Posts

Showing posts from 2026

फरार सागर कारिवडेकरची ठाण्यात पोलखोल

Image
प्रिती राणेंकडून सागर कारिवडेकरला पोलीसांसमोर येण्याचे आव्हान महाराष्ट्रातील अनेक गुंतवणूकदारांकडून करोडो रूपये काखोटीला मारून फरार झालेल्या आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाण्यातील राणे दांपत्यावर उलट आरोप करीत गुंतवणुकदारांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या सागर कारिवडेकरचा प्रिती राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन पोबारा करणाऱ्या सागर कारिवडेकरच्या ऑनलाईन व्हिडिओची खिल्ली प्रिती राणे यांनी उडवली आणि तारीखवार नसलेले संदिग्ध व्हिडिओ दामदुप्पट परतावा खाल्लेल्या गुंतवणूकदारांमार्फत ऑनलाईन पाठविण्याऐवजी सागरने सर्व कागदपत्रे घेऊन राणे दांपत्याकडे गुंतवणुकदारांचा पैसा असल्याचे पोलीसांसमोर सिद्ध करावे असे प्रिती राणे म्हणाल्या. माध्यमांसमोर बोलताना प्रिती राणे यांनी त्यांच्या ठाण्यातील सर्व साधनसामग्रीचा व लोकसंपर्काचा वापर सागर कारिवडेकरने गुजराती लाॅबीच्या लाँगटर्म मास्टरमाईंड गेमप्लॅननुसार केल्याचा आरोप केला. सावंतवाडीतील भावकीचा आधार घेऊन लुटारू भामटा सागर कारिवडेकर याने आपली आणि गुंतवणुकदारांची जी फसवणूक केली ती माध्यम...