Posts

Showing posts from February, 2025

मराठीची अर्थव्यवस्था मजबूत करूयात !

Image
  मराठी भाषेचा आणि अर्थव्यवस्थेचा संबंध काय? खरंतर जीवनातील अनेक गोष्टींचा आणि अर्थकारणाचा, अर्थव्यवस्थेचा थेट संबंध आहे. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी मागणी आणि पुरवठा या विषयावर महत्त्वाचे काम केले आहे. त्यांनी असे म्हटले की, पुरवठा आणि मागणीमुळे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढीस लागते. बाजारपेठेत एखाद्या वस्तूला, सेवेला मागणी मिळण्याआधी ती बाजारपेठेत उपलब्ध देखील असायला हवी. किंवा मागणी आल्यावर त्वरित उपलब्ध व्हायला हवी. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्याचा थेट संबंध असून ह्यावरच सर्व अर्थचक्र अवलंबून आहे. मराठीभाषेला अभिजात दर्जा मिळाला, ह्या मुळे भाषेच्या संवर्धनाकरिता काही कोटी रुपयांचं अनुदान केंद्र सरकारकडून मिळेल. येणाऱ्या 10 मार्चला महाराष्ट्राच्या बजेट मध्ये मराठी विभागाकरिता घसघशीत निधीची घोषणा देखील होईल. पण ह्याच बरोबरच माय मराठी भाषेचे सुपुत्र म्हणून आपली देखील जवाबदारी असून ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवा. आपल्या मराठीला चिरंतन ठेवायचं असेल तर तिची मागणी व पुरवठा हा कायम अखंडितच हवा. मराठी भाषेची मागणी आणि पुरवठा असल्यास ...

एकात्म मानवतावाद : सुशासनासाठी भारताचा मौलिक दृष्टिकोन

  आज स्वातंत्र्यप्राप्त भारत अमृत काळाच्या उंबरठ्यावर उभा असला तरी संपूर्ण जग अनिश्चिततेच्या वळणावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर, नेहमीच सर्वसमावेशक आणि निसर्ग केंद्रित प्रगती साध्य करण्याचा दृष्टिकोन स्वीकारणारा भारत, आज संपूर्ण जगासाठी शाश्वत विकासाचा आदर्श ठरत आहे. निसर्गाकडे केवळ एक संसाधन म्हणून पाहणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीला आज उत्तरं सापडत नाही. समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही यांसारख्या मतप्रणालींमध्ये अडकलेले व्यवस्थापन कोसळत आहेत किंवा अंतर्गत व बाह्य संघर्षात गुरफटले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, देश देखील अशाच एका द्विधा स्थितीत होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांना साजेसा विकासाचा मार्ग ठरवता आला नाही आणि ते या तिन्ही विचारसरणींमध्ये हेलकावत राहिले. अशा परिस्थितीत, एका दूरदर्शी विचारवंताने एकात्म मानवतावाद या चिरंतन तत्त्वज्ञानाचा प्रस्ताव मांडला. हा विचार मांडणारे होते पंडित दीनदयाळ उपाध्याय, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य होते. परंतु त्यांनी वारंवार स्पष्ट क...