सह्याद्री प्रतिष्ठान आता शिवसह्याद्री प्रतिष्ठान म्हणून कार्यरत
आनंद कांबळे यांची कल्याण जिल्हाध्क्षपदी नियुक्ती कल्याण :- (बाबुराव खेडेकर) गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण परिसरातून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध क्षेत्रात समाजसेवेचे कार्य करून ठसा उमटवलेले सह्याद्री प्रतिष्ठान आता शिव सह्याद्री प्रतिष्ठान नावाने नोंदणीकृत झाले असून नव्या जोमाने कामाला लागले आहे. सतीश पेडणेकर हे या नवनोंदणीकृत धर्मा दय संस्थेचे अध्यक्ष असून यापुढील वाटचालीकरिता ध्येयधोरणांबाबतची माहिती रविवार दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी चिंचपाडा येथील संस्थेच्या बैठकीत देण्यात आली आहे. डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोल्हापूर सांगली सातारा या भागातील लाखो नागरिक राहतात. चळवळीतील कार्यकर्ते म्हणून या नागरिकांची ओळख आहे. 'लाथ मारेन तिथे पाणी काढेल' या म्हणीप्रमाणे मेहनतीने आपण राहतो त्या परिसरात स्थानिकांचा विश्वास जिंकत प्रगती करण्याचे ध्येय उराशी बाळगून विविध क्षेत्रात अग्रेसर राहणारा हा समाज आहे. त्यामुळेच अनेक संघटना छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून कार्यरत आहेत. यातीलच एक नावा...