!🚩
= बाबुराव खेडेकर 
9702442024

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income