शिवराज्याभिषेक सोहळा 2021
- Get link
- X
- Other Apps
“या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही....”
मध्ययुगीन हिंदूस्थानच्या अडीच हजार वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक. छत्रपती शिवरायांनी चालवलेले उद्योग केवळ ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे, राज्याभिषेकाने सिध्द केले. शिवरायांनी त्यावेळच्या तरूणांना एकत्रित केले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या. हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्य रयतेच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली. स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. दुर्गराज रायगडावर प्राचीन ‘राज्याभिषेका’च्या प्रथेला पुर्नजिवीत केले. ६ जून १६७४ रोजी स्वत:स मोठ्या वैभवात राज्याभिषेक करुन घेऊन एक सार्वभौम राज्य निर्माण झाल्याची द्वाही फिरवली.
या ऐतिहासिक क्षणाची सदैव स्मृती राहावी, म्हणून अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गराज रायगडावर प्रतिवर्षी ५ व ६ जून रोजी भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांनी दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व शिवभक्तांनी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या विनंतीला मान दिला. दुर्दैवाने, यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा
शिवभक्तांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत, मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरात
कार्यक्रमांची रुपरेषा..
* ५ जून
दुपारी ४ :०० वाजता - युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे यांचे चित्त दरवाजा येथे स्वागत
- ४ :०५ - स्थानिक सरपंच यांच्या हस्ते गडपूजन.
- ४ : १० - गड चढण्यास प्रारंभ.
- ५ : ०० - महादरवाजा येथे तोरण व स्वागत.
- ५ : ३० - शिर्काई मंदिर येथे स्वागत व दर्शन.
- ७ :०० - गडावरील उपस्थित शिवभक्तांच्या सोबत ऐतिहासिक विषयावर चर्चासत्र. प्रमुख उपस्थित युवराज संभाजीराजे छत्रपती व
यौवराज शहाजीराजे छत्रपती.
- ८ :३० - शिर्काईदेवीचा गोंधळ.
* ६ जून
सकाळी - ६ :०० - ध्वज पूजन
- ७ :०० - शाहिरी कार्यक्रम (रेकार्डेड)
- ८ : ३० - युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांचे उत्सवमूर्ती सोबत आगमन.
- ८ : ४५ - शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ.
- ९ : ०० - पालखी जगदिश्वर मंदिराकडे रवाना.
- १० : ३० - जगदिश्वर मंदिर येथे पूजा.
- १० : ४५ - शिवछत्रपतींच्या समाधीस्थळी पुष्पहार आर्पण करुन सोहळ्याची सांगता.

Comments
Post a Comment