आधी महागाई आणि बेरोजगारी या व्हायरसचा बंदोबस्त करा :- सुहास खंडागळे
*कठोर निर्बंध लादण्या आधी प्रचंड महागाई आणि बेरोजगारी हे दोन व्हायरस सामान्य लोकांच्या मानगुटीवर बसले आहेत याचा विचार सरकारने करावा- सुहास खंडागळे* यांना पुन्हा परदेशातून नव्या कोरोनाचे(ओमॅयक्रोन) संक्रमण वाढतंय हे माहीत होतं...मागच्या वेळी चुका केल्या त्यातून हे काहीच शिकले नाहीत.परदेश वाऱ्या करणाऱ्यांना कंट्रोल करण्या ऐवजी सामान्य माणसांवर वारंवार निर्बंध लावण्याची भूमिका सरकार घेणार असेल तर सरकारने आधी लोकांच्या रोजी रोटीची व्यवस्था करावी!कोणतेही कठोर नियम लादण्या आधी कोरोना प्रमाणेच महागाई आणि बेरोजगारी हे भयंकर व्हायरस लोकांना जेरीस आणतायत याचं भान सत्ताधाऱ्यांनी ठेवावं...! बाकी नवीन व्हेरियन्ट बाबत नागरिक स्वतः काळजी घेत आहेत.लोक बेफिकीर आहेत असं जे बिंबवले जात आहे ते चूक आहे.दोन वर्षांच्या त्रासातून लोकं बरच काही शिकले आहेत...लोकं लोकांचं काम करत आहेत,सरकार आधी स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे का?हे त्यांनी तपासून पहावं! कोरोनाचे नवे व्हेरियन्त हे परदेशातून आला असेल तर याला देशात प्रामाणिक पणे रांगा लावून दोन दोन डोस घेणारी जनता दोषी कशी? बाहेरून येणाऱ्या लोकांचे नियोजन तुम्हाल...