'अस्वस्थ दशकाची डायरी'चे स्टोरीटेलवर प्रकाशन !
प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यां च्या ' अस्वस्थ दशकाची डायरी ' चे स्टोरीटेलच्या ऑडिओबुक्समध्ये प्रकाशन! भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरुवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर , दक्षिण , पूर्व , पश्चिम भारतातील कोणत्या न कोणत्या भागात अशांतता असतेच. संकटे , मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित , सतत येत असतात. भारतातील अनेक राज्यांना भेट देऊन , तेथील अनुभव प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘ अस्वस्थ दशकाची डायरी ’ त लिहिले आहेत. मन अस्वस्थ करणारा हा अनुभव आता आपल्याला ' स्टोरीटेल ' च्या ' ऑडिओबुक्सद्वारे श्राव्यरूपात खुद्द अविनाश धर्माधिकारी यांच्याच आवाजात ऐकता येणार आहे. अस्वस्थ दशकाची डायरी ’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांचा प्रवास माजी सनदी अधिकारी ते चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक असा आहे. प्रशासकीय सेवेत असताना लोकाभिमुख प्रशासनाचे अनेक प्रयोग त्यांनी यशस...