Posts

Showing posts from March, 2025

छावा निमित्ताने आपण काय स्मरण करूया...

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा     या गीतात आपल्या देशाचे वर्णन करताना गीतकाराने "कुछ तो बात है की हस्ती मिटती नहीं हमारी" असे केले आहे. ती कोणती विशेष गोष्ट आपल्या देशाच्या डीएनए मध्ये आहे ? सोन्याचा धूर निघणारा किंवा सोने पिकवणारा आपला देश असे इतिहासात म्हटले आहे म्हणजे इथे सुबत्ता होती असे मानले तर आज हा देश विकसनशील का आहे ? धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मरण करताना असे प्रश्न आपल्याला का पडत आहेत ?      आपण नेहमी म्हणतो  व्यर्थ न हो बलिदान..     त्यावेळी आपली जबाबदारी वाढते मित्रानो ! लहान मुले निरागस असतात त्यांना आपण आकार देत जातो तेंव्हा त्यांना आपण देव देश आणि धर्माची शिकवण देतो. त्यात ओघाने मातृभूमी भारतमाता म्हणून समोर येते. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडील देवाचे रूप मानले जाते. भारत माता म्हटले की आपल्याला जमेल तशी तिची सेवा करणे, तिच्या साधनसंपत्तीचे सन्मानाचे संरक्षण करणे संवर्धन करणे हे आपले कर्तव्यच बनते. कर्तव्यानेच मनुष्य जन्माला अर्थ प्राप्त होतों. मात्र आपण करत असलेले कर्तव्य योग्य की अयोग्य यासाठी पुन्हा धर्माची आठ...