सृजनांची चळवळ...
अहिंसा, सत्य, अस्तेय अशी मुल्ये आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी पुस्तकी तत्वे यांचा प्रत्यक्ष समाजजीवणाशी सबंध विसंगत वाटु लागतो तेंव्हा परिस्थितीच्या अंधारातुन सर्वशक्तीनीशी प्रकाशाकडे जाण्याचा प्रवाह तयार करावा लागतो. हाच मनुष्याचा स्वभावधर्म आहे. प्रजासत्ताक गणराज्य हि अशीच सर्वसमावेशक आदर्श संकल्पना आहे. शिवाय ती लवचिकही आहे. हा यज्ञ असाच अखंडपणे सतर्क राहुन तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. पत्रकारिता हे निमित्त मात्र माध्यम असले तरी यासाठी प्रभावीपणे वापरत आहोत. आज पत्रकारिता आणि संघटणा हि सत्तास्थाने बनली आहेत मात्र आम्ही शाळेची पायरी चढताना राजकारण करणार नाही! आजी माजी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपिठ मिळावे या उद्देशाने साने गुरूजींच्या विचार विश्वात पुन्हा शाळेकडे परत येण्याचा आमचा माणस आहे कारण परिवर्तणाचा मार्ग शाळेतुनच जातो! दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देवुन कांही गुणी विद्यार्थी कमावण्याचा आमचा मानस आहे उगाच पाय न ओढता प्रोत्साहण देणारे आमच्या गावचे लोक असल्याने कुणाचाही विरोध न होता प्रोत्साहनासाठी संघटणेच्या फलकांच्या अ